लोकशाही पायदळी तुडवून धमकावून राज्यात निवडणुका बिनविरोध होत आहे 

सरकार भाजपचे असल्याने विकास निधीची भाषा करून धमकावले जाते आहे त्यामुळे निवडणुका पारदर्शक होतील का? नागपूर: राज्यात अनेक ठिकाणी सत्ताधाऱ्यांचे नातेवाईक त्यात बायको, वहिनी,मामे भाऊ, दीर,बहिण,मुलगा बिनविरोध निवडणूक जिंकून आले,अनेक ठिकाणी गुलाल उधळला इथे लोकशाही पायदळी तुडवण्यात आली आहे. सत्तेच्या बळावर दबाव टाकून निवडणुका बिनविरोध करून सत्ताधारी पाठ थोपटून घेत आहे अशी टीका काँग्रेस विधिमंडळ […]

अधिक वाचा..

तुमच्या नखांवर दिसतात कर्करोगाची ‘ही’ लक्षणं, शास्त्रज्ञांनी दिला इशारा 

कर्करोग हा भारतात आजार आणि मृत्यू यांच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे. भारतात कर्करोगाच्या रूग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. एनआयसीपीआरच्या देशात अंदाजे २.५ दशलक्ष लोक या आजाराने ग्रस्त आहेत. दरवर्षी ७ लाखांहून अधिक नवीन कर्करोग रूग्णांची नोंद होते. तसंच अंदाजे ५,५६,४०० लोक कर्करोगाशी संबंधित गुंतीगुंतीमुळे मृत्यूमुखी पडतात. कर्करोगाच्या उपचारपद्धतींमध्ये मोठी प्रगती झाली असली तरी अनेक केसेसमध्ये […]

अधिक वाचा..

रात्री चांगली झोप लागावी म्हणून शरीरातील ‘हे’ अवयव दाबून बघा, लगेच येईल गाढ झोप

रोज रात्री चांगली झोप घेणं आपल्या तब्येतीसाठी खूप महत्वाची असते. पण जर रोज झोप येत नसेल तर हे आजारपणाचं एक लक्षण आहे. यामुळे शरीर दिवसभर थकलेलं, सुस्त वाटतं आणि माणूस लवकर वृद्ध होऊ लागतो. झोप न येण्याची अनेक कारणं असू शकतात, त्यातलं सगळ्यात मोठं कारण म्हणजे रोजचं बिघडलेलं रूटीन. बदलत्या आणि बिझी लाइफस्टाईलमुळे लोकांना आपला […]

अधिक वाचा..

केसांमधील कोंडा नि मेहंदीचा वापर

केसात कोंडा होण्याची समस्या केवळ महिलांनाच नाही तर पुरूषांना देखील होते. उन्हाळ्यात तर धूळ, घाम आणि उन्हामुळे केसात जास्त कोंडा होतो. शॅम्पूने केसातील कोंडा दूर करता येतो. सोबतच काही घरगुती उपायांचा वापर करूनही केसांमधील कोंडा दूर करता येतो. यासाठी मेहंदी मध्ये काही गोष्टींचा वापर करावा लागेल. याने कोंडाही दूर होईल आणि केसही मजबूत व चमकदार […]

अधिक वाचा..

भाजपा महायुतीच्या गुंडगिरी, भ्रष्टाचार व विकृत राजकारणाला मूठमाती द्या: हर्षवर्धन सपकाळ

उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी सत्ताधारी पक्षाकडून विरोधकांवर दंडेलशाही, लोकशाहीला काळीमा फासण्याचे काम मुंबई: स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये सत्ताधारी पक्षाकडून मोठ्या प्रमाणात गुंडगिरी, दंडेलशाही करण्यात आली. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी विरोधी पक्षांच्या उमेदवारांची कॉलर पकडणे, डांबून ठेवणे, दमदाटी करणे हे प्रकार सर्रास करण्यात आले आहेत. बिहारमध्ये जंगलराज आहे असा आरोप करणाऱ्या भाजपा महायुतीचा महाराष्ट्रात नंगानाच सुरु […]

