आज निवडणुका झाल्या तर महाविकास आघाडी १८० ते २०० जागा जिंकेल…

मुंबई: आज राज्याच्या निवडणुका झाल्या तर महाविकास आघाडी १८० ते २०० जागा जिंकेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष असेल असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे. न्यूज एरिना इंडियाने केलेल्या निवडणूक सर्वेक्षणात महाराष्ट्रातील मतदारांची खरी भावना दिसून येत नाही, असे स्पष्ट मत महेश तपासे यांनी व्यक्त केले आहे. […]

अधिक वाचा..

लोकसभा निवडणुकीत भाजपमुक्त महाराष्ट्र करण्याचा काँग्रेसचा निर्धार

मुंबई: कोअर कमिटीच्या बैठकीत लोकसभा मतदार संघनिहाय आढावा घेऊन मित्र पक्षांबरोबर आघाडी करण्यासंदर्भात सविस्तर चर्चा झाली. राज्यात पक्ष संघटना बळकट करुन जास्तीत जास्त जिंकण्याचा निर्धार करण्यात आला आहे. कर्नाटकात काँग्रेस पक्षाला मिळालेल्या मोठ्या विजयाने महाराष्ट्रातील काँग्रेस कार्यकर्त्यांना अधिकचे बळ मिळाले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपामुक्त महाराष्ट्र करण्याचा निर्धार बैठकीत करण्यात आला आहे, अशी माहिती प्रभारी […]

अधिक वाचा..

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस तयार, भाजपाचा पराभव करण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

मुंबई: केंद्रातील नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारचे काऊंटडाऊन सुरु झाले आहे. ९ वर्षांपासून लूट सुरु असून जनतेच्या खिशातील पैसा उद्योगपती मित्रांच्या घशात घातला जात आहे. जनता या लुटीला कंटाळली असून लोकसभा निवडणुकीत भाजपाला सत्तेतून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही. देशात परिवर्तनाचे वारे वाहत असून काँग्रेस हाच पर्याय जनतेला दिसत आहे. काँग्रेसच्या दोन दिवसीय आढावा बैठकीतही या […]

अधिक वाचा..

बाजार समिती, खरेदी विक्री संघ निवडणुकीत भाजपा व शिंदे गटाशी युती करु नये

महाविकास आघाडीतच निवडणुक लढवा, अन्यथा कारवाई करु मुंबई: काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची राज्यात महाविकास आघाडी आहे. राज्यातील सर्व प्रकारच्या निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच लढवण्याचा पक्षाचा निर्णय आहे. परंतु काही ठिकाणी शिंदे गट व भाजपाशी युती केल्याच्या तक्रारी येत आहेत, हे पक्षशिस्तीचे उल्लंघन आहे. अशी युती करणाऱ्यांवर कड कारवाई केली जाईल, […]

अधिक वाचा..

कसबा पेठ व चिंचवडच्या पोटनिवडणुकीत भाजपाचा पराभव करून सत्तेचा माज उतरवा…

देश जोडणाऱ्या राहुलजी गांधींबरोबर देश तोडणाऱ्या मोदींची तुलना कशी होऊ शकेल? मुंबई: भारतीय जनता पक्षाचे मंत्री, नेते हे सातत्याने महाराष्ट्राची बदनामी करत आहेत. महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांचा अपमान करत आहेत. भाजपाकडून केला जात असलेला हा अपमान महाराष्ट्राचा अपमान आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतःला राजा समजू लागलेत तर […]

अधिक वाचा..

प्रजा कोण आणि राजा कोण याचे उत्तर जनतेने विधान परिषद निवडणुकीतून दिले…

मुंबई: विधान परिषद निवडणुकीत सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला जनतेने धुळ चारली असून महाविकास आघाडीवर विश्वास व्यक्त केला आहे. नागपूर, अमरावतीमध्ये काँग्रेसने भाजपा उमेदवारांचा दणदणीत पराभव केला आहे तसेच औरंगाबादमध्ये मविआ उमेदवाराने विजय संपादन केला आहे. खा. राहुलजी गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचाही या निवडणुकीत सकारात्मक परिणाम दिसून आला आहे. या निकालाने ‘प्रजा कोण आणि राजा […]

अधिक वाचा..

सख्या भावांच्या बायकांना ग्रामपंचायत निवडणुकीत समान मते; आणि मग…

औरंगाबाद: कन्नड तालुक्यातील एका ग्रामपंचायतचा हटके निकाल हाती आला आहे. सख्या मावस भावांच्या बायका ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात होत्या. मात्र मतमोजणी सुरु असतानाच दोन्ही उमेदवारांना समान मत मिळाल्याने ईश्वर चिठ्ठी काढावी लागली. त्यानंतर एकीचा विजय तर दुसरीचा पराभव झाला आहे. कन्नड तालुक्यातील गराडा ग्रामपंचायत निवडणुकीत दोन सख्या मावस भावांच्या अर्धागणी निवडणुकीत आमने सामने होत्या. पूजा सचिन […]

अधिक वाचा..

मांडवगण फराटा ग्रामपंचायतमध्ये कमळ फुलले, घड्याळाची टिकटिक मात्र बंद

दादा पाटील फराटे यांच्या पॅनलचा 11-6 ने दणदणीत विजय शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचे दादा पाटील फराटे यांच्या पॅनेलने सरपंचपद जिकंत ११-६ ने दणदणीत विजय संपादन केला असून त्यांची सुन समीक्षा कुरुमकर(फराटे) यांची थेट जनतेतून सरपंचपदी वर्णी लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला या निवडणुकीत सपशेल हार मानावी लागली […]

अधिक वाचा..

मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यत राज्यात निवडणुका होऊ देणार नाही…!

मुंबई: मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कोणत्याही निवडणुका होऊ देणार नाही. राज्यात नोकरभरतीही होऊ देणार नाही, असा इशारा सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जिल्हा आरक्षण परिषदेत देण्यात आला. मराठा आरक्षणासाठी, एल्गार पुकारण्यासाठी राज्यस्तरीय आरक्षण परिषदेचे आयोजन करण्याबाबत नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत हा इशारा देण्यात आला. घटनात्मक तरतूद असलेल्या […]

अधिक वाचा..

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका पुन्हा लांबणीवर…

मुंबई: राज्यातील २५ जिल्हा परिषदा व २८३ पंचायत समित्यांवरील प्रशासकांच्या नियुक्तीचा कालावधी आणखी काही महिने वाढविण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने सोमवार (दि. 12) रोजी घेतला. त्यामुळे या जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुका आणखी काही काळ लांबणीवर पडणार आहेत. राज्यातील २५ जिल्हा परिषदांच्या व त्याअंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांचा कालावधी मार्च २०२२ मध्ये संपलेला आहे. परंतु आधीच्या […]

अधिक वाचा..