कल्याण: कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीत राहणारे नागरिकांच्या ज्वलंत प्रश्नांवर गेल्या सहा दिवसांपासून आझाद मैदान मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सचिव नोवेल साळवे यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
कल्याण च्या प्रमुख बाजारात आणि नागरिकांना गरज असल्या ठिकाणी मोफत सार्वजनिक सौचालय व मुतारी उभारण्यात यावी, रुक्मिणी बाई दवाखाना नागरिकांसाठी सुसज्ज करावेत ज्यानी नागरिकांना मोफत इलाज मिळावेत अशा अनेक नागरिकांच्या प्रश्नांवर नोवेल साळवे यांचे आंदोलन सुरू आहे.
आज साळवे यांच्या बेमुदत उपोषणाचा दखल घेऊन राज्य प्रशासनाच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्य सचिव यांचे सह सचिव मकरंद देशमुख (आय ए एस) यांनी साळवे यांना मंत्रालयात चर्चेसाठी बोलवले होते, त्या चर्चे दरम्यान सह सचिव देशमुख यांनी सकारात्मक भुमिका घेत वरील विषयावर कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाला निर्देश दिले जातील असे सांगितले