केसनंद येथील भीषण अपघातात शिरुर तालुक्यातील तीन तरुणांचा जागीच मृत्यू तर एकजण जखमी

क्राईम मुख्य बातम्या

वाघोली (प्रतिनिधी) केसनंद (ता.हवेली) येथे रविवार (दि २८) एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजुन 10 मिनिटांच्या दरम्यान जोगेश्वरी माता मंदिराच्या समोरील वळणाला मालवाहतूक कंटेनर व इको कारचा गाडीचा समोरासमोर झालेल्या अपघातात शिरुर तालुक्यातील सणसवाडी येथील ३५ व ३६ वयोगटातील ३ तरुणांचा मृत्यू झाला तर १ जण जखमी झाला आहे. याबाबत लोणीकंद पोलीस स्टेशन येथे बालचंद्र शिवाजी पांचाळ (वय ३६) सध्या रा.वाघोली, मुळ रा. कौठाळा ता. देवणी, जि. लातुर यांनी फिर्याद दिली आहे.

 

लोणीकंद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवार (दि २८) एप्रिल रोजी रोजी सायंकाळी 7:10 च्या सुमारास केसनंद येथील जोगेश्वरी मंदिरासमोर केसनंद कडुन लोणीकंदकडे जाणाऱ्या रोडवर मालवाहतूक कंटेनर क्रमांक एन एल ०१ ए एफ ०७५३ वरील चालक मच्छिंद्र तुकाराम जाधव (रा. गावठाण, काराठी ता. बारामती जि.पुणे) याने वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करत मालवाहू ट्रक भरधाव वेगाने चालवत चारचाकी इको गाडी क्रमांक एम.एच.१४-जी.एच.४०२७ या गाडीस समोरासमोर धडक दिली.

 

त्यामुळे इको कार मधील गणेश सुखलाल जाधव (वय ३५), विनोद तुकाराम भोजणे (वय ३६) विठ्ठल प्रकाश जोगदंड, (वय ३६) रा. एल.एन.टी. फाटा सणसवाडी, ता शिरुर, जि.पुणे हे तिघेही गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. तर हेमंत लखमन दलाई (वय ३०) रा. पाबळ चौक, शिक्रापुर, ता. शिरुर जि.पुणे याला गंभीर दुखापत झाली आहे. वरील तिनही व्यक्तींच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कंटेनर चालक मच्छिंद्र तुकाराम जाधव रा. गावठाण, काराठी ता. बारामती जि पुणे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

जखमीना बाहेर काढण्यासाठी स्थानिक नागरिकांची मदत
लोणीकंद-थेऊर रस्त्यावर झालेला अपघात इतका भीषण व गंभीर होता की जखमींना गाडीतुन बाहेर काढण्यासाठी पोलीस व नागरिकांना एक तास लागला. यावेळी पोलीस निरीक्षक ढाकणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिरीष भालेराव, पोलीस उपनिरीक्षक केदार, पोलीस उपनिरीक्षक कोळपे, पोलीस कॉन्स्टेबल भुजबळ, विशाल गायकवाड, ढवळे, व वाहतूक पोलीस कॉन्स्टेबल गिरी यांनी मदत केली.

भीषण अपघात; लोणीकंद-थेऊर रस्त्यावर अपघातात दोघांची प्रकृती चिंताजनक तर पाच जण जखमी

रांजणगाव सोसायटीची मार्च अखेर शंभर टक्के कर्ज वसुली, नवीन इमारतीसाठी बँकेत 34 लाख मुदत ठेव

शिरुर तालुक्यातील शिंदेवाडी येथे बैलगाडा घाटात भावकीत तुंबंळ हाणामारी; एकाचा मृत्यू