महायुती सरकारची विक्रमी कामगिरी; विरोधकांनी बहिष्कार सोडून चर्चेला यावे; एकनाथ शिंदे

मुंबई: शेतकरी, महिला, कष्टकरी, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हिताला प्राधान्य देत महायुती सरकारने राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी विक्रमी निर्णय घेतले आहेत. विरोधकांनी बहिष्काराचे राजकारण सोडून सभागृहात येऊन विधायक चर्चा करावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांनी केले. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना शिंदे यांनी कर्जमाफी, शेतकरी मदत, लाडकी बहीण योजना, उद्योग गुंतवणूक, […]

अधिक वाचा..

महिला शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी अधिवेशनात विधेयक शासन कटिबद्ध; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

मुंबई: महिला शेतकऱ्यांना त्यांचे हक्क आणि सन्मान मिळवून देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून यासंदर्भातील महत्त्वाचे विधेयक पावसाळी अधिवेशनात मांडण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिली. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यंदाचे वर्ष संयुक्त राष्ट्रसंघ यांनी ‘आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष’ म्हणून जाहीर केले असल्याचे सांगत, महिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी शासन विविध पावले […]

अधिक वाचा..

बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे; ग्रॅच्युईटी, वेतनवाढ आणि ५ हजार नव्या बसांचा निर्णय

मुंबई: बेस्ट उपक्रमाच्या सक्षमीकरणासाठी आणि कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांवर सकारात्मक तोडगा निघाल्यानंतर बेस्ट कर्मचारी कृती समितीने संप मागे घेण्याची घोषणा केली आहे. उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. कर्मचाऱ्यांची प्रलंबित ग्रॅच्युईटीची रक्कम चालू आर्थिक वर्षात अदा करण्याचे मान्य करण्यात आले असून, नवीन वेतन करार होईपर्यंत बेस्ट कर्मचाऱ्यांना दरमहा ३,००० रुपये […]

अधिक वाचा..

जेसीबीच्या काचा फोडून १० हजारांची रोकड लंपास; चोरी की वैयक्तिक वाद

शिरूर (अक्षय टेमगिरे): देविदास बाळासाहेब सातकर यांच्या मालकीच्या उभ्या असलेल्या जेसीबी मशीनची अज्ञात व्यक्तींनी तोडफोड करून आतील रोकड चोरून नेल्याची घटना १९ जूनच्या मध्यरात्री घडली. मिळालेल्या माहितीनुसार, जेसीबी मशीनच्या काचा फोडून मशीनमध्ये डिझेलसाठी ठेवलेली सुमारे १० हजार रुपयांची रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून संबंधित मालकाचे आर्थिक नुकसान झाले […]

अधिक वाचा..

शिरुर; शिंदोडीत विटभट्ट्यांसाठी बेकायदेशीर मातीउपसा; महसूल-पोलिसांचे जाणीवपुर्वक दुर्लक्ष…?

शिंदोडी (तेजस फडके) शिंदोडी, ता. शिंदोडी येथील घोड धरणाच्या पात्रातुन शेतीच्या नावाखाली काळ्या मातीचा उपसा करुन तो विटभट्ट्यांसाठी विकण्याचा सपाटा गावातीलच एका मातीचोराने लावला या मातीमाफियाने गावच्या भूभागावर अक्षरशः बुलडोझर फिरवला आहे. शासनाचा महसूल बुडवून दिवसाढवळ्या सुरु असलेल्या या काळ्या धंद्याकडे महसूल विभाग, पोलिस प्रशासनाने आणि घोड पाटबंधारे विभाग जाणीवपुर्वक दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची […]

अधिक वाचा..

शिरुर; शेतकऱ्यांवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या सराईत आरोपींच्या पोलिसांनी दोन तासांत आवळल्या मुसक्या

शिंदोडी (तेजस फडके) निमोणे (ता. शिरुर) येथे घोडनदीच्या पात्रातील पाण्याच्या बांधावरुन झालेल्या वादाचे रुपांतर थेट जीवघेण्या हल्ल्यात झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणातील दोन सराईत आरोपींना शिरुर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या दोन तासांत शिताफीने अटक केली आहे. शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि 18 जून रोजी सायंकाळी  सुमारास निमोणे […]

अधिक वाचा..

शालेय शिक्षण विभागाचा गुगलसोबत करार; राज्यातील ४ लाख शिक्षकांना एआय प्रशिक्षणाचा लाभ

मुंबई: राज्यातील शिक्षकांना कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि डिजिटल तंत्रज्ञानाचे आधुनिक प्रशिक्षण देण्यासाठी शालेय शिक्षण विभाग आणि Google for Education⁠ यांच्यात उद्देशपत्रावर स्वाक्षरी करण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत पुढील दीड वर्षांत राज्यातील चार लाखांहून अधिक शिक्षकांना ‘गुगल एआय एज्युकेटर सिरीज’ अंतर्गत प्रशिक्षण दिले जाणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात झालेल्या कार्यक्रमात गुगल […]

अधिक वाचा..

पावसाच्या विलंबाची कारणे जाणून घेण्यासाठी जय पवारांची हवामान केंद्राला भेट

मुंबई: महाराष्ट्रात मान्सूनच्या प्रगतीला झालेल्या विलंबाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवानेते जय पवार यांनी मुंबईतील प्रादेशिक हवामान केंद्राला (RMC) भेट देत पावसाच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी हवामान तज्ज्ञांशी चर्चा करून राज्यातील पावसाच्या संभाव्य स्थितीबाबत माहिती घेतली. हवामान केंद्रातील तज्ज्ञ बिक्रम सिंग यांनी जय पवार यांचे स्वागत करून संस्थेच्या कार्याची माहिती दिली. त्यानंतर डॉ. नायर, सौ. […]

अधिक वाचा..

शिवसैनिकच बाळासाहेबांचे खरे वारस; हा फक्त ट्रेलर, पिक्चर अजून बाकी; एकनाथ शिंदे

शिवसेनेच्या हिरक महोत्सवी वर्धापन दिन सोहळ्यात शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल; विधान परिषदेत महायुती सर्व १७ जागा जिंकेल, असा विश्वास मुंबई : शिवसेनेच्या हिरक महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त गोरेगाव येथील नेस्को सभागृहात आयोजित कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटावर जोरदार टीका केली. “रक्ताचं नातं सांगून किंवा सातबाऱ्यावर नाव लावून कोणी वारस होत नाही, शिवसैनिकच […]

अधिक वाचा..

नाशिक–पुणे सरळ रेल्वेमार्ग रद्द; ‘उत्तर महाराष्ट्राच्या विकासावर घाला’ – सत्यजीत तांबे

नाशिक: केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नाशिक–पुणे सरळ रेल्वेमार्ग रद्द करून तो नाशिक–शिर्डी–अहिल्यानगर मार्गे नेण्याची घोषणा केल्याने उत्तर महाराष्ट्रात नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. या निर्णयावर विधान परिषद आमदार सत्यजीत तांबे यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत हा निर्णय उत्तर महाराष्ट्राच्या विकासाला बाधा आणणारा असल्याचे म्हटले आहे. तांबे म्हणाले की, नाशिक–पुणे सरळ रेल्वेमार्ग हा केवळ नाशिक […]

अधिक वाचा..