आदिवासी शेतकरी,कष्टकरी बांधवांच्या बिर्‍हाड मोर्चातील प्रश्‍नांचा थेट विधानसभेत एल्गार

नागपूर: धुळे नंदुरबार नाशिक जिल्ह्यातील आदिवासी शेतकरी, कष्टकरी,बांधवाच्या विविध मागण्या आणि दुष्काळ जाहिर करावा या मागणीसाठी निघालेल्या बिर्‍हाड मोर्चाचा आवाज धुळे ग्रामीणचे आ.कुणाल पाटील यांनी विधानसभेत बुलंद केला. आ.कुणाल पाटील यांनी शेतकरी,कष्टकर्‍याच्या मागण्यांचा एल्गार विधानसभेत पुकारला. सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा आणि सत्याशोधक शेतकरी सभेचा बिर्‍हाड मोर्चा मुंबईत धडकण्याआधीच शासनाने मध्यस्थी करुन शेतकर्‍यांच्या मागण्या मान्य कराव्यात […]

अधिक वाचा..

शेतकऱ्यांच्या प्रश्नावरील स्थगन प्रस्ताव नाकारणारे सरकार शेतकरी विरोधी; नाना पटोले

नागपूर: अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते त्याची मदत अजून मिळालेली नाही आणि आता पुन्हा गारपीट व अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना भरीव मदत मिळावी यासाठी काँग्रेस पक्षाने स्थगन प्रस्ताव दिला होता पण भाजपा सरकारने चर्चेपासून पळ काढला. केवळ भरपूर मदत दिली आहे असे म्हणून चर्चा टाळणे हा शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात अवकाळीमुळे नुकसान झालेले शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत; पंचनामे कधी…?

कान्हूर मेसाई (सुनील जिते) वादळी वाऱ्यासह पावसाने शिरूर विभागात कान्हूर मेसाई येथील पिकांचे नुकसान झाले होते. या नुकसानीचे पंचनामे करताना काहींचे पंचनामे झालेले आहेत तर काहींचे अजुनही पंचनामे झालेले नाहीत. अवकाळी पाऊस होऊन सुमारे दिवस उलटून गेले तरीही पंचनामे झालेले नाहीत. त्यामुळे प्रशासन नुकसानग्रस्तांची दखल घेणार का…? हा प्रश्न सध्या शेतकऱ्यांपुढे आहे.   शिरुर तालुक्याच्या […]

अधिक वाचा..

‘त्या’ बारा लाख शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान योजना व नमो किसान सन्मान योजनेचा लाभ मिळवून देणार…

मुंबई: प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या चौदाव्या हफ्त्यापासून राज्यातील 12 लाख पात्र शेतकरी भूमी अभिलेख अद्ययावत नसणे, ई – केवायसी नसणे तसेच बँक खात्याशी आधार संलग्न नसणे या कारणांनी वंचित राहिले होते. मात्र यापुढे या दोन्ही योजनांपासून राज्यातील पात्र शेतकरी वंचित राहू नयेत याचा विचार करून या तीनही प्रकारच्या नोंदण्या व अटींची पूर्तता एकत्रित व गतिमान […]

अधिक वाचा..

शेतकऱ्यांना कमीत कमी एक हजार रुपये पीकविमा मिळणारच; सरकारचा मोठा निर्णय…

संभाजीनगर: राज्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी शेतकऱ्यांसाठी कृषिमंत्र्यांची मोठी घोषणा करण्यात आली आहे. राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आणि सकारात्मक पाऊल उचललं असून शेतकऱ्यांना आता कमीत कमी एक हजार रुपये पीक विमा मिळणार असून, विमा कंपनीची रक्कम कमी असल्यास उर्वरित रक्कम राज्य सरकार देणार असल्याची मोठी घोषणा कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी […]

अधिक वाचा..

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेत शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्याचे सामर्थ्य; धनंजय मुंडे

मुंबई: नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेत शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्याचे सामर्थ्य आहे. यासाठी खरीप व रब्बी हंगामात शेतकऱ्यांचे उत्पादन वाढावे यासाठी हवामान बदलाचा अंदाज घेऊन माती परीक्षण आणि बीज संशोधनावर अधिकाधिक भर द्यावा, अशा सूचना कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या. मंत्रालयात नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पासंदर्भात कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठकीचे […]

अधिक वाचा..

ब्रेकिंग! शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी व्हाट्सॲप क्रमांक कार्यान्वित

पुणे (प्रतिनिधी): बियाणे, खते व कीटकनाशके लिंकींग, निकृष्ठ दर्जाचे बोगस निविष्ठांच्या संदर्भात येणाऱ्या तक्रारींचे तात्काळ निवारण करण्यासाठी ९८२२४४६६५५ हा व्हाट्सॲप क्रमांक कार्यान्वित करण्यात आला असून व्हाट्सॲप संदेशाद्वारे तक्रार नोंदवावी, असे आवाहन कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी केले आहे. कृषी आयुक्तालयस्तरावर तक्रार निवारण कक्षही स्थापन करण्यात आला असून हा कक्ष २४ X ७ कार्यरत आहे. तसेच […]

अधिक वाचा..

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरीव मदत द्या, पोकळ घोषणा नको; नाना पटोले

मुंबई: राज्यातील शेतकऱ्यावर संकटाचे आभाळ कोसळले आहे पण राज्य सरकारची मदत काही पोहचत नाही. राज्य सरकार केवळ घोषणा करते त्याची अंमलबजावणी होत नाही. मागील वर्षी अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची मदत अजून मिळालेली नाही, त्याचा सर्वेही केलेला नाही. सरकारकडे तलाठी, कृषी सहाय्यक ही यंत्रणा नाही. संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला राज्य सरकारने तातडीने सरसकट मदत द्यावी, अशी […]

अधिक वाचा..

कृषीमंत्री धनंजय मुंडे जिल्ह्यात येताच जाणार शेतकऱ्यांच्या बांधावर

परळी वैद्यनाथ: राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे हे रविवारी सकाळी कृषी विभागाचे मंत्री पद स्वीकारल्यानंतर प्रथमच बीड जिल्ह्यात येत असून आल्याबरोबर ते शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन गोगलगायींनी नुकसान केलेल्या क्षेत्राची पाहणी करणार आहेत. कृषिमंत्री धनंजय मुंडे हे सकाळी 11 वाजल्यापासून परळी वैद्यनाथ तालुक्यातील वाघबेट, बेलंबा आदी गावांना भेटी देऊन गोगलगायींनी बाधित क्षेत्राची पाहणी करतील व प्रशासनास आवश्यक […]

अधिक वाचा..

एक रुपयात पिक विमा शेतकऱ्यांच्या हितासाठी; आकाश वडघुले 

शिरुर (तेजस फडके): निर्वी (ता. शिरुर) येथे आज (दि 22) रोजी शनिवार असल्याने हनुमान चालीसा व आरती कार्यक्रमाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासन कृषी विभाग व भारतीय कृषी विमा कंपनी व एच डी एफ शी इर्बो कंपनी संयुक्त विद्यमाने पिक विमा जनजागृती अभियान, कॅम्प व पाठशालाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात आकाश वडघुले यांनी फळपिक […]

अधिक वाचा..