कांदयाच्या कवडीमोल भावामुळे तहसिलदारांना शिवसेना, युवासेना, शेतकरीसेना यांच्या वतीने निवेदन…

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर: शेतकऱ्यांच्या कांदयाला योग्य बाजार भाव नसल्याने सरकारने नुकसान भरपाई देवून नाफेडमार्फत कांदा खरेदी करावा यासाठी शिरुर तालुका शिवसेना, युवासेना, शेतकरीसेना यांच्या वतिने शिरुर तहसिल कार्यालय येथे अव्वल कारकुन निलेश घोडके यांना निवेदन देण्यात आले.

तालुक्यातील शेतकर्‍यांच्या कांद्याला योग्य भाव नसल्यामुळे शिरुर तालुक्यातील गरीब शेतकरी मोठया आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्या संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांना सरकारने त्वरीत नुकसान भरपाई द्यावी,व नाफेड मार्फत त्वरित कांदा खरेदी करावा आदी मागण्या करण्यात आल्या.

याप्रसंगी शिवसेना उपतालुकाप्रमुख अनिल पवार, शेतकरीसेना तालुकाप्रमुख योगेश ओव्हाळ पाटील, शहरप्रमुख सुनिल जाधव, तालुका सल्लागार संतोष काळे, ज्येष्ठ शिवसैनिक खुशाल गाडे, आनंदाराव ढोरजकर, विलास खांडरे, सुनिल जठार,अविनाश घोगरे, अनिल सातकर, आण्णा रेड्डी, महेंद्र येवले, आकाश चौरे, शेतकरी आबा जेऊघाले, मोहन वाळुंज, अविनाश वाळुंज उपस्थित होते.