ranjangaon-midc-police station

शिरुर तालुक्यात बेकायदेशीर वास्तव्य करणारे बांगलादेशी सापडले; चार जणांना अटक

कारेगाव (तेजस फडके) पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी शाखा आणि रांजणगाव पोलीस स्टेशन यांनी संयुक्त कारवाई करत मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे कारेगाव (ता. शिरुर) येथे छापा टाकून बांगलादेशातील चार नागरिकांना बेकायदेशीर वास्तव्य करताना अटक केली असुन त्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. कारेगाव येथुन १) कमरोल रमजान शेख (वय ३२, रा. फुलताला, जि. खोलना, बांगलादेश), २) […]

अधिक वाचा..

शिरुर-चौफुला रस्त्यावर अपघात; एकाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी

न्हावरे (तेजस फडके) शिरुर-चौफुला रस्त्यावर आंधळगाव फाटा येथे दुचाकी आणि पिकअप यांच्यात समोरासमोर भीषण अपघात होऊन एका युवकाचा मृत्यू झाला असुन दुसरा गंभीर जखमी झाला आहे. या अपघात प्रकरणी पिकअप चालक दत्तात्रय रामचंद्र कदम (रा. रामलिंग, ता. शिरुर, जि. पुणे) याच्याविरुद्ध शिरूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत शिरुर पोलिस स्टेशन येथे विकास रोहीदास मदने […]

अधिक वाचा..

शिरुर; आंतरजिल्हा दरोडेखोर टोळीचा पर्दाफाश : म्होरक्यासह दोघांना अटक, ६ गुन्हे उघड

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील आंबळे गावात ६ जुलै २०२५ रोजी मध्यरात्री झालेल्या दरोड्याच्या गुन्ह्याचा छडा लावत पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरुर पोलीस स्टेशनच्या पथकाने आंतरजिल्हा दरोडेखोरांच्या टोळीचा प्रमुख संजय तुकाराम गायकवाड (रा. जालना) आणि त्याचा साथीदार सागर सुरेश शिंदे (रा. मंठा, जालना) यांना अटक केली आहे. या कारवाईत दरोडा, जबरी चोरी व […]

अधिक वाचा..
Shirur-Sarpanch-Sodat

शिरूर तालुक्यात सरपंच आरक्षण सोडत: कुठे जल्लोष, कुठे निराशा!

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील ग्रामपंचायतींसाठी आज (ता. ११) सरपंचपद आरक्षणाची सोडत मुख्य शिरूर तहसील कार्यालयातील प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात उत्साहात पार पडली. एकूण ९६ ग्रामपंचायतींसाठी सरपंचपद आरक्षण जाहीर झाले असून, अनेक गावांमध्ये खुल्या पदामुळे जल्लोष, तर काही गावांत आरक्षणामुळे हिरमोड झाल्याचे दृश्य पाहायला मिळाले. त्यामुळे “कही खुशी, कही गम” अशा मिश्र भावना या सोडतीत […]

अधिक वाचा..

रामलिंग महिला उन्नतीच्या वतीने गुरुपौर्णिमेनिमित्त ‘गुरुरत्न पुरस्कार’ वितरण सोहळा

शिरुर (किरण शेलार-पिंगळे) गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने ‘गुरुरत्न पुरस्कार’ वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी समाजात सकारात्मक दिशा देणारे, मार्गदर्शक ठरणारे व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यात आला. आई-वडील, शिक्षक आणि जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला योग्य मार्गदर्शन करणाऱ्या व्यक्ती हीच खरी गुरुस्थाने असून, त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त […]

अधिक वाचा..

शिरूरमध्ये ऑनलाईन सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार

प्रितम-प्रकाश नगरमधील नागरिकाच्या खात्यातून १ लाख रुपये लंपास शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील प्रितम-प्रकाश नगर येथील एका रहिवाशाच्या बँक खात्यातून अज्ञात सायबर चोरट्यांनी ऑनलाईन फसवणूक करत तब्बल १ लाख रुपये लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, सायबर सुरक्षेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणी […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात ९६ ग्रामपंचायतींसाठी आरक्षण जाहीर करण्याची प्रक्रिया ११ जुलै रोजी

तहसील कार्यालयात दुपारी १२ वाजता सोडत शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील ग्रामपंचायतींसाठी मोठी आणि महत्त्वाची प्रक्रिया या आठवड्यात पार पडणार आहे. एकूण ९६ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठीचे आरक्षण शुक्रवारी, ११ जुलै २०२५ रोजी निश्चित करण्यात येणार आहे. ही आरक्षण प्रक्रिया अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), इतर मागास वर्ग (OBC) आणि महिला या प्रवर्गासाठी पार पडणार […]

अधिक वाचा..
railway

मोठी बातमी! पुणे-नगर रेल्वेमुळे प्रवाशांचा वाचणार वेळ; पाहा रेल्वे स्थानकं…

मुंबईः पुणे आणि अहिल्यानगर यांच्यातील प्रदीर्घ प्रतीक्षेत असलेल्या थेट रेल्वेमार्गाच्या प्रकल्प अहवालाला आता अधिकृत मान्यता मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रेल्वेच्या बांधकाम विभागाने हा डीपीआर रेल्वे बोर्डाकडे सादर केला असून, या मार्गामुळे पुणे-नगर दरम्यानचा प्रवास सुमारे ३८ किलोमीटरने कमी होणार आहे, अशी माहिती खासदार निलेश लंके यांनी दिली. पुणे शहरातून नगरला प्रवास करण्यासाठी दौंडमार्गे रेल्वे […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात लंपी रोगाचा प्रकोप; शेतकऱ्यांचे जनावरे संकटात, भरपाई व तत्काळ उपचाराची मागणी तीव्र

शिरूर (अरुणकुमार मोटे): सध्या शिरूर तालुक्यातील विविध गावांमध्ये गोवंश जनावरांमध्ये लंपी स्किन रोगाने थैमान घातले असून शेतकऱ्यांच्या उपजीविकेचा मुख्य आधार असलेल्या जनावरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. अनेक ठिकाणी जनावरे आजारी पडत असून काही ठिकाणी जनावरांचे मृत्यूही झाले आहेत. या गंभीर परिस्थितीकडे शासनाचे व वैद्यकीय अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. सरकारी डॉक्टरांचा […]

अधिक वाचा..

शिरूर तहसील कार्यालयासमोर शिवसेनेच्या वतीने गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात संतप्त निषेध आंदोलन

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज शिरूर तहसील कार्यालयासमोर आ. गोपीचंद पडळकर यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करण्यासाठी तीव्र आंदोलन छेडण्यात आले. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्याविषयी आ. पडळकर यांनी केलेल्या वाचाळ वक्तव्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील शिवसैनिक आणि मराठी जनतेच्या भावना दुखावल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आज पुणे जिल्हा संपर्कप्रमुख […]

अधिक वाचा..