शिरूर तालुक्यात सामाईक मोटारीच्या वादातून भावाचा भावावर हल्ला; दगडाने डोक्यात मारहाण

क्राईम

शिरूर  (ओमकार भोरडे): सामाईक इलेक्ट्रिक मोटार वापरण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून मोठ्या भावाने व भावजयाने लहान भावाला बेदम मारहाण केल्याची घटना शिरूर तालुक्यातील गुनाट येथे घडली.

याबाबत गुनाट येथील शेतकरी संदीप कारभारी कोळपे (वय ३८) यांनी शिरूर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, शनिवारी (दि. ७) सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास संदीप कोळपे हे घरी असताना त्यांचे मोठे भाऊ भाऊसाहेब कारभारी कोळपे व भावजय सोनाली भाऊसाहेब कोळपे हे त्यांच्या घरासमोर आले.

सामाईक असलेली इलेक्ट्रिक मोटार घरी का आणली, असा जाब विचारत दोघांनी वाद घालण्यास सुरुवात केली. त्यावर संदीप यांनी मोटार आता कोणीही वापरणार नसल्याचे सांगितल्याने आरोपी संतापले. त्यानंतर त्यांनी शिवीगाळ व दमदाटी करत संदीप यांना खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच हातातील दगडाने त्यांच्या डोक्यात मारून जीवे मारण्याची धमकी दिली. या हल्ल्यात संदीप कोळपे यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार टेंगले करीत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत