सुरक्षित शहरांसाठी ‘जेंडर सेन्सिटिव्ह’ नियोजन आवश्यक; डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: महिलांच्या सुरक्षिततेसाठी शहरांचे नियोजन करताना ‘जेंडर सेन्सिटिव्ह’ दृष्टीकोन स्वीकारणे आवश्यक असल्याचे मत Neelam Gorhe यांनी व्यक्त केले. महिलांच्या सुरक्षिततेसाठी पायाभूत सुविधा आणि सार्वजनिक गुंतवणूक या विषयावरील आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात त्या प्रमुख वक्त्या म्हणून बोलत होत्या. मुंबईची परंपरा कष्टकरी महिलांची असल्याचे सांगताना त्यांनी नमूद केले की, पूर्वी रात्रीच्या वेळी रस्त्यांवर पुरुषांचे वर्चस्व दिसत असे; मात्र आज […]

अधिक वाचा..

शेखचिल्लींच्या विकासात गुदमरतेय मुंबई; निसर्ग, नागरिक आणि नियोजनाचा प्रश्न

मुंबई: मुंबईच्या विकासाच्या नावाखाली सुरू असलेल्या अनियोजित बांधकामांमुळे शहराचा नैसर्गिक समतोल ढासळत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. खारफुटींचा नाश, मोकळ्या जागांचे कमी होत चाललेले प्रमाण आणि मोठ्या पायाभूत प्रकल्पांमुळे मुंबईकरांच्या सुरक्षेचा व भविष्यातील अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला असल्याची भावना स्थानिक नागरिकांमध्ये वाढत आहे. मुंबई विकास आराखडा २०३४ अंतर्गत शहराचा सर्वांगीण विकास, पायाभूत सुविधा सुधारणा […]

अधिक वाचा..

शिरूरमध्ये श्री शिवमहापुराण कथेला लाखोंची गर्दी; उत्कृष्ट नियोजनामुळे कार्यक्रम ठरला ऐतिहासिक

शिरूर (अरुणकुमार मोटे): धार्मिक उत्साह, भक्तीभाव आणि शिस्तबद्ध व्यवस्थापन यांचा अद्भुत संगम अनुभवायला मिळालेला “श्री शिवमहापुराण कथा” सोहळा शिरूरमध्ये ऐतिहासिक ठरला आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कथावाचक पंडीत प्रदीप मिश्रा यांच्या कथेला कथेच्या ६ व्या दिवशी लाखोंच्या संख्येने शिवभक्तांनी उपस्थिती लावल्याने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला असून, एवढ्या मोठ्या प्रमाणात जमलेली गर्दी शिरूरच्या इतिहासात अभूतपूर्व मानली जात आहे. […]

अधिक वाचा..

कुंभमेळा आयोजनाची कामे नियोजित वेळेत पूर्ण करावीत; मुख्य सचिव राजेश कुमार

मुंबई: राज्यात नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे 2027-28 मध्ये सिंहस्थ कुंभमेळा आयोजित करण्यात येत आहे. मोठ्या संख्येने भाविक पर्यटक येणे अपेक्षित असून त्यादृष्टीने कुंभमेळा प्राधिकरणासह संबंधित विभागांनी आयोजनाची सर्व कामे नियोजित वेळेत पूर्ण करावीत, असे निर्देश मुख्य सचिव राजेश कुमार यांनी दिले. मुख्य सचिव राजेश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत कुंभमेळा पूर्वतयारीचा आढावा घेण्यात आला. […]

अधिक वाचा..

हमीभाव खरेदी प्रक्रिया पारदर्शक व जलद गतीने राबवण्यासाठी नियोजन करावे; पणन मंत्री जयकुमार रावल

मुंबई: शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या शेतमालाला हमीभाव मिळावा ही सरकारची प्रामाणिक भूमिका आहे. यासाठी केंद्र सरकारकडून दरवर्षी हमीभावाने शेतमाल खरेदी केली जाते. यावर्षी सोयाबीन, मुग, उडीद, मका, तूर अशा शेतमालाची हमीभावाने खरेदी होणार आहे. या खरेदी प्रक्रियेत शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून पारदर्शकता व गतीने खरेदी प्रक्रिया राबवण्यासाठी नियोजन करावे, तसेच नोंदणीपासून ते चुकारे मिळेपर्यंत सर्व प्रक्रिया अद्ययावत […]

अधिक वाचा..

