anubhavanchya-paulkhuna

शेरखान शेख यांनी लिहिलेल्या ‘अनुभवांच्या पाऊलखुणा’ पुस्तकाचे प्रकाशन!

शिक्रापूर : शिक्रापूर (ता. शिरूर) येथील पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते व प्राणीमित्र शेरखान शेख यांनी त्यांच्या विविध कार्यांच्या माध्यमातून केलेल्या कामात आलेल्या अनुभवांतून लिहिलेल्या ‘अनुभवांच्या पाऊलखुणा’ या पुस्तकाचे रविवारी (ता. ३०) प्रकाशन करण्यात आले. ईश्वरी प्रकाशन, पुणे यांच्या वतीने हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे […]

अधिक वाचा..
body

शिरूर तालुक्यातील भीमा नदीच्या पात्रात हात-पाय दोरीने घट्ट बांधलेला मृतदेह आला समोर…

शिरूर : शिरूर तालुक्यातील टाकळी भीमा हद्दीतील भीमा नदीच्या पात्रात थरारक गुन्ह्याची उकल करणारी घटना समोर आली. नदीच्या प्रवाहात तरंगत असलेला एका ३० ते ३५ वर्षीय अज्ञात पुरुषाचा मृतदेह अचानक समोर आला. धक्कादायक बाब म्हणजे, या पुरुषाचे हात-पाय दोरीने घट्ट बांधलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात एकाच खळबळ उडाली आहे. नदी पात्रात फुगलेल्या आणि छिन्नविछिन्न अवस्थेत […]

अधिक वाचा..
shirur-gaun-khanij

शिरूर तहसिल कार्यालयाच्या गौण खनिज विभागाची ‘खुर्ची’ संध्याकाळी सहा नंतर खाजगी एजंटांच्या ताब्यात…?

खाजगी व्यक्तींच्या हस्तक्षेपामुळे महसूल प्रशासनाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह…? शिरूर (तेजस फडके): शासकीय कार्यालय म्हणजे जनतेच्या कामासाठी उभारलेली व्यवस्था. येथे प्रत्येक टेबल, प्रत्येक खुर्ची आणि प्रत्येक फाईलला शासनाची जबाबदारी जोडलेली असते. मात्र, शिरुर तहसील कार्यालयातील गौण खनिज विभागाच्या कामकाजाबाबत समोर येणाऱ्या तक्रारींमुळे ‘या विभागाचा कारभार नेमका अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या हातात आहे की खाजगी एजंटांच्या…?’ असा थेट सवाल उपस्थित झाला […]

अधिक वाचा..
balrangbhumi-2026

नाट्यछटा स्पर्धेसाठी 500 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

बालरंगभूमी परिषदेतर्फे ‘कै. सौ.मनीषाताई भाऊसाहेब भोईर स्मृती नाट्यछटा स्पर्धा’ 2026 उत्साहात संपन्न शिक्रापूर: बालरंगभूमी परिषद, पुणे जिल्हा शाखा आणि पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीने आयोजित कै. सौ. मनिषा भाऊसाहेब भोईर स्मृती नाट्यछटा स्पर्धा 2026 ही स्पर्धा रविवार, दि. 23 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9 वाजता युरो कॅम्पस, शिक्रापूर येथे मोठ्या उत्साहात पार पडली. बालकलाकारांच्या कलागुणांना व्यासपीठ […]

अधिक वाचा..

शिरुरमध्ये ५६ ग्रॅम एमडीसह दोघे जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची आठवड्यातील तिसरी कारवाई 

शिरुर (तेजस फडके): शिरुर पोलीस स्टेशनच्या हद्दीत ‘एमडी’ अंमली पदार्थाची बेकायदेशीर विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ५६ ग्रॅम वजनाचा प्रतिबंधित एमडी अंमली पदार्थ, मोटारसायकल आणि दोन मोबाईल फोन असा एकूण ११ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. विशेष म्हणजे, स्थानिक गुन्हे शाखेने मागील आठवड्यात अंमली पदार्थांविरोधात […]

अधिक वाचा..

