पुणे महापालिकेत प्रतिमांवरून नवा वाद; महापौरांच्या कृतीवर कोल्हापुरात संताप

पुणे: पुणे महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित महापौर मंजुषा नागपुरे आणि उपमहापौर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर महापालिका भवनातील विविध नेत्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण केले. मात्र, डॉ. केशव बलिराम हेडगेवार यांच्या प्रतिमेला हार घातल्यानंतर शेजारील राजर्षी शाहू महाराज यांच्या तैलचित्राला हार न घालता केवळ नमस्कार केल्याने वाद निर्माण झाला आहे. या प्रकारावरून कोल्हापूरमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष […]

अधिक वाचा..

कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील नागरिकांच्या प्रश्नांवर बेमुदत उपोषणाचा सहावा दिवस

कल्याण: कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीत राहणारे नागरिकांच्या ज्वलंत प्रश्नांवर गेल्या सहा दिवसांपासून आझाद मैदान मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सचिव नोवेल साळवे यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. कल्याण च्या प्रमुख बाजारात आणि नागरिकांना गरज असल्या ठिकाणी मोफत सार्वजनिक सौचालय व मुतारी उभारण्यात यावी, रुक्मिणी बाई दवाखाना नागरिकांसाठी सुसज्ज करावेत ज्यानी […]

अधिक वाचा..

मुंबई महानगरपालिकेत महायुतीचे शिलेदार विराजमान

‘मेयर राज’ची पुनर्स्थापना; महापौर रितू तावडे व उपमहापौर संजय घाडी यांना उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या शुभेच्छा मुंबई: संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या मुंबई महानगरपालिकेला अखेर आज नवे महापौर लाभले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत भाजपच्या रितू तावडे यांनी महापौरपदाची, तर शिवसेनेच्या संजय घाडी यांनी उपमहापौरपदाची सूत्रे हाती घेतली. पालिका आयुक्त भूषण […]

अधिक वाचा..

ठाणे महापालिकेत विरोधी पक्ष नेतेपदासाठी राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता

ठाणे: ठाणे महापालिकेत विरोधी पक्ष नेतेपदासाठी दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र येण्याची शक्यता आहे. शरद पवार गटाचे जिल्हा प्रमुख मनोज प्रधान यांनी दिलेल्या सूचक वक्तव्यानुसार, “आम्ही एकत्र आलो तर अजित पवार गटाचा विरोधी पक्ष नेता असेल,” असे त्यांनी स्पष्ट केले. ठाण्यात महायुतीला मिळालेल्या बहुमतानुसार विरोधी पक्ष नेतेपदावर एकाच पक्षाचा दावा बसवणे शक्य नव्हते. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस […]

अधिक वाचा..

चंद्रपूर महापालिका महापौर पदावर काँग्रेसचाच दावा; दिल्लीत उद्या निर्णायक बैठक; विजय वडेट्टीवार

नागपूर: चंद्रपूर महानगरपालिकेतील महापौर पदाची प्रक्रिया लवकरच सुरू होणार असून, त्यापूर्वी काँग्रेस पक्षाची महत्त्वाची बैठक उद्या दिल्लीत होणार आहे. काँग्रेस महासचिव के.सी. वेणुगोपाल यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या बैठकीनंतर महापौर पदाबाबत अंतिम तोडगा निघेल, अशी माहिती काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली. चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसचाच महापौर बसावा यासाठी पक्षात हालचाली सुरू आहेत. मात्र काही घडामोडींमुळे […]

अधिक वाचा..

पुणे महापालिकेत भाजपचे वर्चस्व कायम! वसंत मोरे यांच्या पराभवानंतरच्या पोस्टमुळे चर्चेला उधाण

पुणे: पुणे महानगरपालिका निवडणुकीत पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाने आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. १६५ प्रभाग रचना असलेल्या पुणे महापालिकेत भाजपने तब्बल ११९ जागांवर विजय मिळवत एकहाती सत्ता मिळवली आहे. या दणदणीत विजयात केंद्रीय मंत्री, भाजप नेते आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांची महत्त्वाची भूमिका असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.या निवडणुकीत इतर पक्षांची अवस्था […]

अधिक वाचा..

मुंबई महापालिकेच्या राजकारणात निर्णायक वळण

१० नामनिर्देशित नगरसेवकांमुळे सत्तासमीकरणे बदलणार मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) सदनात आता दहा नामनिर्देशित नगरसेवक नेमले जाणार आहेत. महाराष्ट्र विधानपरिषदेने २०२३ मध्ये मंजूर केलेल्या विधेयकामुळे यापूर्वी असलेली पाच नामनिर्देशित नगरसेवकांची संख्या आता दुप्पट झाली आहे. या बदलाचा सर्वाधिक फायदा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. अलीकडील बीएमसी निवडणुकीत […]

अधिक वाचा..

मुंबई महापालिकेत महायुतीचा विजय; उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया भाजप कागदावर, शिवसेना जमिनीवर

मुंबई: राज्यासह संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत महायुतीने निर्णायक विजय मिळवला आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला ८९ तर शिवसेनेला २९ जागा मिळाल्या असून महायुतीने स्पष्ट बहुमत मिळवले आहे. दुसरीकडे ठाकरे बंधूंच्या युतीला एकूण ७१ जागांवर समाधान मानावे लागले, तर काँग्रेसला २४ जागा मिळाल्या आहेत. इतर व अपक्षांचे मिळून १२ नगरसेवक निवडून आले […]

अधिक वाचा..

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका विजयी नगरसेवकांची संपूर्ण यादी 

प्रभाग 01 अशोक हिवराळे – एमआयएम ज्योती अभंग – भाजप झिनत युनूस पटेल – एमआयएम बाळू मच्छिंद्र औताडे – उबाठा प्रभाग 02 पुष्पा रोजतकर – भाजप किशोर नागरे – शिवसेना (शिंदे गट) राज गौरव वानखेडे – भाजप सुवर्णलता उल्हास साळवे पाटील – भाजप प्रभाग 03 अफसर खान – वंचित बहुजन आघाडी अमित भुईगळ – वंचित […]

अधिक वाचा..

पुणे महापालिकेत भाजपचा एकतर्फी झंझावात; ११० जागांवर आघाडी

पुणे: पुणे महानगरपालिका निवडणुकीत भाजपने घवघवीत यश मिळवत शहराच्या राजकारणात वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. भाजप ११० जागांवर आघाडीवर असून, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांना मिळून केवळ १७ जागांपर्यंत मजल मारता आली आहे. काँग्रेसने १२ जागांवर आघाडी घेतली असली तरी ठाकरे गटाची शिवसेना आणि शिंदे गटाची शिवसेना या दोन्ही पक्षांना खातेही उघडता आलेले नाही. मनसेलाही एकही जागा […]

अधिक वाचा..