आगामी निवडणुकांमध्ये जनता दल पुरेशा जागांसाठी आग्रही; नाथा शेवाळे 

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (तेजस फडके): जनता दल सेक्युलरचे प्रदेशाध्यक्ष नाथा शेवाळे यांनी पक्षाच्या शिष्टमंडळासह भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा मंत्री रवींद्र चव्हाण यांची भेट घेत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जनता दलाला पुरेशा जागा द्याव्यात अशी आग्रही मागणी केली आहे.

या भेटीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपुर्वी होणाऱ्या महामंडळावरच्या नियुक्त्यांमध्येही जनता दलाच्या प्रतिनिधींना संधी द्यावी, या मागणीचा ठराव चव्हाण यांच्याकडे सादर करण्यात आला असल्याचे समजते. महायुतीचा घटक पक्ष म्हणून जनता दलाला योग्य प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे, असे मत नाथाभाऊ शेवाळे यांनी यावेळी व्यक्त केले.

या महत्त्वपूर्ण बैठकीस जनता दलाचे कार्याध्यक्ष सलीम भाटी यांच्यासह शिष्टमंडळ देखील उपस्थित होते. दोन्ही पक्षांमध्ये भविष्यातील राजकीय सहकार्याची शक्यता या चर्चेमुळे बळकट झाली आहे.