एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक 

मुंबई: चालकाला सन्मानजनक मोबदला आणि प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची हमी देणारे राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप लवकरच एसटी महामंडळ मार्फत सुरू करण्यात येत आहे. अशी माहिती परिवहन मंत्री तथा एस. टी. महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. ते मंत्रालयातील आपल्या दालनामध्ये केंद्र व राज्य शासनाच्या ॲग्रीगेटेड पॉलिसीच्या (समुच्चयक धोरण) आधीन राहून राज्य शासनाचे यात्री ॲप बनवण्याच्या […]

अधिक वाचा..

मोठा गेम होणार, भाजप प्रदेशाध्यक्षाच्या विधानाने खळबळ

मुंबई: पुढील काही महिन्यांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमधील घटक पक्ष कामाला लागले आहेत. दरम्यान सध्याची राजकीय परिस्थिती पाहाता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महायुती आणि महाविकास आघाडी म्हणून लढवल्या जाणार की स्वबळाची चाचपणी होणार? याबाबत आता प्रचंड उत्सुकता निर्माण […]

अधिक वाचा..

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचे अभिवादन

भाजपा युती सरकार बेशरम व लाचार, कोकाटेंचा राजीनामा न घेता क्रीडा मंत्रालय देऊन सन्मानच; हर्षवर्धन सपकाळ मुंबई: राज्यातील भाजपा युती सरकार हे बेशरम व लाचार असून विधानसभेत रमी खेळणाऱ्या मंत्र्यांचा राजीनामा घ्यायचा सोडून क्रीडा मंत्रालय देऊन उचित सन्मानच केला आहे. आता रमी या खेळाला ऑलिंम्पिक दर्जा देतील व तो खेळणाऱ्याला शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार देऊन सन्मानितही […]

अधिक वाचा..

गोकुळाष्टमी निमित्त राज्यातील १.५० लाख गोविंदांना विमा संरक्षण

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांच्या मागणीला यश; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला सकारात्मक प्रतिसाद मुंबई: गोकुळाष्टमी अर्थात दहिहंडी हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अत्यंत महत्त्वाचा सण असून या उत्सवात राज्यातील हजारोात युवक-युवती “गोविंदा” म्हणून थरावर थर रचत हंडी फोडण्यासाठी सहभागी होतात. मात्र गेल्या काही वर्षांत सरावादरम्यान आणि प्रत्यक्ष उत्सवाच्या दिवशी अनेक अपघात […]

अधिक वाचा..

राज्यात ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ राबवणार; देवेंद्र फडणवीस

मुंबई: विधानसभेत रमी खेळणाऱ्या कृषिमंत्र्यांवरून राजकीय वातावरण तापलेले असताना अद्यापर्यंत त्यांच्या राजीनाम्यावर ठोस निर्णय झालेला नसून, कोकाटेंना केवळ समज देण्यात आल्याचे समोर येत आहे. या सर्व तापलेल्या वातावरणात कोकाटेंना अभय देत फडणवीस सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत 8 महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. राज्यात ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ राबवणार असल्याचा निर्णयही आजच्या बैठकीत घेण्यात आला. मंत्रिमंडळात घेण्यात आलेले […]

अधिक वाचा..

राज्यात एसटी कर्मचाऱ्यांवर हल्ले सुरुच; रांजणगावजवळ लोखंडी रोडने वाहकावर हल्ल्याचा प्रयत्न

रांजणगाव गणपती (तेजस फडके): राज्यात एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या हल्ल्यांची मालिका काही केल्या थांबत नसुन असाच एक धक्कादायक प्रकार पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील रांजणगाव जवळ घडला. काही अज्ञात व्यक्तींनी थेट लोखंडी रोड घेऊन एसटीच्या वाहकावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे वेळेवर हस्तक्षेप करण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला. या प्रसंगात वाहक सुखरुप बचावला असला तरी […]

अधिक वाचा..

राज्यातील महापालिका रुग्णालयांमध्ये महिलांसाठी कर्करोग तपासणीची मोहीम हाती घ्यावी

ठाणे जिल्हा रुग्णालय एमएमआर मधील नागरिकांसाठी वरदान ठरणार मुंबई: ठाणे जिल्हा रुग्णालयाचे काम तातडीने पूर्ण करून नागरिकांच्या सेवेसाठी ते लवकरात लवकर दाखल झाले पाहिजे यादृष्टीने कामाला गती द्यावी. हे रुग्णालय मुंबई महानगर प्रदेशातील नागरिकांसाठी वरदान ठरणार असून अद्ययावत यंत्रसामुग्री घेतानाच १०७८ नवीन पदभरतीची प्रक्रिया देखील सुरू करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे […]

अधिक वाचा..

गृहराज्यमंत्र्यांशी संबंधित डान्सबारचे एकनाथ शिंदेंकडून निर्ल्लजपणे समर्थन

भाजपाच्या इशाऱ्यावर नाचणाऱ्या एकनाथ शिंदेंनी काँग्रेस बद्दल बोलण्याआधी माहिती घ्यावी; डान्सबार बंदी काँग्रेस आघाडी सरकारनेच केली  मुंबई: भाजपा युती सरकार हे महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे, सत्तेला चिकटून राहण्यासाठी यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. सत्ताधारी पक्षाचे आमदार, पदाधिकारी व मंत्र्यांनीच ताळतंत्र सोडले असे नाही तर मुख्यमंत्रीपद भूषवलेले व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही ‘कंबरेचे सोडून डोक्याला […]

अधिक वाचा..

राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक

मुंबई: मागील काही महिन्यांपासून राज्यातील शैक्षणिक धोरणात हिंदी भाषेच्या मुद्द्यावरून बराच वाद निर्माण झाला होता. राज्य शासनाने पहिलीपासून हिंदी सक्तीचा जीआर काढला आणि त्याला मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी जाहीर विरोध केला. त्यानंतर दुसरा जीआर शासनाने काढला त्यात हिंदीशिवाय इतर भाषांचा समावेश करण्यात आला. राज्यातील या त्रिभाषा सूत्राला मोठ्या स्तरावर लोकांमधून विरोध होऊ लागला. त्यानंतर […]

अधिक वाचा..

राज्यात खळबळ! रोहिणी खडसेंच्या नवऱ्याला अटक

पुणे: पुण्यामधील खराडी येथे अलिशान फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या रेव्ह पार्टीमध्ये रोहिणी खडसे यांच्या नवऱ्याला अटक केल्याची माहिती समोर आली आहे. प्रांजल खेवलकर यांना पुणे पोलिसांनी बेड्या ठोकल्याची माहिती समोर आली आहे. हाऊस पार्टीच्या नावाखाली पुण्यातील खराडी येथे रेव्ह पार्टी सुरू होती. पोलिसांनी रेव्ह पार्टीवर धाड टाकत सात जणांना ताब्यात घेतले. फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या रेव्ह पार्टीमध्ये […]

अधिक वाचा..