हाय बीपीचा त्रास- कधीही चक्कर येते तर मग रोज या फळाचा रस प्या

आरोग्य

वाढतं वय आणि तणावामुळे उच्च रक्तदाबाची समस्या निर्माण होते उच्च रक्त दाबाला सायलेंट किलरही म्हणतात. यामुळे हृदयाच्या निगडीत समस्या, पक्षाघात यांसारखी जीवघेणे आजार निर्माण होऊ शकतात. रक्तदाबाची सामान्य पातळी (BP नॉर्मल रेंज) 80/120 mmHg आहे. जर आपल्यालाही उच्च रक्तदाबाची समस्या असेल तर, वेळीच यावर उपचार घेणे गरजेचं आहे.

सकाळी बीटरूटचा रस प्यायल्याने उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवता येऊ शकते. बीटरूटचा रस प्यायल्याने सिस्टोलिक रक्तदाब सरासरी ४-५ गुणांनी कमी होतो. २०१२ अभ्यासाचा रेफ्रेन्स देत त्यांनी उच्च रक्त दाबासाठी या घरगुती उपायाबद्दल सांगितले.

उच्च राक्तदाबाच्या समस्येवर बीटरूट कसे काम करते

बीटरूटमध्ये नैसर्गिक नायट्रेट्स असतात. जे शरीरात नायट्रिक ऑक्साईडमध्ये रूपांतरित होते. त्याच्या मदतीने रक्त वाहून नेणाऱ्या नसा शिथिल होतात आणि रक्तदाब सामान्य होतो.

बीटरूट ज्यूस पिण्याची योग्य वेळ कोणती

बीटाचा रस आपण कोणत्याही वेळी पिऊ शकता. पण तज्ज्ञांच्या मते, सकाळी रिकाम्या पोटी किंवा नाश्त्याच्या एक तास आधी बीटाचा रस प्यायल्याने शरीराला संपूर्ण फायदा मिळू शकतो.

बीटाच्या रसाचे इतर फायदे

उच्च रक्तदाबाची पातळी नियंत्रित करण्या सोबत स्टॅमिना वाढवण्याचं काम बीटाचा रस करते. यात कॅलरीजचे प्रमाण कमी असते. शिवाय यात आयर्न, फोलेट आणि मँगनीज असते. जर आपण हृदय विकार, लठ्ठपणा, कोलेस्ट्रॉल किंवा यकृताच्या आजाराने त्रस्त असाल तरीही बीटरूटचा रस पिणे सुरू करा.

(सोशल मीडियावरून साभार)

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत