अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ट्रॅक्टर खरेदीसाठी मिळणार मोठं अनुदान

महाराष्ट्र

२०० कोटींच्या कृषी यांत्रिकीकरण अभियानाला मंजुरी

औरंगाबाद: केंद्र सरकारने राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या कृषी यांत्रिकीकरण योजनेला मंजुरी दिली असून योजनेअंतर्गत प्रामुख्याने अनुसूचित जाती, जमातीच्या आणि सर्वसामान्य प्रवर्गातील शेतकऱ्यांना टॅक्टर खरेदीसाठी अनुदान दिले जाणार आहे.

२०२५-२६ साठी २०४.१४ कोटी रुपये खर्चाची ही योजना असून, केंद्राचा ६०% आणि राज्याचा ४०% वाटा असणार आहे.

केंद्र: ₹१२२.४८ कोटी

राज्य: ₹८१.६५ कोटी

या योजनेतून शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी मोठं अनुदान मिळणार

अनुसूचित जाती-जमाती, महिला शेतकरी, अल्प व अत्यल्प भूधारकांना ट्रॅक्टरच्या किंमतीच्या ५०% किंवा ₹१.२५ लाख जी रक्कम कमी असेल ती मिळणार

सर्वसाधारण शेतकरी वर्गासाठी: ट्रॅक्टरच्या किंमतीच्या ४०% किंवा ₹१ लाख जी रक्कम कमी असेल ती मिळणार.

अनुदान वितरण

सर्वसाधारण शेतकरी: ₹१६४.२३ कोटी

अनुसूचित जाती: ₹२२.२७ कोटी

अनुसूचित जमाती: ₹१७.६३ कोटी

महाडीबीटी पोर्टल वरून अर्ज करा आणि या सुवर्णसंधीचा लाभ घ्या.

शेती यांत्रिकीकरणाच्या दिशेने एक पाऊल पुढे