शिरुर तालुक्यात बेकायदेशीर पिस्टल बाळगणाऱ्यास रांजणगाव पोलीसांनी केली अटक

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यात सध्या बेकायदेशीर पिस्टल बाळगण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असुन रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन हद्दीतील औद्योगिक वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणावर परप्रांतीय कामगारवर्ग असल्याने त्यांच्या मदतीने परराज्यातुन अवैधरित्या पिस्टल मागविले जातात. कारेगाव MIDC परीसरातील यश इन चौक येथे गावठी पिस्टल जवळ बाळगणाऱ्या एकास रांजणगाव पोलिसांनी एकास अटक केली आहे.   रांजणगाव पोलिसांनी मागील चार […]

अधिक वाचा..
sharad pawar dilip walse patil

मानसपुत्र दिलीप वळसे पाटील यांच्या मतदारसंघात धडाडणार शरद पवार यांची तोफ…

मंचर (पुणे): मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या आंबेगाव मतदारसंघामध्ये शरद पवार यांची आज (बुधवार) तोफ आज धडाडणार आहे. मंचर मधील या सभेत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे आणि आमदार रोहित पवार ही वळसे पाटलांवर निशाणा साधणार आहेत. यामुळे अनेकांचे लक्ष आजच्या सभेकडे लागले आहे. दिलीप वळसे पाटील यांना शरद पवार यांचे मानसपुत्र मानले जायचे. […]

अधिक वाचा..

शिरुर मध्ये एस के खांडरे सराफ यांच्या भव्य सुवर्ण दालनाचे उद्योगपती प्रकाश धारीवाल यांच्या हस्ते उदघाटन

शिरुर (तेजस फडके) येथील 200 वर्षाहूनही अधिक काळ जुन्या सुवर्णपेढीची विश्वासार्ह परंपरा असलेल्या एस के खांडरे भैय्या सराफ यांच्या भव्य सुवर्ण दालनाचे उद्या (दि 19) रोजी सकाळी 10:05 वाजता शिरुरचे प्रसिद्ध उद्योगपती प्रकाश धारीवाल तसेच त्यांच्या पत्नी दिना धारीवाल यांच्या हस्ते उदघाटन होणार असल्याची माहिती शंतनु खांडरे यांनी दिली. सध्या खांडरे सराफ यांची पाचवी पिढी […]

अधिक वाचा..
Shivajirao Adhalrao Patil

शिवाजीराव आढळराव पाटील यांनी निवडणूकीबाबत फोडली डरकाळी…

पुणे : शिरूर लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची पुणे म्हाडाच्या अध्यक्षपदी वर्णी लागली आहे. म्हाडाच्या पदासाठी लोकसभा सोडणाऱ्यातला मी नाही, मी शिरूर लोकसभा लढणारच, असे शिवाजीराव आढळराव पाटील यांनी म्हटले आहे. महायुतीकडून शिरूर लोकसभा कोण लढणार? याची उत्सुकता शिगेला पोहचलेली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव आढळराव पाटील […]

अधिक वाचा..

Video; घोडगंगा कारखान्याच्या थकीत पगारासाठी कामगारांचे ‘शोले’ स्टाईल आंदोलन

शिंदोडी (तेजस फडके) घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचा 15 महिन्याचा पगार थकल्याने तीन कामगार घोडगंगा कारखान्याच्या धुराड्याच्या चिमणीवर 300 फुटावर चढून अनोखे आंदोलन केले आहे. सकाळी 10 वाजल्यापासून हे कामगार कारखान्याच्या धुराड्याच्या चिमणीवर चढले होते. महेंद्र काशीद, तात्यासाहेब शेलार व संतोष तांबे हे तीन कामगार कारखान्याच्या धुराड्याच्या चिमणीवर चढून बसले होते. तसेच हे कामगार कोणाचच ऐकायला […]

अधिक वाचा..

वाघाळे येथील शामराव एकनाथ शेळके यांचे निधन

वाघाळे (प्रतिनिधी) शिरुर तालुक्यातील वाघाळे (पासुडीमळा) येथील शामराव एकनाथ शेळके (वय 43) यांचे आज (शुक्रवार) पहाटे सहाच्या दरम्यान अल्पशा आजाराने पुण्यातील खाजगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर वाघाळे (पासुडीमळा) येथे आज दुपारी 1 च्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.   शामराव शेळके यांच्या मागे आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, […]

अधिक वाचा..

शिक्रापुर पोलिस स्टेशनचे API केशव वाबळे यांनी महाराष्ट्राला मिळवून दिले सुवर्णपदक

शिक्रापुर (तेजस फडके) शिक्रापूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सहायक पोलिस निरीक्षक केशव वाबळे यांनी गोवा येथे नुकत्याच पार पडलेल्या ‘नॅशनल मास्टर्स गेम्स २०२४’ या विविध स्पर्धांमध्ये महाराष्ट्राचे नेतृत्व करत महाराष्ट्राला धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक तसेच रौप्यपदक मिळवून दिले आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे महाराष्ट्र पोलिसांची मान उंचावली असुन त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. केशव वाबळे हे सन […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात बंदूकिचा धाक दाखवत एका व्यक्तीचे अपहरण करुन जीवघेणा हल्ला…

कारेगाव (तेजस फडके) सध्या राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी गोळीबार करत हत्या करण्याचे प्रकार सुरु असताना शिरुर तालुक्यात एका व्यक्तीस दाखल असलेल्या गुन्ह्याबाबत चर्चा करायची आहे अस सांगत एका ठिकाणी बोलावून घेत नंतर बंदूकिचा धाक दाखवत त्याचे अपहरण करत त्याच्यावर जीवघेणा हल्ला करुन त्यानंतर त्याला अष्टविनायक महामार्गावर कवठे-पारगाव रस्त्यावरील लाखणगाव वनविभागाच्या क्षेत्रात नेऊन टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर […]

अधिक वाचा..
amol kolhe

मंत्र्याचा दावा; अमोल कोल्हे कधीही अजित पवार गटात येऊ शकतात…

मुंबई : शरद पवार गटाचे शिरुर लोकसभा मतदार संघाचे खासदार अमोल कोल्हे यांची शरद पवार गटाने उमेदवारी जाहीर केली असली, तरी ते कधीही अजित पवार गटात येऊ शकतात, असे संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) मंत्री धर्मबाबा आत्राम यांनी दिले आहेत. या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ पसरली आहे. मंत्री धर्मबाबा आत्राम म्हणाले की, ‘शरद पवार […]

अधिक वाचा..

शिरुर येथे मुस्लिम विकास परिषदची बैठक संपन्न; पुणे जिल्हा तसेच शिरुर तालुका कार्यकारणी जाहिर

शिरुर (तेजस फडके) मुस्लिम विकास परिषद महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष अब्दुल सत्तार यांच्या नेतुत्वाखाली आणि मुस्लिम विकास परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शेरखान अकबरखान यांच्या मार्गदर्शनाखाली शिरुर येथील हॉटेल सदगुरु येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीमध्ये पुणे जिल्हा कार्यकारणी तसेच मुस्लिम समाजाच्या समस्या आणि अडचणीवर चर्चा करण्यात आली.या बैठकीमध्ये सर्वांनुमते पुणे जिल्हा तसेच शिरुर […]

अधिक वाचा..