धुळेतील दुहेरी हत्याकांडाने खळबळ; भोंदूबाबाकडून तरुण-तरुणीची हत्या

महाराष्ट्र

धुळे: Dhule जिल्ह्यातील Sakri तालुक्यातील कासारे गावात एका भोंदूबाबाने दोन तरुणांचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नोकरीत स्थैर्य आणि कौटुंबिक सुखासाठी पूजा करण्यास गेलेल्या जयश्री काकुस्ते आणि अक्षय सोनवणे यांची हत्या झाल्याची कबुली आरोपी योगेश खैरनार याने पोलिसांसमोर दिली आहे.

पूजेनंतर जयश्रीवर गैरवर्तनाचा प्रयत्न

माहितीनुसार, जयश्री रजनीकांत काकुस्ते आणि अक्षय गंगाधर सोनवणे हे ‘शनी अमावस्या’ निमित्त आरोपी योगेश खैरनार याच्याकडे पूजा करण्यासाठी गेले होते. पूजा संपल्यानंतर योगेश हा जयश्रीला दुचाकीवरून घरी सोडण्यासाठी निघाला. मात्र, रस्त्यात त्याने तिच्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. जयश्रीने विरोध केल्यानंतर संतप्त झालेल्या योगेशने ओढणीने गळा आवळून तिचा खून केल्याचा आरोप आहे. त्यानंतर हा प्रकार अपघात असल्याचे भासवण्यासाठी तिची दुचाकी तिच्याच अंगावर टाकण्यात आली.

अक्षयचाही खून; मृतदेह डोंगरावर पुरला

दरम्यान, अक्षय सोनवणे हा योगेशची वाट पाहत थांबला होता. योगेश परत आल्यानंतर उशीराबाबत विचारणा केल्याने दोघांमध्ये वाद झाला. या वादातून आरोपीने लोखंडी वस्तूने अक्षयच्या डोक्यावर वार करून त्याचा खून केला. पुरावे नष्ट करण्यासाठी अक्षयचा मृतदेह डोंगर परिसरात नेऊन पुरल्याची माहिती तपासात समोर आली आहे.

जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई

या प्रकरणात आरोपी योगेश खैरनार याच्यावर खुनासह जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसारही वाढीव कलमे लावण्यात आली आहेत. पोलिसांनी आरोपीला कडक बंदोबस्तात न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. आरोपीला आता २३ मे रोजी पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत