शिरुर तालुक्यात सर्व्हर डाऊनमुळे शेतकरी हैराण KYC अभावी शेतकऱ्यांचे दुष्काळी अनुदान रखडले

पाबळ (सुनिल जिते) शासनाकडून दुष्काळी आर्थिक मदत मिळण्यासाठी शेतकऱ्यांना केवायसी (KYC) करणे अनिवार्य करण्यात आले आहे. परंतु सर्व्हर डाऊन असल्यामुळे गेल्या दहा दिवसापासून शिरुर तालुक्यात केवायसी लिंक प्रणाली बंद आहे. परिणामी बँक खात्यात दुष्काळ निधी जमा होत नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत.   शिरुर मधील दुष्काळी सानुग्रह अनुदानासाठी कृषी विभागाकडून अर्ज भरून देण्यासाठी आव्हान केले […]

अधिक वाचा..

शिरुर निकृष्ट पोषण आहार प्रकरण; अमोल कोल्हे म्हणाले, नक्की पोषण कोणाचं सुरु आहे…?

शिरुर (तेजस फडके) सत्ताधाऱ्यांचं लक्ष केवळ आणि केवळ निवडणुकीवरच असल्यामुळे त्यांनी प्रशासन वाऱ्यावर सोडलं आहे. त्यामुळे नेमकं कोणाचं पोषण सुरु आहे हा प्रश्न आहे. गरोदर मातांचे आणि पोटातील बाळांचे पोषण होण्यापेक्षा सत्ताधाऱ्यांच्या जवळच्या कंत्राटदारांचे पोषण सुरु असल्याची टिका करत अशा कंत्राटदारांवर कारवाई व्हावी अशी मागणी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी पालकमंत्री यांच्याकडे केली आहे.   […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात आरोग्य विभागाचा हलगर्जीपणा गरोदर महिलांना दिल्या जाणाऱ्या आहारात अळ्या व सोनकीडे

शिरुर (अरुणकुमार मोटे) महाराष्ट्र शासनाने आरोग्य विभागाच्या माध्यमातुन गरोदर असणाऱ्या मातेस व गर्भात असणाऱ्या बालकास उत्तम प्रकारची शक्ती मिळावी यासाठी शासनाचा पोषक आहार म्हणून किट दिले जाते. त्यामध्ये बदाम ,खारीक, काजू गुळ व इतर पौष्टिक आहाराचा समावेश आहे. शासनाचे उद्दिष्ट हे त्या गरोदर मातेचे आणि बाळाचे आरोग्य तंदुरुस्त चांगले राहावे. तसेच त्यांची चांगली काळजी घेण्यासाठीच […]

अधिक वाचा..
sharad pawar

मोठी बातमी! शरद पवार यांचा दिलीप वळसे पाटील यांना मोठा धक्का…

शिरूर (तेजस फडके): राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंत्री दिलीप वळसे पाटील यांना मोठा धक्का दिला आहे. दिलीप वळसे पाटील यांचे निकटवर्तीय आणि विश्वासू सहकारी शेखर पाचुंदकर यांनी शरदचंद्र पवार पक्षाला पाठिंबा दिला आहे. शेखर पाचुंदकर यांच्यासह देवदत्त निकम आणि पदाधिकाऱ्यांनी शरद पवार गटात प्रवेश केला आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हा […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

शिरूरमध्ये नाकेबंदी दरम्यान मोटारीत आढळली लाखो रुपयांची रक्कम…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर पोलिस स्टेशन हद्दीत सतरा कमान पुलाजवळ निवडणुकी करिता नाकेबंदी करणाऱ्या शिरूर पोलिस स्टेशनच्या पथकाला तपसणी करीत असताना एम जी ग्लोस्टर गाडी मध्ये ५१ लाख १६ हजार रुपये रक्कम मिळून आले आहेत, अशी माहिती शिरूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांनी दिली. लोकसभा निवडणुकीमुळे शिरूर 17 कमान पुलाजवळ 10 एप्रिल 2024 […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

