ajit pawar

शिरूर! मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्याच्या नावाचा वापर करुन ‘स्वयंघोषित नेते’ धरतात अधिकाऱ्यांना वेठीस…?

शिरूर (तेजस फडके) : सोलापूर जिल्ह्यातील करमाळा उपविभागीय पोलिस अधिकारी (DYSP) अंजना कृष्णा आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ‘दादागिरी’ च्या संभाषणाचा व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर तुफान व्हायरल होत आहे. अजित पवार यांच्यावर टिकेची झोड उठल्यानंतर त्यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्याचा माझा उद्देश होता, अशी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार यांचा बेधडकपणा सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे. […]

अधिक वाचा..

रामलिंग महिला उन्नती बहु सामाजिक संस्थेच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त तालुकास्तरीय आदर्श शिक्षिक पुरस्कार २०२५ वितरण

शिरूर (किरण शेलार पिंगळे): रामलिंग महिला उन्नती बहु सामाजिक संस्थेच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त तालुकास्तरीय आदर्श शिक्षिका पूरस्कार २०२५ वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. शिक्षकांचे व्यक्तिमत्त्व घडविण्यातील योगदान तसेच समाजकार्यातील सहभाग अधोरेखित करत गेली नऊ वर्षे हे पुरस्कार दिले जात असल्याचे संस्थेने स्पष्ट केले. […]

अधिक वाचा..
leopard

Video; कुत्राही मैत्रीला जागला…बिबट कुत्र्याच्या हल्ल्यात सहकारी कुत्र्याची मित्राला वाचविन्यासाठी धडपड…

शिरुर (तेजस फडके): आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव घोडे गावात मैत्रीचा धडा देत कुत्र्यांच्या धाडसाने बिबट्यालाही घाबरवलंय…! कुत्र्यांच्या निडर मैत्रीसमोर बिबट्यालाही माघार घ्यावी लागली. कुत्रा एकटा जखमी झाला तरी दुसऱ्या सहकाऱ्याने दिलेलं बळ, ही खरी मैत्रीची ताकद सीसीटीव्हीत कैद झाली आहे. पिंपळगाव घोडे येथील शेतकरी महादेव जगदाळे यांच्या घरासमोर दबक्या पावलांनी शिकारीच्या शोधात बिबट्या आला अन रखवालीसाठी […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यातील बापलेकाचा विहिरीत विजेच्या धक्क्याने मृत्यू

शिरूर दि.०५ ( अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथील साबळेवाडी येथे शुक्रवारी (दि. ५) सकाळी घडलेल्या दुर्दैवी घटनेत बापलेकाचा विहीरीत विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मृतांमध्ये सुदाम सुभाष गाढवे (वय ४३) व त्यांचा मुलगा भारत सुदाम गाढवे (वय १७) यांचा समावेश आहे. सुदाम गाढवे हे सकाळी विहिरीवरील […]

अधिक वाचा..

Video; शिरुर तालुक्यात शेतकऱ्यांवर दुहेरी संकट; एकीकडे बिबटया तर दुसरीकडे केबल चोरी

रांजणगाव गणपती (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील शेतकऱ्यांवर दुहेरी संकट कोसळले असुन रात्रीच्या वेळी शेतात पाणी देणे म्हणजे जीव मुठीत धरुन जाण्यासारखे झाले आहे. एका बाजूला बिबट्याचा धोका तर दुसऱ्या बाजूला चोरट्यांचा सुळसुळाट या दुहेरी संकटामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. एकीकडे बिबट्याच्या भीतीमुळे शेतकरी रात्री शेतात जाण्याचे टाळतात. तर दुसरीकडे याचाच फायदा घेत चोरटे बोरवेल व […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील पिंपरखेड येथे नर बिबट्या जेरबंद ; वनविभागाची कारवाई

शिरुर (अरुणकुमार मोटे) पिंपरखेड (ता. शिरुर) परिसरात नागरिकांवर हल्ला करणाऱ्या नर बिबट्याला अखेर वनविभागाने बुधवारी (दि ३) रोजी रात्री साडेदहा वाजता यशस्वीपणे जेरबंद केले. शेतकरी बबन सोनू बोंबे यांच्या शेतात लावलेल्या पिंजऱ्यात हा अंदाजे साडेचार ते पाच वर्षांचा बिबट्या अडकला. वनरक्षक लहू केसकर व वनपाल महेंद्र दाते यांच्या पथकाने तत्काळ कारवाई करुन बिबट्याला सुरक्षितपणे पकडले. […]

अधिक वाचा..

आरोग्य केंद्रातील मुजोर डॉक्टरवर वरीष्ठांची कारवाई कधी? कारवाई न झाल्यास ग्रामस्थ करणार उपोषण

शिरूर (अरुणकुमार मोटे): टाकळी हाजी प्राथमिक आरोग्य केंद्रावर गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या डॉक्टरांच्या मुजोरीविरोधात आता ग्रामस्थांचा संताप प्रत्यक्ष कृतीतून प्रकट होऊ लागला आहे. नऊ ग्रामपंचायतींनी संयुक्तपणे जिल्हा प्रशासनाला अंतिम इशारा दिल्यानंतरही ठोस कारवाई न झाल्यामुळे ग्रामस्थांनी आरोग्य केंद्रासमोर पुढील आठवड्यात धरणे आंदोलनाची तयारी सुरू केली आहे. या आरोग्य केंद्रातील डॉक्टरचे वडील उपजिल्हाधिकारी असून ते […]

अधिक वाचा..

पिंपरी दुमाला येथे अज्ञात चोरट्यांकडून दहा शेतकऱ्यांची तांब्याची केबल व मोटारची चोरी

रांजणगाव गणपती (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील पिंपरी दुमाला गावच्या हद्दीत मधील शेतातील विहिरीवर बसविलेली पाणी ओढायची ५ एचपी क्षमतेची किर्लोस्कर कंपनीची मोटार तसेच तब्बल १ हजार ८० फुट तांब्याची वायर किंमत अंदाजे ३९ हजार रुपये अज्ञात चोरट्यांनी लंपास केली आहे. फिर्यादी श्रीकृष्ण विष्णु सोनवणे (रा. पिंपरी दुमाला, ता शिरुर, जि. पुणे) यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलिस […]

अधिक वाचा..

चिंचणी येथील आबा धावडे यांची भाजपच्या तालुका उपाध्यक्षपदी निवड

न्हावरे (अक्षय टेमगिरे) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी गावातील आबा धावडे यांची भाजपच्या तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक प्रदीप कंद तसेच शिरुर बेट मंडळचे अध्यक्ष राहुल पाचर्णे यांच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले.   आबा धावडे हे गेल्या २० वर्षांपासुन लोकनेते माजी आमदार स्वर्गीय बाबुराव पाचर्णे तसेच भाजपाचे […]

अधिक वाचा..

शिक्रापूर पोलिसांचे आव्हान, डीजे व डॉल्बीला परवानगी नाही, पारंपरिक पद्धतीने साजरा करा गणेश विसर्जन

शिक्रापूर (ओमकार भोरडे): गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शिक्रापूर पोलिस स्टेशनने हद्दीतील सर्व गणेश मंडळांना महत्त्वाची सूचना दिली आहे. उत्सव काळात डीजे, डॉल्बी, लेझर लाईट आदींवर संपूर्ण बंदी घालण्यात आली असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे. गावातील गणेशोत्सव शांततेत आणि पारंपरिक पद्धतीने […]

अधिक वाचा..