मीठ, साखरेतील मायक्रो प्लास्टिक किती धोकादायक

आरोग्य

बाटलीबंद पाणीच कायम:- पिणाऱ्या लोकांमध्ये मायक्रो प्लास्टिक कणांची संख्या वर्षाला ९०००० ने वाढली. या अभ्यासातून असे लक्षात आले की मायक्रो प्लास्टिक शरीरात प्रवेश करण्याचे प्रमाण किती जास्त आहे. हे सर्व घडण्याचे कारण म्हणजे प्लास्टिकचा वाढलेला वापर. यातील ९०६ प्लास्टिक पॅकेजिंगशी संबंधित असण्याची दाट शक्यता आहे तर उर्वरित ३३७७ संबंधित असण्याची काही प्रमाणात शक्यता आहे. त्यामुळे मायक्रो प्लास्टिकमुळे होणारे दुष्परिणाम फक्त त्या कणांचे नसून त्यासोबत येणाऱ्या हानिकारक रसायनांचे देखील असू शकतील.

जगात २०२१ मध्ये ३९० मेट्रिक टन प्लास्टिकचे उत्पादन झाले. त्यापैकी ४० टक्के पॅकेजिंगसाठी वापरण्यात आले. प्लास्टिक वापरणे सोपे, स्वस्त आणि सोयीचे आहे यात शंका नाही. विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे प्लास्टिक पॅकेजिंगशी संबंधित सुमारे ४२८३ रासायनिक पदार्थ आहेत. या अहवालात खालील निष्कर्ष काढण्यात आले. मानवाला होणारा मायक्रो आणि नॅनो प्लास्टिक कणांचा उपसर्ग हा सार्वत्रिक असून तो अनेक मार्गांनी होतो. या उपसर्गाबाबत आणि तो हवा, अन्न, पेयजल या सर्व मार्गांनी किती प्रमाणात होतो याविषयी मर्यादित माहिती उपलब्ध आहे. या विविध मायक्रो आणि नॅनो प्लास्टिक घटकांचे गुणधर्म आणि त्यांचे प्रमाण याविषयी अधिक अभ्यास करण्याची आवश्यकता आहे.

उपलब्ध साथरोग शास्त्रीय पुराव्यानुसार श्वसनाद्वारे किंवा सेवनाद्वारे शरीरात प्रवेश करणाऱ्या मायक्रो किंवा नानो प्लास्टिक कणांमुळे फुफ्फुस तसेच जठर आणि आतडे यावर काय परिणाम होतो याबाबतची माहिती अपुरी आहे आणि गुणवत्तापूर्ण नाही. मानवी शरीरातील मायक्रो प्लास्टिक कणांचा प्रवेश, त्यांचे वितरण आणि उत्सर्जन यांच्याशी संबंधित शरीर क्रिया यंत्रणांमुळे उतींना होणारा उपसर्ग कमी होतो. रक्तात प्रवेश केल्यानंतर किंवा विविध पेशी आवरणामध्ये शिरकाव केल्यानंतर या कणांचे जैविक वितरण कसे होते आणि ते जैविक तटबंदी पार करू शकतात का याविषयी पुरेशी माहिती उपलब्ध नाही.

(सोशल मीडियावरून साभार)