कारेगाव (तेजस फडके) रांजणगाव गणपती येथील जमीन गट नं ४२१ हि पुण्यातील एका बांधकाम व्यावसायिकास विकल्यानंतर त्याच जमीनीचे पुन्हा बेकायदेशीर कुलमुखत्यारपत्र बनवून तीच जमीन पुन्हा विक्री केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक प्रभाकर पांडुरंग भोसले (वय ६१) रा. धानोरी, पुणे यांनी रांजणगाव एमआयडीसी (Ranjangaon MIDC Police) पोलिस स्टेशन येथे फिर्याद दाखल केल्याने बनावट कुलमुखत्यार धारक दिपक राजकुमार पंचमुख (रा. रांजणगाव गणपती, ता. शिरुर, जि. पुणे) यांच्यासह ११ जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत रांजणगाव MIDC पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे फिर्यादी प्रभाकर पांडुरंग भोसले (वय ६१) यांची सन २०१० साली दिपक राजकुमार पंचमुख यांच्याशी ओळख झाली. फिर्यादी हे बांधकाम व्यावसायिक असल्याने दिपक पंचमुख याने रांजणगाव गणपती येथील जमीन गट नं ४२१ बाबत माहिती सांगुन हि मिळकत खरेदी करण्याबाबत आग्रह केला होता.
त्यावेळी फिर्यादी यांनी सदर जमीन मिळकतीच्या मुळ मालकांसोबत नोंदणीकृत साठेखत आणि कुलमुखत्यारपत्र करुन त्यांच्या जमिनीचा मोबदला देऊन तळेगाव ढमढेरे येथील दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदविण्यात आलेले आहेत.
सदरची जमीन भोगवटा वर्ग २ ची असल्याने सक्षम प्राधिकार्यांकडे परवानगीसाठी अर्ज केलेले आहेत. गट नं ४२१ मध्ये अनेक कुटुंबांची एकत्र सामायिक मालकी व वहिवाट असल्याने सदर जमीन मिळकतीचे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कलम ८५ नुसार तहसीलदार शिरुर यांच्या आदेशान्वये वाटप करून घेण्यात आलेले आहे.
त्यानंतर फिर्यादी व दिपक पंचमुख यांनी गट नं ४२१/१ या जमिनीची मिळकतीची विक्री करणेकामी जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडे अर्ज करुन विक्री करण्याची लेखी परवानगी घेतली होती. ही परवानगी मिळाल्यानंतर दिपक पंचमुख यांनी त्यांच्या हिश्याची गट नं ४२१/१ मधील सर्व जमीन फिर्यादी प्रभाकर भोसले हे संचालक असलेल्या कंपनीस दि १५ सप्टेंबर २०२३ रोजी विकली. त्यानंतर दीपक पंचमुख यांचे गट नं ४२१/२, ४२१/३, ४२१/४ यामध्ये कसलेही क्षेत्र शिल्लक राहिलेले नाही.
तहसीलदार शिरुर यांच्या आदेशान्वये वाटप करुन घेण्यात आलेल्या जमीन गट नं ४२१ मध्ये ४२१/२ हे क्षेत्र १) भीमराव सारंग रोकडे, २) सुनिता भीमराव रोकडे, ३) सागर भीमराव रोकडे, ४) निशा भीमराव रोकडे (लग्नापुर्वीचे नाव) निशा अभिषेक सकपाळ (लग्नानंतरचे नाव), ५) सविता वसंत राजगुरु, ६) मयूर वसंत राजगुरु, ७) सुभाष सारंग रोकडे, ८) मंगल सुभाष रोकडे, ९) स्वप्निल सुभाष रोकडे, १०) प्रशांत सुभाष रोकडे, ११) राकेश सुभाष रोकडे आणि १२) स्वाती सचिन गायकवाड यांच्या नावावर आले होते. या सर्व लोकांनी सदर जमीन भोसले यांना २०१० रोजी विक्री करण्याच्या उद्देशाने साठेखत व कुलमुखत्यारपत्र लिहून दिले होते परंतु दीपक पंचमुख याने रोकडे परिवारासोबत पुन्हा बनावट कुलमुखात्यारपत्र तयार करुन दुसऱ्या व्यावसायिकासोबत करारनामा तयार करून मोठ्या प्रमाणात पैसे उचलले आहेत.
दि २० सप्टेंबर २०२४ रोजी एका दैनिकात प्रसिद्धी झालेल्या जाहीर नोटीस मध्ये भीमराव सारंग रोकडे यांच्यासह वर नमुद केलेल्या इतर अकरा जणांनी त्यांच्या मालकी हक्काची रांजणगाव गणपती येथील गट नं ४२१/२, ४२१/३, ४२१/४ मधील जमीन कुलमुखत्यार धारक दिपक राजकुमार पंचमुख यांनी त्रयस्त व्यक्तींना कायम व खुश खरेदी विकत देण्याचे मान्य व कबुल केलेले असुन त्या पोटी विसार रक्कम देखील स्वीकारलेली असल्याचा मजकुर होता. त्यानंतर फिर्यादी यांनी दि २१ सप्टेंबर २०२४ रोजी एक नोटीस पाठवत यावर हरकत घेतली होती.
त्यानंतर फिर्यादी प्रभाकर पांडुरंग भोसले यांनी रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन मध्ये जमीन कुलमुखत्यार धारक दिपक राजकुमार पंचमुख यांच्यासह १) भीमराव सारंग रोकडे, २) सुनिता भीमराव रोकडे, ३) सागर भीमराव रोकडे, ४) निशा भीमराव रोकडे (लग्नापुर्वीचे नाव) निशा अभिषेक सकपाळ (लग्नानंतरचे नाव), ५) सविता वसंत राजगुरु, ६) मयूर वसंत राजगुरु, ७) सुभाष सारंग रोकडे, ८) मंगल सुभाष रोकडे, ९) स्वप्निल सुभाष रोकडे, १०) प्रशांत सुभाष रोकडे, ११) राकेश सुभाष रोकडे आणि १२) स्वाती सचिन गायकवाड या सगळ्यांनी संगणमत करुन सदर जमिनीचे दुबार कुलमुखत्यारपत्र अस्तित्वात आणुन त्याच्या आधारे ती जमीन त्रयस्त व्यक्तीला विक्री करण्याच्या उद्देशाने इसाराची रक्कम स्वीकारुन फसवणुक केल्याप्रकरणी फिर्याद दाखल केली आहे.
या घटनेचा पुढील अधिक तपास रांजणगाव एमआयडीसी (Ranjangaon MIDC Police) पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिवाजी मुंडे हे करत आहेत.
शिरूरमध्ये वृद्ध महिलेच्या गळ्याला तलवार लावून लुटणाऱ्याला शिरूर पोलिसांनी केले जेरबंद…
रांजणगाव पोलिसांनी कारेगावातील कोयता गँग च्या २४ तासाच्या आत आवळल्या मुसक्या
पंचतारांकित रांजणगाव औद्योगिक वसाहतीत ठेकेदारांकडुन फेकला जातोय कँटीनचा राडरोडा