कासारी येथील महानुभव आश्रमाच्या आवारात जेसीबीच्या साह्याने तोडफोड केल्याने पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

मुख्य बातम्या शिरूर तालुका

कारेगाव (तेजस फडके) तळेगाव ढमढेरे-न्हावरे रस्त्याच्या कडेला कासारी (ता. शिरुर) गावच्या हद्दीत असणाऱ्या श्रीकृष्ण मंदिर महानुभव आश्रम (माळवाडी) परीसरातील आश्रमाची संरक्षण भिंत, पिण्याच्या पाण्याच्या सिमेंटच्या टाक्या तसेच आश्रमाच्या आवारातील नारळ, कडुनिंब व इतर झाडे जेसीबीच्या साहाय्याने जबरदस्तीने पाडुन दमदाटी व शिवीगाळ केल्याप्रकरणी शिक्रापुर पोलिस ठाण्यात सुदर्शन दत्तराज सिन्नरकर यांनी फिर्याद दाखल केल्याने पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

शिक्रापुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोन दिवसांपुर्वी दुपारी 2 च्या सुमारास कासारी गावच्या हद्दीत असणाऱ्या श्रीकृष्ण मंदिर महानुभव आश्रम (माळवाडी) येथे आश्रमातील दत्तराज सिन्नरकर व त्यांचे शिष्य प्रार्थना करत बसले होते. यावेळी शामराव बबन फुलावरे हा आश्रमाच्या आवारात जेसीबी (JCB) मशीन घेवुन येवुन रोडचे काम करु लागला तेव्हा जेसीबी (JCB) चा आवाज आल्याने बाहेर फिर्यादी सुदर्शन सिन्नरकर हे बाहेर आले. तेव्हा जेसीबी (JCB) च्या साह्याने रस्त्याचे काम सुरु होते.

 

त्यावेळी फिर्यादी यांनी दत्तराज सिन्नरकर यांना हि बाब सांगितली. त्यानंतर दत्तराज सिन्नरकर यांनी बाहेर येवुन शामराव बबन फुलावरे यांना तुम्ही कोणाच्या संमतीने रस्त्याचे काम सुरु केले असे म्हणाल्याच्या कारणावरुन शामराव फुलावरे व त्याची पत्नी जयश्री फुलावरे, मुलगा ऋशिकेष फुलावरे तसेच पुतण्या चक्रधर रामभाऊ फुलावरे यांनी फिर्यादी सुदर्शन सिन्नरकर आणि दत्तराज सिन्नरकर यांना शिवीगाळ तसेच दमदाटी करत आश्रमावरील महानुभाव पंताचा धर्मध्वज पाडुन त्याचे नुकसान केले आहे. त्यामुळे शिक्रापुर पोलिस ठाण्यात सुदर्शन सिन्नरकर यांच्या फिर्यादी वरुन जेसीबी (JCB) चालक सुनिल बाळु रासकर याच्यासह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

नक्की काय आहे प्रकरण…?

तळेगाव ढमढेरे-न्हावरे रस्त्याच्या कडेला कासारी (ता. शिरुर) गावच्या हद्दीत असणाऱ्या श्रीकृष्ण मंदिर महानुभव आश्रम (माळवाडी) परीसरातील जमिन गट नं 656 मधील काही क्षेत्र सन 1994 मध्ये शामराव बबन फुलावरे यांचेकडुन 4 गुंठे तसेच सन 2006 मध्ये 5 गुंठे जागा महंत दत्तराज बाबा सिन्नरकर यांनी रितसर खरेदी केली असुन श्रीकृष्ण मंदिर महानुभव आश्रमात दत्तराज सिन्नरकर आणि त्यांचे शिष्य सुदर्शन सिन्नरकर यांच्यासह 6 पुरुष व 7 महिला राहत असुन हे सर्वजण महानुभाव धर्माचा प्रचार व प्रसार करत आहेत. परंतु शामराव फुलावरे आणि त्यांच्या कुटुंबियांनी जबरदस्तीने अतिक्रमण करत जेसीबीच्या साह्याने महानुभव आश्रमाच्या परीसराचे नुकसान केले आहे.

 

महानुभव संप्रदायाच्या भावना दुखावल्या…

कासारी गावच्या हद्दीत असणाऱ्या माळवाडी येथील जमिन गट नं 656 मधील महानुभाव आश्रामाच्या आवारात वरील पाच जणांनी अनधिकृतपणे जेसीबी (JCB) मशीनच्या साहयाने अतिक्रमण करुन रस्त्याची खोदाई करत आश्रमातील महंत आणि त्यांच्या शिष्याला शिवीगाळ व दमदाटी केली तसेच महानुभाव पंताचा धर्मध्वज पाडुन धर्माचा अपमान केल्याने महानुभव संप्रदायाच्या भावना दुखावल्या असुन त्यामुळे महानुभव संप्रदायाचे अनुयायी प्रचंड चिडलेले आहेत. त्यामुळे सदर आरोपींना तातडीने अटक करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

 

शिरुरचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले तसेच शिक्रापुर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस हवालदार किशोर तेलंग हे करत आहेत.

केसनंद येथील भीषण अपघातात शिरुर तालुक्यातील तीन तरुणांचा जागीच मृत्यू तर एकजण जखमी

शिरुर तालुक्यातील शिंदेवाडी येथे बैलगाडा घाटात भावकीत तुंबंळ हाणामारी; एकाचा मृत्यू

रांजणगाव सोसायटीची मार्च अखेर शंभर टक्के कर्ज वसुली, नवीन इमारतीसाठी बँकेत 34 लाख मुदत ठेव