भूमी अभिलेख विभागातील कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक

मुंबई: राज्य शासन गतिमान आणि पारदर्शकपणे काम करीत आहे. यामध्ये महसूल विभागाची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. भूमी अभिलेख विभागातील मोजणीदारांच्या विविध मागण्यांबाबत शासन सकारात्मक असून त्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोजणीदार संघटनांसमवेत झालेल्या बैठकीत सांगितले. या बैठकीनंतर संघटनांच्या प्रतिनिधींनी तत्काळ कामावर रुजू होत असल्याचे जाहीर केले. सातव्या […]

अधिक वाचा..

पुणे पिंपरी-चिंचवड शहरासंबंधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय

पुणे: पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांसह आसपासच्या ६ हजार चौरस किलोमीटर परिसराच्या विकासासाठी तयार करण्यात आलेला पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा प्रारूप विकास आराखडा राज्य सरकारने रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय घेतला असल्याचे वृत्त आहे. न्यायालयीन प्रक्रियेत अडकल्याने गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेली ही प्रक्रिया आता पुन्हा नव्याने सुरू करावी […]

अधिक वाचा..

एचएसआरपी नंबरप्लेटवरून जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना लिहिले पत्र अन…

मुंबई: वाहनांची सुरक्षा आणि ओळख सुनिश्‍चित करण्यासाठी महाराष्ट्र राज्याने एचएसआरपी (मान्यताप्राप्त सुरक्षित असलेली नोंदणीकृत नंबर प्लेट) वापरणे अनिवार्य केले आहे. मात्र इथेही महाराष्ट्रातील नागरिकांना लुटण्याचा कार्यक्रम सुरू आहे की काय असा प्रश्न उद्भवला आहे असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. याबाबत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील […]

अधिक वाचा..

विद्यार्थी हितासाठी कॅरी ऑन योजनेसदर्भात विद्यापीठाने सकारात्मक निर्णय घ्यावा

मुंबई: राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठांमध्ये विद्यार्थी हितासाठी “कॅरी ऑन योजना” लागू करण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षेची संधी देण्यासाठी विद्यापींठाच्या पातळीवर एक समानता ठेवावी अशा सूचना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केल्या. मंत्रालयात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सर्व आकृषी विद्यापींठाच्या कुलगुरूची ऑनलाईन बैठक आयोजित करण्यात आली होती. […]

अधिक वाचा..

संविधान बदलासंदर्भातील वक्तव्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खुलासा करावा; नाना पटोले

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान बदलण्याची भाषा आरएसएस व भाजपामधून सातत्याने केली जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आर्थिक सल्लागार विवेक देबरॉय यांनी एका लेखात संविधान बदलण्याची भाषा केली आहे. विवेक देबरॉय यांच्याप्रमाणेच भाजपच्या कृपेने राज्यसभा खासदार झालेले निवृत्त सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनीही संविधानाचा मूळ ढांचा बदलण्याची गरज व्यक्त केली आहे. या दोघांच्या […]

अधिक वाचा..

महाराष्ट्रातील परदेशी गुंतवणुकीच्या सामंजस्य करारांबाबतचा कृती आराखडा तयार करावा

मुंबई: राज्यात होणारी परदेशी गुंतवणूक आणि परदेशातील विविध उद्योग संघटनांबरोबर आतापर्यंत केलेले सामंजस्य करार आणि त्यावरील कार्यवाहीचा आढावा घेवून या करारांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कृती आराखडा तयार करावा, अशा सूचना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिल्या. विधानभवनात काल गुरुवार (दि. 13) रोजी सायंकाळी उपसभापती डॉ. गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली उद्योजक संघटना व उद्योग विभागाच्या अधिकाऱ्यांची […]

अधिक वाचा..

सारथीच्या शैक्षणिक सवलती, सुविधांसंदर्भात लवकरच सर्वंकष समान धोरण ठरवणार

मुंबई: मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती आणि सुविधा देण्यासाठी शासन सकारात्मक आहे. सारथीमार्फत देण्यात येणाऱ्या शैक्षणिक सवलती आणि सुविधाबाबत सर्वंकष समान धोरण ठरविण्याबाबत बार्टी, टीआरटीआय, महाज्योती आणि सारथी या संस्थांची लवकरच बैठक घेण्यात येणार आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षण […]

अधिक वाचा..

कांदयाच्या कवडीमोल भावामुळे तहसिलदारांना शिवसेना, युवासेना, शेतकरीसेना यांच्या वतीने निवेदन…

शिरुर: शेतकऱ्यांच्या कांदयाला योग्य बाजार भाव नसल्याने सरकारने नुकसान भरपाई देवून नाफेडमार्फत कांदा खरेदी करावा यासाठी शिरुर तालुका शिवसेना, युवासेना, शेतकरीसेना यांच्या वतिने शिरुर तहसिल कार्यालय येथे अव्वल कारकुन निलेश घोडके यांना निवेदन देण्यात आले. तालुक्यातील शेतकर्‍यांच्या कांद्याला योग्य भाव नसल्यामुळे शिरुर तालुक्यातील गरीब शेतकरी मोठया आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्या संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांना सरकारने […]

अधिक वाचा..

विधानसभा इतर कामकाज लक्षवेधी, कुष्ठरोग निर्मूलन व पुनर्वसन संदर्भात धोरण ठरविणार

मुंबई: राज्यातील कुष्ठरोग निर्मूलनासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. कुष्ठ रुग्णांच्या अडचणी समजून घेऊन त्यांच्यासाठी रोजगार निर्मिती, त्यांचे पुनर्वसन यासंदर्भात समिती गठित करण्यात येणार आहे. या समितीच्या अहवालानुसार सर्वंकष धोरण तयार करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितले. कुष्ठरोगी यांचे पुनर्वसन याबाबत सदस्य सर्वश्री जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे, योगेश सागर, राजेश टोपे, प्रणिती […]

अधिक वाचा..

MEPL कंपनीबाबत येत्या अधिवेशनात तारांकित प्रश्न मांडावा शेखर पाचुंदकर यांची दिलीप वळसेंकडे मागणी

रांजणगाव गणपती (तेजस फडके): आशिया खंडातील पंचंतारांकित औद्योगिक वसाहत असलेल्या शिरुर तालुक्यातील रांजणगाव MIDC तील महाराष्ट्र इन्व्हारो प्रायव्हेट लिमिटेड (MEPL) कंपनीच्या प्रदुषणामुळे निमगाव भोगी, कारेगाव, आण्णापुर, सरदवाडी, रामलिंग आणि शिरुर शहर येथील जमीनी नापिक झालेल्या आहेत. तसेच पिण्याचे पाणी प्रदूषित झाल्यामुळे स्थानिक ग्रामस्थांच्या आरोग्याचे प्रश्न ऐरणीवर आले आहेत. यासंदर्भात येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये लक्षवेधी किंवा तारांकित […]

अधिक वाचा..