पिंपरखेडमध्ये शिव पाणंद शेत रस्ते चळवळीच्या समन्वयाने शेतरस्ता खुला

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर. तालुक्यातील पिंपरखेड येथील बोंबे वस्तीवर जाणारा शेतरस्ता दीड वर्षांपासून वादग्रस्त ठरला होता. मात्र महसूलमंत्री व शासनाने शेतरस्ते खुले करण्याच्या मोहिमेसह शिव पाणंद शेत रस्ते चळवळीच्या पुढाकारामुळे अखेर हा शेतरस्ता खुला झाला. विशेष म्हणजे, सुरुवातीला मोठा विरोध असतानाही कसलाही पोलिस बंदोबस्त नसताना समन्वय साधत तणाव कमी करुन प्रशासनाने व चळवळीच्या कार्यकर्त्यांनी रस्ता […]

अधिक वाचा..
crime

शिरुर तालुक्यात कंपनीतुन तब्बल १६ लाखांची कॉपर ट्यूब चोरी; औद्योगिक सुरक्षेवर प्रश्नचिन्ह…?

न्हावरे (अक्षय टेमगिरे) शिरुर तालुक्यातील करडे हद्दीत असलेल्या एस. व्ही. एस. रेफकॉम प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतून तब्बल १६ लाख ३३ हजार रुपयांचा कॉपर ट्यूबचा साठा चोरट्यांनी लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या मोठ्या चोरीमुळे औद्योगिक परिसरातील सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याबाबत नामदेव महादु गाडेकर (वय ३७, रा. मराठानगर, केडगाव, जि. अहिल्यानगर) यांनी […]

अधिक वाचा..

कारेगावात “शिवतीर्थ प्रतिष्ठान” तर्फे भव्य सार्वजनिक नवरात्रोत्सव

रांजणगाव गणपती (तेजस फडके) कारेगाव (ता. शिरुर) येथे संस्कृती आणि कला यांचा संगम घडवणारा ‘सार्वजनिक नवरात्र उत्सव २०२५’ यंदा मोठ्या उत्साहात पार पडत आहे. “शिवतीर्थ प्रतिष्ठान” आयोजित या उत्सवाची सुरुवात सोमवार दि २२ सप्टेंबर २०२५ रोजी झाला असुन संपूर्ण आठवडाभर विविध धार्मिक, सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमांची मेजवानी ग्रामस्थांना अनुभवायला मिळणार आहे. या कार्यक्रमाचे उदघाटन देवीच्या […]

अधिक वाचा..

रांजणगाव पोलीस स्टेशन हद्दीत २८ किलो गांजा जप्त; महिलेसह एक आरोपी अटक

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव MIDC पोलीस स्टेशनच्या पथकाने अंमली पदार्थविरोधी मोहिमेअंतर्गत मोठी कारवाई केली. बाभुळसर खुर्द (ता. शिरुर) येथील सृष्टी सोसायटीतील रो हाऊसवर धाड टाकुन पोलिसांनी तब्बल २८ किलो वजनाचा सात लाख रुपये किमतीचा गांजा जप्त केला आहे. या प्रकरणात एका महिलेसह एका आरोपीला अटक करण्यात आली असून, मुख्य सूत्रधार फरार आहे. दि २६ […]

अधिक वाचा..

सरकारच्या निष्क्रियतेमुळे तरुणांच्या आत्महत्या वाढत आहेत; ॲड. संग्राम शेवाळे

मुंबई (प्रतिनिधी) राज्यात दरवर्षी हजारो तरुण आत्महत्या करत आहेत. हि केवळ आकड्यांची बाब नाही, तर एका पिढीचे भविष्य अंधारात ढकलणारी भीषण वस्तुस्थिती आहे. दुर्दैवाने सरकार या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असल्याची टीका राज्य युवा धोरण समितीचे सदस्य ॲड. संग्राम शेवाळे यांनी मंत्रालयातील बैठकीत केली. राज्याचे क्रीडा व युवा कल्याण मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात प्रशासनाकडुन गोपनीयता फाट्यावर; तक्रारदारचं असुरक्षित…?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात तहसिल प्रशासनाची बेपर्वाई आणि निष्काळजीपणा वेळोवेळी उघड होत असुन तक्रारदाराने वाळू माफियां किंवा मुरुम माफिया यांच्या विरोधात दिलेली गोपनीय माहिती आणि तक्रारदाराच नाव संबंधित वाळू किंवा मुरुम माफिया पर्यंत सोयीस्करपणे पोहोचवायचं काम तहसिल कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला आहे. शासनाच्या नियमांनुसार तक्रारदाराचे नाव गुप्त ठेवणे […]

अधिक वाचा..

रांजणगाव हद्दीत ANTF ची धडक कारवाई; २५ किलो ६४२ ग्रॅम गांजा जप्त, तिघे जेरबंद

रांजणगाव गणपती (तेजस फडके) अंमली पदार्थांच्या अवैध धंद्यावर आळा घालण्यासाठी अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स (ANTF) कोल्हापूर कृती विभाग, कार्यसन पुणे व रांजणगाव पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने मोठी कारवाई करत सुमारे २५ किलो ६४२ ग्रॅम गांजा जप्त करुन तिघा संशयितांना जेरबंद केले. या प्रकरणी लाखोंचा मुद्देमाल हस्तगत झाला असून आरोपींविरुद्ध NDPS कायद्याअंतर्गत गंभीर गुन्हा नोंदविण्यात […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात अनेक लॉजवर वेश्या व्यवसाय जोमात; कारवाईची मागणी

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात नवरात्री उत्सवाच्या पार्श्वभुमीवर वेश्या व्यवसाय जोर धरत असल्याचे समोर आले आहे. या काळात गावोगाव आणि बाजारपेठांमध्ये महिलांसाठी विशेष कार्यक्रम तसेच धार्मिक समारंभ आयोजित केले जातात. मात्र, याचवेळी पुणे-नगर महामार्गावर असणाऱ्या काही गावात मुख्य चौकातील लॉजवर अनधिकृत वेश्या व्यवसाय चालत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. खात्रीलायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिरुर […]

अधिक वाचा..

नागरगाव येथे विश्व आयुर्वेद दिनानिमित्त ३ हजार आयुर्वेदिक वृक्षांचे वाटप

न्हावरे (तेजस फडके) नागरगाव (ता.शिरुर) राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळ, आयुष्य मंत्रालय भारत सरकार पुरस्कृत पश्चिम विभागीय औषधी वनस्पती सह सुविधा केंद्र, वनस्पतीशास्त्र विभाग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, बाबुराव दौंडकर स्मारक समिती, रांजणगाव गणपती व भारतीय किसान संघ यांच्या संयुक्त विद्यमाने १० वा विश्व आयुर्वेद दिन मंगळवार २३ सप्टेंबर २०२५ रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात कंटेनर चोरी; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

रांजणगाव गणपती (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील बाभुळसर खुर्द गावच्या हद्दीतून प्लॉटिंग साईटवरील एक लोखंडी कंटेनर अज्ञात चोरट्यांनी क्रेन व ट्रकच्या सहाय्याने लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी नारायण कुंडलिक गोरे (रा. तरडोबाची वाडी, गोरेमळा, ता. शिरुर, जि. पुणे) यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली असून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात […]

अधिक वाचा..