१) भूक असेल तेव्हाच खा. वारंवार खाऊ नका. लंघन करा. म्हणजे उपवास करा.
२) सकाळी पोटभर, दुपारी मध्यम, संध्याकाळी कमीच खा.
३) एकाचवेळी भरपेट खाऊ नका. एक घोट जेवणा अगोदर पाणी प्या. निम्मे जेवण झाल्यावर एक घोट पाणी प्या. शेवटी एक/दोन घोट पाणी प्या. एका तासानंतर पोटभर प्या. जेवण झाल्यावर लगेच जास्त पाणी प्यायल्यास १००% पोट वाढतेच. काळजी घ्या.
४) पातळ भाजी, रस्सा खा.
५) एका वेळी एकच भाजी खा.
६) सोबत कच्चे खा. (कांदे, गाजर, टोमॅटो, बीट, कोबी)
७) चमचमीत कमी खा. (तेलकट, तुपट, मसालेदार, फास्टफूड)
८) सकाळी अनोशापोटी एक ग्लास कोमट पाणी + मध एक चमचा + अर्धे लिंबू रस प्या. लवकर वजन कमी होते. हा उपाय काही दिवसच करा.
९) लांबलचक वाढणा-या भाज्या जास्त खा. म्हणजे सडपातळ राहाल. (पडवळ, शेंगा, शिराळी, भेंडी, दुधी)
१०) व्यायाम करा, जाँगिंग करा, एरोबिक्स करा. (प्राणायाम, योगासने) रोज १०/१२ सूर्यनमस्कार घाला.
११) फास्ट चाला, रमतगमत चालू नका. किमान ३० मिनिटे दररोज चाला.
१२) प्रत्येक काम स्पिडणे करा. स्वतःची कामे स्वतःच करा.
१३) ऍक्युप्रेशर करा. (म्हणजे हातपाय घासा व प्रेस करा)
१४) आकाराने गोल भाज्या कमी खा. (बटाटा, भोपळा, वांगी) अन्यथा लवकर गोल व्हाल.
१५) पोटसाफ राहू द्या.
१६) रोज अर्धा लहान चमचा मेथी दाणे सकाळी किंवा संध्याकाळी ५ मिनिटे तोंडात ठेवा. नंतर पाण्याबरोबर गिळा. वजन कमी होते.
१७) जे अन्न सहज पचन होते तेच खाणे. नैसर्गिक जीवन जगा.
१८) दुपारी केव्हाच झोपू नका.
१९) दिवसभरात ३ ते ४ लिटर पाणी प्या. (शक्यतो कोमट पाणी)
२०) भात, भाकरी, चपाती पोटभर खाल्ली तरी चालेल. मात्र भाज्या कमीच खा.
२१) श्वासावर फास्ट चाला किंवा रनिंग करा. म्हणजे रनिंग करते वेळी नाकानेच जोरात श्वास घ्या व सोडा. लवकर वजन कमी होईल.
२२) एकाच वेळी सर्व उपाय करू नका.
(सोशल मीडियावरून साभार)