पळस पाणाचे औषधि उपयोग

आरोग्य

पळस ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. शास्त्रिय नावा मोनोस्पर्मा या शब्दाचा अर्थ आहे एकच बी असलेला. पळसाच्या प्रत्येक शेंगेत एकच बी असते. या शेंगाना पळसपापडी असे म्हणतात.याची पाने तळहाताएवढी रुंद व जाड राहतात. जेवण्याच्या पत्रावळीसाठी याचे पानाचा वापर होतो.

 

काही औषधि उपयोग

1) पोटात झालेले जंत घालवण्यासाठी काही औषधे आहेत. पळसाचे बी, हिंग, ओवा, कापूर एकत्र करून कृमिकुठार नावाचे औषध बनते. याच्या (250मि.ग्रॅ.च्या) दोन गोळया रोज रात्री याप्रमाणे आठवडाभर घ्याव्यात

2 ताकामध्ये पळसपापडीचे पाव ते अर्धा चमचा चूर्ण घेतल्यासही जंत कमी होतात.

3) नायटे: पळसाची बी लिंबाचे रसात उगाळून लावावे.

4) लघवी अडकली असेल तर ती मोकळी करण्यासाठी तात्पुरता उपाय म्हणून बेंबीखालच्या भागावर (म्हणजे फुगलेल्या मूत्राशयावर) गरम पाण्याने किंवा कपडयाने शेक द्यावा. शेक देण्यासाठी पळसाची फुले गरम करून वापरली जातात.

5) किडनीच्या विकारांवर पळसाची फुले शिजवून ते पाणी पाजावे. ‘पलाशपुष्पासव’ हे फुलांपासून औषध तयार करतात. हे किडनीच्या विकारांवर अतिशय उपयुक्त आहे.

6) फ्रॅक्चर झाल्यावर हाडे नीट जुळण्यासाठी पळसाच्या सालीचा उपयोग होतो.

7) संडास साफ न होणे यावर पळसाच्या बीचे चूर्ण घ्यावे.

8) प्रमेहावर पळसाच्या पानांचा रस घ्यावा.

9) पळसाच्या पानांच्या पत्रावळीवर गरम गरम अन्न वाढले की त्या अन्नाबरोबर पळसाचेही औषधी गुणधर्म पोटात जावेत असा उद्देश आहे. मात्र ती पत्रावळ ताजी असावी.

(सोशल मीडियावरून साभार)