शिक्षक भरती घोटाळा! राज्यात ‘एसआयटी’कडून बोगस शिक्षक भरती केल्या प्रकरणाची चौकशी सुरू

मुंबई: बनावट शालार्थ आयडी तयार करून बोगस शिक्षक भरती केल्या प्रकरणाच्या चौकशीसाठी राज्य सरकारने ‘विशेष चौकशी पथका’ची (एसआयटी) स्थापना केली आहे. हे पथक नागपूरसोबतच नाशिक, जळगाव, मुंबई आणि मराठवाड्यातील बीड व लातूर येथील शिक्षक भरतीची चौकशी करणार आहे. नागपूर विभागात काही दिवसांपूर्वी बोगस शिक्षक भरतीचा घोटाळा उघडकीस आला. अपात्र शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची नावे शालार्थ प्रणालीमध्ये […]

अधिक वाचा..

उद्धव ठाकरे हेच भाजपचे नैसर्गिक मित्र, शिंदेंची शिवसेना केवळ ॲडजस्टमेंट

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात, विशेषतः सत्ताधारी युतीमध्ये सर्व काही आलबेल नाही. सध्या कोणीही असा दावा करू शकत नाही. गेल्या काही आठवड्यात राज्यात राजकीय बदलाच्या जोरदार सुरू आहेत. आणि या चर्चा काही विनाकारण नाहीत. जर आपण माध्यमांमध्ये येणाऱ्या बातम्या बारकाईने समजून घेतल्या तर असे म्हणता येईल की राज्यातील भाजप आणि शिवसेना शिंदे गटात बरीच धुसफूस आहे. म्हणूनच […]

अधिक वाचा..

7 वर्षीय विद्यार्थिनीवर शिक्षकाकडून अत्याचार…

अहिल्यानगर: अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता तिसरीत शिक्षण घेणाऱ्या ७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर शाळेतील शिक्षकाने लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या गंभीर प्रकरणाची तक्रार दडपण्यासाठी धमकी दिल्याच्या आरोपावरून पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. मुख्य आरोपी शिक्षक अद्याप फरार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाथर्डी तालुक्यातील पागोरी पिंपळगाव जिल्हा परिषदेच्या शाळेत […]

अधिक वाचा..

पुणे जिल्ह्यात तीन नव्या महापालिका होणार; अजित पवार

पुणे: उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज (8 ऑगस्ट) पहाटेच्या सुमारास मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होणाऱ्या चाकण चौक आणि परिसराची पाहणी केली. पुणे-नाशिक आणि चाकण-शिक्रापूर मार्गावरील या चौकात वाहतूक कोंडी नित्याची असती. याचं चौकातून चाकण एमआयडीसीमध्ये कर्मचाऱ्यांना जावं लागतं. या एमआयडीसीमध्ये 1500 छोट्या-मोठ्या कंपन्या आहेत, त्यात साडे तीन लाख कर्मचारी काम करतात. त्यामुळं […]

अधिक वाचा..

महायुतीचं वाढणार टेन्शन! भाजपा- शिंदेंची सेना आमने-सामने

मुंबई: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम लवकरच जाहीर होईल. मात्र, त्याआधीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीच्या आमदारांमधील वाद चव्हाट्यावर आला आहे. ‘स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत माझे फक्त दोनच टार्गेट आहेत’ अशा पद्धतीची भाषा सत्ताधारी आमदाराकडून मित्रपक्षाबद्दलच वापरली जात आहे. आगामी निवडणुकीमध्ये मित्रपक्षालाच लक्ष्य करण्याचा आमदाराचा मानस आहे. याचा फटका महायुतीला […]

अधिक वाचा..

पंधरा दिवसात देशाच्या राजकारणात नवीन बातमी; प्रकाश आंबेडकर

मुंबई: शरद पवार हे जरी देशाच्या राजकारणात दिसत असले, तरी ते भाजपचे हस्तक आहेत. देशपातळीवर खेळणारी माणसे वेगळी आहेत. आणि समोरची माणसे वेगळी आहेत. त्यामुळे लवकरच नवी बातमी समजेल. त्यामुळे देशाच्या राजकारणात कुठली नवी कलाटणी मिळणार याबाबत आता चर्चा सुरू झाल्या असल्याचा खळबळजनक दावा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. पंढरपूर न्यायालयात […]

अधिक वाचा..

महिलांसाठी आनंदाची बातमी! आता एक रुपयाही न भरता ‘ई-पिंक रिक्षा’ मिळणार

संभाजीनगर: महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे. राज्य सरकारच्या ई-पिंक रिक्षा योजनेमुळे आता महिलांना कोणताही आर्थिक भार न घेता स्वतःची इलेक्ट्रिक रिक्षा मिळू शकते. यामुळे महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यास मदत होईल. योजना कशी आहे या योजनेअंतर्गत ई-पिंक रिक्षाची एकूण किंमत सुमारे ₹3,73,000 असून त्यात 70% रक्कम बँकेकडून कर्जरूपात 20% अनुदान राज्य सरकारकडून आणि […]

अधिक वाचा..

मुंबई, हिंदू सण ‘रक्षाबंधन’ दिवशी परीक्षा घेणे म्हणजे विद्यार्थ्यांच्या भावना पायदळी तुडवण्यासारखे; अ‍ॅड. अमोल मातेले

मुंबई: भारतीय परंपरेतील बंधुत्वाचे प्रतीक आणि पवित्र हिंदू सण – रक्षाबंधन यावर्षी ९ ऑगस्ट २०२५ रोजी साजरा केला जात आहे. त्याच दिवशी “ज्युनिअर अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंट” ही महत्त्वाची परीक्षा आयोजित करण्यात आली आहे, ही बाब अत्यंत खेदजनक आणि दुर्दैवी आहे. रक्षाबंधन हा सण बहिणी आणि भावामधील अतूट प्रेम, विश्वास व सुरक्षा यांचे प्रतीक आहे. वर्षभर बहिण […]

अधिक वाचा..

त्या कामगाराची व्हिडीओ रेकॉर्ड करून आत्महत्या; इंडियन ऑईल टर्मिनल कंपनीच्या सुपरवायझरसह 6 जणांवर गुन्हा

लोणी काळभोर: ‘मी फाशी घेत आहे. माझा काम धंदा गेला. माझ आख्ख नुकसान झालं, माझा आख्खा पैसा पाणी गेला, यांनी आख्ख मला वाटला लावलं, या चार पाच जणांनी.’ अशी आत्महत्येपूर्वी व्हिडीओ क्लीप रेकॉर्ड करून एका कामगाराने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना लोणी काळभोर (ता. हवेली) पोलीस ठाण्याच्या पाठीमागील वस्तीत बुधवारी (ता.6) रात्री साडेआठ […]

अधिक वाचा..

ठाकरे शहांच्या विश्वासू शिलेदाराची भेट घेणार; शिंदेसेनेला अस्वस्थ करणाऱ्या लक्षवेधी घडामोडी

मुंबई: महायुती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना अस्वस्थ असताना दिल्लीत लक्षवेधी घडामोडी सुरु आहेत. शिवसेनेचे प्रमुख नेते असलेल्या एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी महायुतीमध्ये लक्ष घालण्याची विनंती दोन्ही नेत्यांना केली. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे दिल्लीत असताना शिवसेना उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सहकुटुंब दिल्ली दौऱ्यावर […]

अधिक वाचा..