Skip to content
बुधवार, एप्रिल 22, 2026
  • शिरुर तालुक्यातील बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क: संपादक – तेजस फडके 9766117755 / 9423020103
Shirur Taluka News | शिरूर तालुका न्युज

Shirur Taluka News | शिरूर तालुका न्युज

shirurtaluka.com : shirur taluka news

  • शिरूर तालुका
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • देश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • खव्वयेगिरी
  • थेट गावातून
  • मुलाखत
  • भविष्य
  • खूप काही+
    • आजचा वाढदिवस
    • आरोग्य
    • इतर
site mode button

काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार नसीम खान यांचा उमेदवारी अर्ज दाखल

राजकीय
ऑक्टोबर 28, 2024ऑक्टोबर 28, 2024शिरूर तालुका टीम

नसीम खान यांच्या रॅलीत हजारोंचा जनसागर

मुंबई: काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य व प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष मो. आरिफ (नसीम) खान यांनी आज चांदिवली विधानसभा मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. सकाळी १० वाजता साकीनाका मेट्रो स्टेशनपासून ९० फूटरोड, काजूपाडा पाईपलाईन मार्गे एलबीएस रोड अशी भव्य रॅली काढून जोरदार शक्तिप्रदर्शन करत विद्याविहार येथील निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात नसीम खान यांनी नामांकन अर्ज दाखल केला.

नसीम खान यांच्या रॅलीत साकीनाका ते विद्याविहार निवडणूक कार्यालयापर्यंत सुमारे ८ ते १० हजार लोकांचा जनसागरच उसळला होता. जागोजागी महिलांनी त्यांची आरती ओवाळून निवडणुकीत विजयी होण्यासाठी आशीर्वाद दिला. ठिकठिकाणी पुष्प वर्षाव करत जंगी स्वागत करण्यात आले.

यावेळी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष आमदार भाई जगताप, माजी मंत्री सुरेश शेट्टी, मुंबई काँग्रेस कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा, शिवसेना (उबाठा) गटाचे विजू शिंदे, सोमनाथ सांगळे, एस. अण्णामलाई, बालाजी सांगळे, सनी आचरेकर, प्रशांत नलगे, हिरालाल यादव, बालकृष्ण गटे, मयूर राठोड, उमाकांत भांगिरे, प्रशांत मोरे, चंदन सावंत, साईनाथ कटके राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाचे मुंबई सरचिटणीस बाबू बत्तेली, तालुका अध्यक्ष अबू स्वालेहा, रत्नाकर शेट्टी, व्यासदेव पवार, चेतन जाधव, फरमान राईन, शांताराम मोरे, आरिफ शेख, राजेंद्र ढवळे, महिला तालुका अध्यक्षा छाया मयेकर यांच्यासह समाजवादी पक्षासह महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tagged candidatecandidatureCMANaseem KhanNewsPoliticalsubmitted

पोस्टचे नॅव्हिगेशन

राज्यातील भगिनींनी दुर्गा अवतार घेऊन भाजपाच्या अत्याचारी सरकारला सत्तेतून खाली खेचावे 
तुमच्या गावात नवीन स्वस्त धान्य दुकान परवाना देणे सुरु, असा करा अर्ज…

संबंधित पोस्ट

शिरुर तालुक्यात विजय डिंबर यांना पंचायत समितीची उमेदवारी द्या…

जुलै 22, 2025जुलै 22, 2025शिरूर तालुका टीम
Shivajirao Adhalrao Patil

शिवाजीराव आढळराव पाटील खासदारकीबाबत म्हणाले…

मार्च 1, 2024शिरूर तालुका टीम

राजश्री मोरे यांनी मनसेला पुन्हा डिवचल; मराठी बोलून प्रगती होत नाही

जुलै 21, 2025जुलै 21, 2025शिरूर तालुका टीम

अलीकडील पोस्ट

  • मुंबईत हरवलेली चिमुरडी पोलिसांच्या सतर्कतेमुळे सुखरूप परत
  • प्रश्नपत्रिका लीक प्रकरणावर अ.भा.वि.प.चा संताप; जबाबदारांवर कारवाईची मागणी
  • ‘आम्ही सैनिक आहोत, खेळणं नाही’! होमगार्डचा आक्रोश; ४० हजार कुटुंबांचा जगण्याचा प्रश्न ऐरणीवर
  • साताऱ्याचे एसपी तुषार दोषी यांच्या बदल्यांवर वाद; शिवसेनेची चौकशीची मागणी
  • एसटी सौर ऊर्जेचा पहिला टप्पा सुरू; २.५७ मेगावॉट ग्रीड सोलर प्रकल्पास मंजुरी

Popular Categories

  • आरोग्य (2,217)
  • इतर (152)
  • क्राईम (1,594)
  • खव्वयेगिरी (4)
  • थेट गावातून (18)
  • देश (46)
  • भविष्य (365)
  • मनोरंजन (165)
  • महाराष्ट्र (4,637)
  • मुख्य बातम्या (2,040)
  • मुलाखत (23)
  • राजकीय (949)
  • शिरूर तालुका (2,705)

आजचा प्रश्न

शिरूर तालुक्यात निवडणूकीदरम्यान पैसा आणि ड्रग्जचा वापर झाला आहे, असे आपणास वाटते काय?

View Results

Loading ... Loading ...
  • Polls Archive

शिरुरतालुका बद्दल

शिरूर तालका डॉट कॉम बद्दल थोडक्यात... www.shirurtaluka.com या वेबसाईटचे उद्घाटन २०११ रोजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते मंत्रालयात झाले आहे. राज्यातील पहिली तालुक्याची वेबसाईट असून, शिरूर तालुक्यातील प्रत्येक घडामोड वेबसाईटवर वाचायला मिळते.

FOLLOW US

काही निवडक श्रेणी

  • शिरूर तालुका
  • थेट गावातून
  • क्राईम
  • राजकीय
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • देश
  • मुलाखत

ताज्या घडामोडी

  • मुंबईत हरवलेली चिमुरडी पोलिसांच्या सतर्कतेमुळे सुखरूप परत
  • प्रश्नपत्रिका लीक प्रकरणावर अ.भा.वि.प.चा संताप; जबाबदारांवर कारवाईची मागणी
  • ‘आम्ही सैनिक आहोत, खेळणं नाही’! होमगार्डचा आक्रोश; ४० हजार कुटुंबांचा जगण्याचा प्रश्न ऐरणीवर
  • साताऱ्याचे एसपी तुषार दोषी यांच्या बदल्यांवर वाद; शिवसेनेची चौकशीची मागणी
  • एसटी सौर ऊर्जेचा पहिला टप्पा सुरू; २.५७ मेगावॉट ग्रीड सोलर प्रकल्पास मंजुरी

Like Us On Facebook

Loading...
© 2022 ShirurTaluka.com. All Rights Reserved. | Theme: News Portal by Mystery Themes.
error: Content is protected !!