datta-gade-police-dress

स्वारगेट बलात्कार प्रकरण! दत्ता गाडे आणि युवतीच्या संबंधाबाबत वकिलांचा दावा…

पुणे: स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी आणि पीडिता यांच्यात पूर्वी कोणताही संपर्क नव्हता तसेच कोणताही आर्थिक व्यवहार झालेला नाही. त्यामुळे आरोपीस जामिनावर सोडल्यास पीडितेच्या जीवितास गंभीर धोका निर्माण होईल, असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील ॲड. अजय मिसार आणि पीडितेच्या वतीने ॲड. श्रीया आवले यांनी न्यायालयात केला. आरोपी दत्ता गाडे यांच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या जामिनाच्या अर्जावर […]

अधिक वाचा..

पुणे जिल्ह्यात पहिल्यांदाच पारदर्शक बदल्या: जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची क्रांतिकारी कारवाई

शिरूर (अरुणकुमार मोटे): पुणे जिल्ह्यात महसूल प्रशासनात ऐतिहासिक पाऊल टाकण्यात आलं असून, पहिल्यांदाच तलाठी, मंडळ अधिकारी, महसूल सहाय्यक आणि सहाय्यक महसूल अधिकारी यांच्या पारदर्शक बदल्या करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, या बदल्यांमध्ये एक रुपयाही लाच किंवा राजकीय दबाव न घेताच जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी संपूर्ण प्रक्रिया पार पाडली आहे. त्यामुळे प्रशासनात प्रामाणिकपणाला चालना मिळाली असून, […]

अधिक वाचा..

गिग कामगारांचे हक्क, पुणे येथील MPSC च्या अपघातग्रस्त उमेदवारांची संधी आणि पुणे नाट्यगृहांची दुरवस्था

पुणे: महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज पुण्यात मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन राज्याच्या सामाजिक आणि सांस्कृतिक विकासास महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या तीन प्रमुख मुद्द्यांवर सविस्तर निवेदनं सादर केली. या निवेदनांमध्ये अ‍ॅप आधारित गिग व प्लॅटफॉर्म सेवा क्षेत्रातील कामगारांच्या हक्कांचे रक्षण, अपघातग्रस्त व अपंग उमेदवारांसाठी परीक्षेची विशेष संधी, आणि पुणे महानगरपालिका क्षेत्रातील नाट्यगृहांच्या […]

अधिक वाचा..

पुण्यातील चंदननगर येथील झोपडपट्टीत भीषण आग

पुणे: पुण्यातील चंदननगर येथील झोपडपट्टीमध्ये बुधवार (दि.२३) रेजी लागलेल्या भीषण आगीत ९० हन अधिक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले असून, शेकडो नागरिक उघड्यावर आले आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार, जिल्हाधिकारी, पुणे मनपा आयुक्त यांना त्वरीत मदत आणि पुनर्वसनाच्या उपाययोजना […]

अधिक वाचा..
pune-nagar-highway

पुणे-नगर महामार्गावरील ५६ किमी उड्डाणपुलाचा मार्गामध्ये पुन्हा बदल…

पुणे: पुणे-नगर महामार्गावरील वाहतूक कोंडी, अपघातांचे वाढते प्रमाण आणि पाणीटंचाईसारख्या समस्यांचा अखेर राजकीय आणि प्रशासकीय पातळीवरून गांभीर्याने विचार झाला आहे. या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या ठोस निर्णयांमुळे महत्त्वपूर्ण बदल घडणार आहेत. मूळ नियोजनानुसार पुणे-शिरूर दरम्यान प्रस्तावित असलेला ५६ किमी लांबीचा दुमजली उड्डाणपूल वाघोली येथून सुरू होणार होता. मात्र अजित […]

अधिक वाचा..

पुण्यात वेळेत उपचार न मिळाल्याने गर्भवती महिलेचा मृत्यू

मुंबई: पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात तातडीने उपचार न मिळाल्याने तनिषा भिसे या भगिनीला आपला प्राण गमवावा लागला. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून, शासनाने याची गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी तज्ज्ञ डॉक्टरांच्या समितीद्वारे करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. या दुर्दैवी घटनेची गांभीर्याने दखल घेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे […]

अधिक वाचा..

पुणे पिंपरी-चिंचवड शहरासंबंधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय

पुणे: पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांसह आसपासच्या ६ हजार चौरस किलोमीटर परिसराच्या विकासासाठी तयार करण्यात आलेला पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा प्रारूप विकास आराखडा राज्य सरकारने रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय घेतला असल्याचे वृत्त आहे. न्यायालयीन प्रक्रियेत अडकल्याने गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेली ही प्रक्रिया आता पुन्हा नव्याने सुरू करावी […]

अधिक वाचा..
pune-nagar-highway

पुणे-शिरूर सहापदरी कॉरिडोर प्रकल्पाबाबत मोठी माहिती…

पुणेः पुणे शहरासह पुणे-नगर महामार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमचा निकाली निघावा यासाठी शासनाच्या माध्यमातून रस्ते विकासाचे विविध प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. यातील सर्वात मोठा प्रकल्प म्हणजे पुणे रिंग रोड प्रकल्प. खरे तर पुणे शहरात दोन रिंग रोड तयार होणार आहेत एक रिंग रोड पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून तयार केला जाणार आहे तर […]

अधिक वाचा..

मुंबई, पुणे मध्ये उबाठा व रायगड मध्ये राकॉंपा शरद पवार गटाला खिंडार

मुंबई: हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना पुढे घेऊन जाणारे शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास दाखवत आज मुंबई, पुणे येथील उबाठाच्या व रायगड राकॉंपा शरद पवार गटाच्या आगरी कोळी समाजाच्या अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. यात उबाठा गटाच्या […]

अधिक वाचा..

पुण्यातील शिवाजीनगर परिसराचे ‘छत्रपती शिवाजी महाराज नगर’ असे नामकरण करण्यात यावे

मुंबई: पुण्यातील ऐतिहासिक आणि महत्त्वाच्या शिवाजीनगर परिसराचे नाव ‘छत्रपती शिवाजी महाराज नगर’ असे करण्यात यावे, अशी विनंती विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शासनाला केली आहे. “पुणे शहरातील शिवाजीनगर मेट्रो सटेशनला छत्रपती शिवाजी महाराज नगर नाव देण्यात यावे. या मागणीसाठी (दि. २४) जून २०२४ रोजी शिवप्रेमी संघटनांच्या वतीने पदयात्रा आणि मोर्चे काढण्यात आले होते. त्यावेळी […]

अधिक वाचा..