शरीरात पुढे सांगितलेली काही लक्षणं दिसत असतील तर व्हिटॅमिन बी १२ लवकरात लवकर तपासून घ्या. कारण त्याकडे जर दुर्लक्ष केले तर पुढे जाऊन कित्येक गंभीर आजारांचा धोक निर्माण होऊ शकतो (signs of vitamin B12 deficiency). ते टाळायचं असेल तर शरीरातलं व्हिटॅमिन बी १२ वाढवणं खूप गरजेचं आहे.
पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं मन एकाग्र न होणे. कायम अस्वस्थता वाटणे. एकाजागी बसून एक काम शांत चित्ताने न करू शकणे, हे सगळं व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेमुळे होतं. कारण त्याचा थेट परिणाम मेंदूच्या कार्यक्षमतेवर होत असतो.
हातापायाला वारंवार मुंग्या येत असतील तर ते देखील शरीरातलं व्हिटॅमिन बी १२ कमी झालं आहे, हे सांगणारं एक लक्षण असू शकतं.
व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेमुळे बर्फ खाण्याचीही खूप क्रेव्हिंग होते. किंवा कच्चे तांदूळ बारीक चावून खावे वाटतात.
जिभेवर जर सतत सूज येत असेल किंवा नेहमीच तोंड येण्याचा त्रास होत असेल तर तो देखील व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेमुळे होऊ शकतो.
केस गळणे आणि तुटण्याचं प्रमाण वाढणे हे देखील व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेचं एक लक्षण आहे.
धावपळ, पळापळ न करताही सतत धाप लागत असेल, बोलताना दम लागत असेल किंवा हार्टबीट्स नेहमीच वाढत असतील, श्वास जोरात घ्यावा लागत असेल तर ही सगळी व्हिटॅमिन बी १२ कमी असण्याची लक्षणं असू शकतात.
(सोशल मीडियावरून साभार)