शिरूर तालुक्यात भरदिवसा महिलेची सोन्याची पोत हिसकावली…

कवठे येमाई (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथे पायी चाललेल्या महिलेला दुचाकीवरून आलेल्या तिघांनी अडवून तिच्या गळ्यातील एक तोळ्याची सोन्याची पोत हिसकावून नेली. मंगळवारी (ता. ९) सकाळी साडेदहाच्या सुमारास ही घटना घडल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. द्वारकाबाई शंकर भोर (वय ५०, रा. गणेशनगर, इनामवस्ती, कवठे येमाई, ता. शिरूर) यांनी शिरूर पोलिस ठाण्यात याबाबत फिर्याद […]

अधिक वाचा..
Mangaldas Bandal

शिरूर लोकसभेतील मंगलदास बांदल यांची उमेदवारी रद्द; कारण…

शिरूर (तेजस फडके): वंचित बहुजन आघाडीने शिरूर लोकसभेसाठी मंगलदास बांदल यांची निवड जाहिर केली होती. पण, मंगलदास बांदल यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इंदापूरमध्ये भेट घेतल्यानंतर उमेदवारी रद्द केली आहे. मंगलदास बांदल यांनी महायुतीच्या कार्यक्रमाला लावलेली उपस्थिती भोवली असल्याची चर्चा परिसरात रंगली आहे. शिवसेना शिंदे गटानंतर आता वंचित बहुजन आघाडीवर आपला जाहीर केलेला उमेदवार मागे […]

अधिक वाचा..
Shivajirao Adhalrao Patil

माजी आमदार विलास लांडे नाराज नाहीत: शिवाजीराव आढळराव पाटील

शिरुर (तेजस फडके) : अजित पवार यांचे कट्टर समर्थक माजी आमदार विलास लांडे नाराज नाहीत, असा दावा शिरूर लोकसभेचे राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केला आहे. शिरूर लोकसभेसाठी विलास लांडे ही इच्छुक होते. मात्र त्यांना डावलण्यात आल्यापासून ते प्रचारात फारसे सक्रिय दिसले नाहीत. म्हणूनच कदाचित आढळराव यांनी लांडे यांची भेट घेतली. या भेटीनंतर आढळरावांनी […]

अधिक वाचा..
devendra-fadnavis-mangaldas Bandal

मंगलदास बांदल यांनी घेतली देवेंद्र फडणवीस यांची भेट; चर्चांना उधाण…

पुणे, (तेजस फडके) : वंचित बहुजन आघाडीचे शिरूर लोकसभेचे उमेदवार मंगलदास बांदल यांनी शुक्रवारी (ता. ५) उपमुख्यमंत्री तथा भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. लोकसभा निवडणुका घोषित होण्यापूर्वीच शिरूर लोकसभा मतदारसंघ चर्चेत होता. अजित पवार यांनी बंडखोरी केल्यानंतर शिरुर लोकसभा निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. यासाठी शिवसेना शिंदे गटातून उमेदवार आयातही […]

अधिक वाचा..
Leader

शिरूर तालुक्यात निवडणुकीच्या धामधुमीत चारा, पाणीटंचाईकडे दुर्लक्ष…

कान्हूर मेसाई (सुनिल जिते): मागील वर्षाच्या पावसाळ्यात पुरेसा पाऊस झालेला नसल्याने यंदा बहुतांश गावांत चारा, पाणीटंचाई आहे. अनेक भागांत जनावरे जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. मात्र, प्रशासनासह लोकप्रतिनिधी, नेते लोकसभा निवडणुकीत व्यस्त असल्याने चारा टंचाई, पाणीटंचाईसारख्या प्रमुख मुद्दे दुर्लक्षित असल्याचे दिसून येत आहे. राज्यात गतवर्षीच्या पावसाळ्यात पुरेसा पाऊस झाला नाही. शिवाय अधिक काळ नद्या, नाले, […]

अधिक वाचा..