शिरुरमधील घरफोडीचा छडा; तीन चोर जेरबंद १२१ ग्रॅम सोन्यासह २०० ग्रॅम चांदीचे दागिने हस्तगत 

शिरुर (तेजस फडके): शिरुर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दाखल असलेल्या घरफोडी चोरीच्या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) तांत्रिक तपासाच्या आधारे छडा लावत तीन संशयित चोरट्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरीस गेलेले १२१ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि २०० ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने, असा बाजारमूल्यानुसार सुमारे १८ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. आरोपींनी इतर […]

अधिक वाचा..

शिरुरमध्ये गोळीबार करुन दहशत माजविणाऱ्या कुख्यात टोळीवर मोक्का; ११ जणांचा सहभाग, २२ गंभीर गुन्ह्यांची नोंद

शिरूर (तेजस फडके): शिरुर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदेशीर अग्निशस्त्रांचा वापर करुन गोळीबार, खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, जबरी चोरी आणि संघटित गुन्हेगारीच्या माध्यमातून दहशत निर्माण करणाऱ्या इशप्पा ऊर्फ विशाल जगन्नाथ पंदी (वय २४, रा. वाघोली, ता. हवेली, जि. पुणे) याच्या नेतृत्वाखालील ११ जणांच्या टोळीविरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) अंतर्गत कारवाईला विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर […]

अधिक वाचा..
mahavitaran-advt

करडे-कारेगाव रस्त्यालगत विद्युत खांबांवर प्लॉटिंग, जमीन-विक्रीच्या जाहिरातींचा सुळसुळाट; महावितरणची यंत्रणा नेमकी करतेय काय…?

रांजणगाव गणपती (तेजस फडके) : करडे-कारेगाव रस्त्याच्या कडेला उभारण्यात आलेले महावितरणचे विद्युत खांब सध्या वीजपुरवठ्यापेक्षा प्लॉटिंग आणि जमीन-विक्रीच्या जाहिरातींसाठी अधिक चर्चेत आले आहेत. रस्त्यालगत असलेल्या अनेक विद्युत खांबांवर विविध प्लॉटिंग प्रकल्प, जमीन-विक्रीच्या जाहिरांतीचे होल्डिंग लावण्यात आल्याचे चित्र दिसत असून, सार्वजनिक मालमत्तेचा अशा प्रकारे खासगी जाहिरातींसाठी वापर होत असताना महावितरणचे संबंधित अधिकारी नेमकी कोणती भूमिका घेत […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

शिरूर हादरलं! लॉजमध्ये युवतीवर 7 जणांचा आळीपाळीने अत्याचार; पाहा नावे…

शिरूर : चांगल्या पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवून एका परप्रांतीय युवतीला (वय २२) लॉजमध्ये डांबून तिच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात सात जणांविरोधात विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित युवती ही मूळची छत्तीसगड येथील रहिवासी असून ती सध्या चाकण परिसरात वास्तव्यास होती. आरोपींनी तिला चांगल्या पगाराची […]

अधिक वाचा..

शिरुरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; लॉजिंगवर छापा टाकत २० ग्रॅम मेफेड्रॉनसह दोघे जेरबंद

शिरुर (तेजस फडके): शिरुर शहरातील लॉजिंगमध्ये अंमली पदार्थांची विक्री करण्याच्या उद्देशाने मेफेड्रॉन (एम.डी.) बाळगणाऱ्या दोघांना पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने रंगेहात पकडले. बुधवार (दि १९) रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास मार्वल कम्फर्ट (सुरज) लॉजिंगमध्ये करण्यात आलेल्या या कारवाईत २० ग्रॅम मेफेड्रॉनसह तब्बल ९ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. शिरूर शहरात […]

अधिक वाचा..