शिंदोडी (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील निमोणे गावात मजुरी करण्यासाठी आलेल्या बिहार येथील कुटुंबातील दोन वर्षीय मुलीचा मृत्यू झाला असुन याबाबत मुलीच्या वडिलांनी शिरुर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली आहे.

याबाबत शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरवार दि २९ ऑगस्ट २०२४ रोजी सायंकाळी ६:३० च्या सुमारास फिर्यादी विमलकुमार बहादुर राम (वय २७) सध्या रा. काळेवस्ती रोड, निमोणे ता. शिरुर, जि. पुणे, मुळ रा. दिघली, हसनपुर वार्ड ३३ किसनगंज, बिहार हे त्यांची पत्नी व मुलगी असे घरी असतांना मुलगी जान्हवी कुमारी ही घराच्या बाहेर अंगणात मांजरासेाबत खेळत होती.
अचानक मुलीचा रडण्याचा आवाज आल्याने विमलकुमार राम आणि त्यांची पत्नी दोघेही घरातुन बाहेर आले असता. सापाने मुलीला डाव्या पायाला दंश करतांना त्यांनी बघितले. त्यानंतर त्यांनी मुलीली जवळ घेतले असतां साप हा जवळ असलेल्या बिळामध्ये जातांना दिसला त्यानंतर त्यांनी मालक संभाजी ढगे यांना फोन करुन सांगीतले. त्यानंतर त्यांचे मालक ढगे यांनी त्यांच्या गाडीत मुलीस उपचारसाठी शिरुर येथील ग्रामीण रुग्णालयात आणले.
तेथील डॉक्टरांनी जान्हवी कुमारी विमलकुमार राम (वय २) हि उपचारापुर्वीची सायंकाळी ७:३० च्या सुमारास मयत झाली असल्याचे घोषित केले. शिरुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक विनोद मोरे या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
शिरुर तालुक्यात नराधम बापानेच केला अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार; आरोपी बापाला अटक
शिरुर-तांदळी रस्त्यावर गुनाटजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार
शिरुर पोलिसांची दहा इलेव्हन कॅफे वर धडक कारवाई, मुला-मुलींचे अश्लील वर्तन; कॅफे चालकावर गुन्हा दाखल