खंडणी मागणारे पाच पोलिस कर्मचारी निलंबित

बुलढाणा: चित्रपट व्यवसायाशी संबंधित कर्नाटक राज्यातील चार जण चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी लोकेशन बघण्यासाठी मलकापूरकडे आपल्या वाहनाने निघाले होते. दरम्यान चिखली बुलडाणा मार्गावर दोन वाहतूक पोलिसांनी तर, पुढे आणखी तीन पोलिसांनी त्यांचे वाहन अडवून त्यांना खंडणी मागितली. पाचही खंडणीखोर पोलिसांना जिल्हा पोलिस अधीक्षक नीलेश तांबे यांनी निलंबित केले आहे. या प्रकरणात पाचही आरोपी पोलिसांविरुद्ध चिखली पोलिसांत विविध […]

अधिक वाचा..

शारदा एज्युकेशन सोसायटीच्या अँबर इंटरनॅशनल स्कूलमध्ये मुंबई व ठाण्यातील पहिल्या ‘स्पेस अँड इनोव्हेशन लॅब’चे लोकार्पण

पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर करतील उद्घाटन आणि देतील पाठबळ मुंबई: मुंबई आणि ठाण्याच्या शैक्षणिक व वैज्ञानिक क्षेत्रात नवे पर्व सुरू करणाऱ्या ऐतिहासिक घडामोडीत, शारदा एज्युकेशन सोसायटीच्या अँबर इंटरनॅशनल स्कूलच्या उच्चस्तरीय प्रतिनिधीमंडळाने भारतातील नामांकित वैज्ञानिक, नवोन्मेषप्रवर्तक आणि पद्मविभूषण पुरस्कार विजेते डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या निवासस्थानी भेट दिली. या प्रतिनिधीमंडळात डॉ. प्रदीप धवळ (विश्वस्त), डॉ. प्रतिक मुणगेकर […]

अधिक वाचा..

काँग्रेसच्या नवनियुक्त जिल्हाध्यक्ष व तालुकाध्यक्षांचे दोन दिवसीय शिबिर टिळक भवनात संपन्न

प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांसह विविध विषयातील तज्ञांचे शिबिरार्थींना मार्गदर्शन मुंबई: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या नवनियुक्त जिल्हाध्यक्ष आणि तालुकाध्यक्ष यांच्या दोन दिवसीय निवासी शिबिराचे आयोजन प्रदेश कार्यालय टिळक भवन येथे करण्यात आले होते. प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शिबीराचे उद्घाटन केले तर प्रभारी रमेश चेन्नथला यांनी देखील व्हिडिओ काँफ्रन्सच्या माध्यमातून संवाद साधला. माजी खासदार कुमार केतकर यांनी समकालीन राजकीय […]

अधिक वाचा..

खडसे कुटुंबावर आरोप! खडसेंची सून मैदानात, रक्षा खडसेंनी केलं मोठं वक्तव्य…

पुणे: पुण्यात सुरू असलेल्या एका रेव्ह पार्टीवर पोलिसांनी छापेमारी केली होती, या प्रकरणात एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली आहे, ते सध्या जेलमध्ये आहोत. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणात गंभीर आरोप केले आहेत, त्यामुळे वातावरण आणखी तापलं आहे. दरम्यान दुसरीकडे भाजपकडून सातत्यानं राष्ट्रवादी शरद […]

अधिक वाचा..

स्वाभिमान गहाण टाकलेल्या उबाठाला काँग्रेसने जागा दाखवली; शिवसेना प्रवक्त्या डॉ. प्रा. ज्योती वाघमारे 

सावरकरांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधीसमोर उबाठा झुकले मुंबई: इंडिया आघाडीच्या बैठकीत शेवटच्या रांगेत बसणाऱ्या उबाठांनी स्वाभिमान गहाण टाकला, अशी घणाघाती टीका शिवसेना प्रवक्त्या डॉ. प्रा. ज्योती वाघमारे यांनी आज केली. बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. महाराष्ट्रात असताना दिल्लीसमोर झुकणार नाही, अशी भाषा करणारे उबाठा दिल्लीत सोनिया आणि राहुल गांधींसमोर मुजरा करायला […]

अधिक वाचा..

‘चिप मिनिस्टर’ देवेंद्र फडणवीस निवडणूक आयोगाचे दलाल की वकील

मतचोरीची उच्चस्तरीय चौकशी न करता राहुल गांधींवर आगपाखड कशासाठी मुंबई: लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाच्या मदतीने भाजपाने मतचोरी कशी केली, हे पुराव्यासह मांडून देशात एकच खळबळ उडवून दिली. राहुल गांधींच्या धमाक्यानंतर आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेत प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केले. दादरमध्ये चक्काजाम करून […]

अधिक वाचा..

लेकीच्या जन्मानंतर मिळतात ५०,००० रुपये; माझी कन्या भाग्यश्री योजना नक्की आहे तरी काय

मुंबई: महाराष्ट्र सरकारने मुलींसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. मुलींना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी या योजना राबवल्या आहेत. अशीच एक योजना म्हणजे माझी कन्या भाग्यश्री. माझी कन्या भाग्यश्री योजनेत मुलींना आर्थिक मदत मिळते. मुलींच्या जन्माचे दर वाढवण्यासाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे. माझी कन्या भाग्यश्री योजनेत मुलींना एकरकमी ५०,००० रुपये दिले जातात. मुलगी १८ वर्षांची होईपर्यंत […]

अधिक वाचा..

गणेशोत्सवात सर्व शाळांना पाच दिवस सुट्टी बंधनकारक

मुंबई: गणेशोत्सव साजरा करण्यासाठी विद्यार्थी, पालक व शिक्षक मूळ गावी जातात. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवाच्या काळात सर्व शाळांना पाच दिवस सुट्टी देण्यात येणार आहे. या काळात कोणत्याही परीक्षा घेतल्या जाणार नाहीत. युवासेना आणि शिवसेनेच्यावतीने यासंदर्भात करण्यात आलेल्या मागणीला यश आले आहे. राज्य सरकारने यंदाचा गणेशोत्सव महाराष्ट्र राज्य महोत्सव म्हणून जाहीर केला आहे. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव जोरात […]

अधिक वाचा..

स्टॅम्प पेपरवरील ‘ताबे-इसार-पावती’ नावाने नोटरी चालणार नाही…

मुंबई: केवळ नोटरी केलेला व स्टॅम्प शुल्क न भरता तयार केलेला विक्री करार कायदेशीर नसून, तो न्यायालयात पुरावा म्हणून ग्राह्य धरला जाऊ शकत नाही, असे मुंबई हायकोर्टाने म्हटले आहे. बीडच्या सलीम बेग यांनी सय्यद नविद यांच्याशी ९२.५ लाखांमध्ये जमीन विक्रीचा करार केला. हा करार २६ जून २०२० रोजी १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर “ताबे-इसार-पावती” या नावाने […]

अधिक वाचा..

गाडीची चावी न दिल्याच्या किरकोळ कारणावरून छातीत ठोसा मारला अन्…

पुणे: गाडीची चावी न दिल्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादात एका तरुणाने दुसऱ्याच्या छातीत जोरात ठोसा मारल्याने गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना बुधवार (दि.६) सायंकाळी लोहियानगर परिसरात घडली. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. सागर राजू अवघडे (वय ३०) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी सूरज […]

अधिक वाचा..