आरोग्यदायी मध

आरोग्य

मध ओळखण्याची पद्धत

1) मध पाण्यात टाकल्यावर सरळ पाण्यात जाते, विरघळत नाही.

2) शुद्ध मध वर्तमानपत्राच्या कागदावर टाकल्यावर एका बाजुस टाकुन बोटाने घासल्यास दुसऱ्या बाजुने फुटुन दिसत नाही.

3) शुद्ध मधावर मुंग्या येत नाहीत, कारण मधात थोडा कडवटपणा असतो.

मध खाण्याचे काही नियम

1) मध केव्हाही अग्नीवर गरम करू नये.

2) मध अनुकुल पदार्था बरोबर खावा.

3) मास, मासळी यांच्या बरोबर मध खाऊ नये.

4) पाणी, तूप, लोणी, तेल किंवा रस यांच्या बरोबर खाताना समान प्रामाणात खाऊ नये, कोणतीही एक वस्तू जास्त घ्यावी. उदा. २ चमचे मध तर तुप, लोणी ४ चमचे घ्यावे.

5) दारू, विडी, सिगारेट वा तंबाखू ह्यांच्या खाण्या नंतर मध खाऊ नये.

6) तापात किंवा अत्यंत तहानेच्या वेळी नुसता मध खाऊ नये, पाणी वा रसात मिसळून खावा.

7) साखरेत मिसळून मध खाऊ नये, कारण ती बनवताना वापरलेली रसायने बाधक ठरतात.

8) मोठ्या माणसांनी एका वेळी १० ग्रॅम पेक्षा जास्त मध खाऊ नये. लहानाना अर्धाभाग, अति लहानांना पाव भाग वापरावा.

9) थंडीत गरम दुध वा पाण्यातून, तर उन्हाळ्यात सरबतातून व पावसाळ्यात नुसता मध सेवन करावा.

मधातील घटक दव्ये

1) द्राक्षे, ऊस व फळातील शर्करा प्रमाणे मधातील शर्करा ही अमृता समान आहे.

2) शारीरिक पोषणास आवश्यक कल्शियम आदि घटक द्रव्ये १२% आहे.

3) प्रोटीन विटामिन चरबी इत्यादी तत्व भरपुर प्रमाणात असतात.

4) मधाच्या एक चमच्यात ७५ कॅलरीज मिळतात.

(सोशल मीडियावरून साभार)