रस्ते, मेट्रो, सिंचनासारख्या पायाभूत प्रकल्पांची निर्मिती, कुंभमेळ्याचे नियोजन

मागास घटक विकासासाठी 57 हजार 509 कोटींच्या पुरवणी मागण्या सादर* मुंबई: विधीमंडळाच्या जून 2025 च्या पावसाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री तथा राज्याचे वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनी आज 57 हजार 509 कोटी 71 लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या विधीमंडळात सादर केल्या. हा निधी प्रामुख्याने राज्यात रस्ते, मेट्रो, सिंचन योजनांसारख्या पायाभूत प्रकल्पांसाठी, सिंहस्थ कुंभमेळ्याचे नियोजन व अंमलबजावणी, महात्मा […]

अधिक वाचा..

शेतकऱ्यांच्या हितासाठी खरीप हंगाम नियोजन बैठक उत्साहात पार; आमदार माऊली कटके यांचे मार्गदर्शन

शिरूर (अरुणकुमार मोटे): शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी शेती विभागाने अधिक गतिशीलतेने काम करावे, असे आवाहन आमदार ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली आबा कटके यांनी केले. शिरूर तहसील कार्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावरील सभागृहात आज सकाळी 10 वाजता खरीप हंगाम नियोजन व आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ही बैठक तालुका कृषी अधिकारी शिरूर व हवेली आणि पंचायत समिती शिरूर व हवेली […]

अधिक वाचा..

लातूर शहराच्या उन्हाळी पाणीपुरवठ्यासाठी ठोस नियोजन करावे 

मुंबई: उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर लातूर शहरातील नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी ठोस नियोजन करावे. लातूर महानगरपालिकेने जलसाठ्यांचा आढावा घेत पाणीवापराचे नियोजन करावे. तसेच आवश्यक ठिकाणी टँकरची संख्या वाढवून नागरिकांना दिलासा द्यावा. पाण्याचा सुयोग्य वापर करावा आणि पाणी वाचविण्याबाबत जनजागृती करण्यात यावी, अशा सूचना विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी महानगरपालिका प्रशासनाला दिल्या. विधानभवनात लातूर महानगरपालिका कचरा, वाहतुक व्यवस्था, […]

अधिक वाचा..

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वित्त व नियोजन विभागाची जबाबदारी

मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे राज्याच्या वित्त व नियोजन विभागाच्या मंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तत्पूर्वी सकाळी त्यांनी दोन्ही विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची मंत्रालयात बैठक घेऊन वित्त व नियोजन विभागाच्या सद्यस्थितीची माहिती तसेच कामकाजाचा आढावा घेतला. अतिरिक्त मुख्य सचिव नितीन करीर, अतिरिक्त मुख्य सचिव ओमप्रकाश गुप्ता यावेळी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वित्त व नियोजन […]

अधिक वाचा..

कोरेगाव भीमाच्या कार्यक्रमात बसचे नियोजन कोलमडले

नागरिकांना बस उपलब्ध करुन देण्यास प्रशासनाची तारांबळ शिक्रापूर (शेरखान शेख): कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील शौर्यदिनी विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना पुराविण्यात आलेल्या बस अपुऱ्या पडल्याने बसचे नियोजन कोलमडल्याचे दिसून आले असून नागरिकांना बस उपलब्ध करुन देण्यासाठी पोलिसांसह प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली आहे. कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथे 1 जानेवारी २०१८ रोजी झालेल्या हिंसाचाराच्या नंतर […]

अधिक वाचा..