अधिक वाचा..
leopard

पुणे विमानतळावर प्रवाशांची गर्दी अन् अचानक आला बिबट्या…

पुणे : पुणे जिल्ह्यात अनेक भागांसह शिरूर तालुक्यात बिबट्यांनी धुमाकुळ घातला आहे. बिबट्याच्या हल्ल्यांमध्ये काहींनी आपला जीवही गमवला आहे. ग्रामीण भाग किंवा दाट लोकवस्ती नसलेल्या ठिकाणी बिबट्याचा वावर अनेकदा पाहायला मिळतो. मात्र, आता पुण्यातील विमानतळावरच थेट बिबट्या पोहोचला आहे. पुणे विमानतळाच्या धावपट्टीजवळ गुरुवारी रात्री दीड वाजताच्या सुमारास पुन्हा बिबट्या दिसला आहे. पुणे विमानतळावरून विमानांची मोठ्या […]

अधिक वाचा..

सात वर्षीय बालिकेवरील अमानुष अत्याचार

अल्पवयीनांच्या सुरक्षेबाबत समाज आणि प्रशासन अधिक संवेदनशील व सतर्क होणे गरजेचे; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे जुन्नर: ओतूर (ता. जुन्नर) येथील स्थानिक गरीब शेतकरी कुटुंबातील सात वर्षीय निरागस बालिकेवर १६ नोव्हेंबर २०२५ रोजी अत्यंत अमानुष लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आल्यानंतर शिवसेना नेत्या, विधानपरिषद उपसभापती आणि स्त्री आधार केंद्राच्या संस्थापक अध्यक्षा डॉ. नीलम गोऱ्हे यांनी तातडीने […]

अधिक वाचा..

बदलत्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर संशोधित बियाण्यांचा वापर आवश्यक; पणन मंत्री जयकुमार रावल

मुंबई: जागतिक हवामान बदलाचा मोठा परिणाम शेती क्षेत्रावर होत असून या वातावरणाला प्रतिरोध करणाऱ्या नवनवीन संशोधित वाणांची आवश्यकता वाढली आहे. शेतमालाची उत्पादकता वाढवायची असेल तर बदलत्या वातावरणानुसार बियाण्यांमध्ये संशोधन आणि त्यांचा वापर होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन पणन मंत्री जयकुमार रावल यांनी केले. जागतिक स्तरावरील बी-बियाणे उद्योगाच्या ‘एशियन सीड काँग्रेस (एएससी) 2025’ चे आयोजन मुंबई येथील […]

अधिक वाचा..

भाजप सरकार महिलांना सुरक्षा देण्यास असमर्थ; संध्याताई सव्वालाखे

महिला काँग्रेस महाराष्ट्रभर महिला सुरक्षा केंद्राची स्थापना करणार मुंबई: भाजपा सरकारच्या काळात महिलांवरील अत्याचारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. बेटी बचाव हा पोकळ नारा असून भाजपा महायुती सरकार महिलांना सुरक्षा देण्यास असमर्थ ठरले आहे, म्हणून महिला काँग्रेस महाराष्ट्रभर महिला सुरक्षा केंद्राची स्थापना करणार आहे, अशी घोषणा महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्याताई सव्वालाखे यांनी केली आहे. भारताच्या […]

अधिक वाचा..

गोव्यातील जागतिक मराठी संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार

अनिल खवटे आणि महेश मांजरेकर यांना मानाचे पुरस्कार मुंबई: पणजी (गोवा) येथे ९ ते ११ जानेवारी २०२६ दरम्यान जागतिक मराठी अकादमी आयोजित ‘शोध मराठी मनाचा’ या भव्य जागतिक संमेलनाचे उद्घाटन दि. ९ जानेवारी रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न होईल. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे या संमेलनाचे स्वागताध्यक्ष असून, ‘पद्मविभूषण’ डॉ. अनिल काकोडकर […]

अधिक वाचा..