गुनाटमधील वाळूच्या Video मुळे प्रशासनाची धावपळ; पंचनामा झाला, पण गुन्हा दाखल होणार का…?

शिंदोडी (तेजस फडके): गुनाट (ता. शिरुर) येथील सरकारी गायरान जमिनीवर अवैधरित्या वाळूचा साठा केला असल्याचा व्हिडीओ ‘www.shirurtaluka.com’ ने प्रसिद्ध केल्यानंतर गुरुवारी (ता. १८) उशिरा त्याचा पंचनामा करण्यात आला. मात्र, ही कारवाई प्रशासनाच्या जागरुकतेमुळे नव्हे, तर ‘शिरुर तालुका डॉट कॉम’ च्या शोध पत्रकारीतेमुळे झाली आहे.   View this post on Instagram   A post shared by […]

अधिक वाचा..

टाकळी हाजी पोलीस हद्दीत अवैध धंद्यांचा सुळसुळाट?; नागरिकांकडून कारवाईची मागणी

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील बेट भागात जुगार, हातभट्टी दारू, ताडी तसेच अवैध मद्यविक्रीचे धंदे पुन्हा वाढल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. टाकळी हाजी पोलीस दूरक्षेत्राच्या हद्दीतील काही गावांमध्ये हे प्रकार सुरू असून, पोलीस प्रशासनाकडून प्रभावी कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मलठण परिसरात दिवसा ढवळ्या जुगाराचे फड सुरू असल्याची चर्चा […]

अधिक वाचा..
shirur-mseb-police

शिरूर तालुक्यात डीपी चोरीच्या घटना; संयुक्त पथकाने गस्तीला सुरुवात…

शिक्रापूर (ओमकार भोरडे): महावितरणच्या रोहित्र (डीपी) चोरीच्या घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी महावितरण व पोलिस प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने विशेष पथक कार्यान्वित करण्यात आले आहे. या पथकामार्फत रात्रीच्या वेळेत संवेदनशील व दुर्गम भागांमध्ये नियमित गस्त घालण्यात येत आहे. महावितरणचे अधिकारी व कर्मचारी तसेच पोलिस अधिकारी व कर्मचारी यांचा समावेश असलेल्या या संयुक्त पथकाने गस्तीला सुरुवात केली असून, रोहित्र […]

अधिक वाचा..
ranjangaon-midc-police station

शिरूर तालुक्यात प्रियकराने केली चिमुकल्याची हत्या; लिव्ह इन मुळे लाईफ धोक्यात…

शिरुर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील कारेगाव येथे हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली असून, एका तीन वर्षीय निष्पाप चिमुकल्याची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी एका युवकाला अटक केली आहे. लग्न करण्याच्या वादातून आरोपीने प्रेयसीच्या मुलालाच संपवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. रांजणगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राणी पप्पु कोल (वय 25) या कारेगाव येथील कल्याणी […]

अधिक वाचा..

यशोदाबाई गोविंद गंगाधर फडके चॅरिटेबल ट्रस्टतर्फे २०५ विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके व शालोपयोगी साहित्याचे वाटप

मुंबई : धी यशोदाबाई गोविंद गंगाधर फडके चॅरिटेबल ट्रस्टतर्फे गेल्या पाच वर्षांपासून राबविण्यात येणाऱ्या पाठ्यपुस्तक योजनेअंतर्गत यंदा बोरिवली (पूर्व) येथील अभिनव विद्यामंदिरातील २०५ विद्यार्थी-विद्यार्थिनींना पाठ्यपुस्तके आणि शालोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात आणि दिमाखदार समारंभात पार पडला.यावेळी ट्रस्टचे विश्वस्त सुरेश डोंगरे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत जोशी उपस्थित होते. तसेच रोटरी क्लब […]

अधिक वाचा..

आठवडे बाजारातील चोऱ्यांवर शिक्रापूर पोलिसांचा वचक; दोन महिला रंगेहात जेरबंद

तळेगाव ढमढेरे : शिरूर तालुक्यातील शिक्रापूर, कोरेगाव भीमा व तळेगाव ढमढेरे येथील आठवडे बाजारांमध्ये वाढत्या मोबाईल चोरी, पाकीटमारी आणि सोन्याचे दागिने चोरण्याच्या घटनांवर आळा घालण्यासाठी शिक्रापूर पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली असून या मोहिमेला यश मिळाले आहे. बाजार परिसरात गस्त घालत असताना पोलिसांनी दोन संशयित महिलांना रंगेहात ताब्यात घेतले. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली […]

अधिक वाचा..

शिरूरमध्ये तरुणाला अडवून पाच जणांकडून बेदम मारहाण; कामावरून काढल्याच्या रागातून हल्ला

शिरूर (अरुणकुमार मोटे): “तुझ्या चुकीच्या सांगण्यामुळे मला कंपनीतून कामावरून काढण्यात आले,” असा जाब विचारत एका तरुणाला रस्त्यात अडवून पाच जणांनी बेदम मारहाण केल्याची घटना शिरूर शहरातील वात्सल्य हॉस्पिटलसमोर घडली. या प्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सतिषकुमार जयप्रकाश सिंग (वय २६, रा. सुंदरसृष्टी, शिरूर, मूळ रा. बलिया, उत्तर प्रदेश) […]

अधिक वाचा..

ऑपरेशन टायगर की ‘ऑपरेशन बकरा’?

मुंबई: महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य करणारी “ऑपरेशन टायगर की ‘ऑपरेशन बकरा’?” या शीर्षकाची एक व्यंगात्मक पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आली आहे. पोंगडे महाराज यांच्या व्हायरल पोस्टमधील मांडणी आणि रूपकात्मक संदर्भांवर आधारित हा स्वतंत्र लेख असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या लेखात राजकीय पक्षांतील फूट, नेत्यांची पक्षांतराची भूमिका, सत्तेसाठी होणारी कथित फोडाफोड आणि लोकशाहीतील […]

अधिक वाचा..

सहा खासदारांची बंडखोरी म्हणजे जनतेशी व महाविकास आघाडीशी विश्वासघात; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांनी केलेली बंडखोरी ही केवळ उद्धव ठाकरे आणि शिवसेनेशीच नव्हे, तर महाविकास आघाडीशी आणि जनतेशीही केलेली गद्दारी असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. महायुतीच्या विरोधात जनतेने मतदान करून या खासदारांना विजयी केले होते. त्यामुळे त्यांच्या या कृतीला जनतेचा विश्वासघात मानत अशा गद्दारांना […]

अधिक वाचा..

झोपण्यापूर्वी पाणी अवश्य प्यावे

अनेकदा डॉक्टर भरपूर पाणी पिण्याचा सल्ला देतात. पण रात्री झोपण्यापूर्वी पाणी प्यायल्यास पाण्यापासून मिळणारे फायदे दुप्पट होतात. त्याबाबतीत जाणून घेऊया. 1)झोपण्यापूर्वी पाणी प्यायल्याने शरीरातील घाण, विषद्रव्ये बाहेर पडण्यास मदत होते. त्यामुळे फ्रेश, टवटवीत वाटते. पेशींना तारुण्य, टवटवी मिळेल. परिणामी त्वचा तजेलदार, फ्रेश दिसेल. 2) रात्री पाणी प्यायल्याने हॉर्मोन आणि ऊर्जेचा बॅलन्स साधला जातो. त्यामुळे शरीर […]

अधिक वाचा..