राजकारणातील अनुभवी व्यक्तिमत्त्व हरपले; माजी सत्यपाल मलिक यांचे निधन

जम्मू-काश्मीर: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल आणि भाजपचे एकेकाळचे मोठे नेते सत्यपाल मलिक यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने भारतीय राजकारणात एका वादळी पर्वाचा अंत झाला आहे. मलिक यांनी चार राज्यांचे राज्यपालपद भूषवले, परंतु गेल्या काही वर्षांत त्यांचे मोदी सरकारसोबतचे संबंध बिघडले होते. राजकीय प्रवास: जन्म आणि सुरुवातीचे जीवन: सत्यपाल मलिक यांचा जन्म 24 जुलै 1946 रोजी […]

अधिक वाचा..

काँग्रेसच्या नवनियुक्त ब्लॉक अध्यक्षांचे ७ व ८ ऑगस्टला टिळक भवनमध्ये निवासी शिबीर

प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार मुंबई: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने दिनांक ७ व ८ ऑगस्ट २०२५ रोजी पक्षाचे दादर येथील मुख्यालय टिळक भवन येथे नवनियुक्त ब्लॉक अध्यक्षांचे शिबीर आयोजित केले आहे. हे दोन दिवसीय निवासी शिबीर प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रदेशाध्यक्षपदाची सुत्रे हाती घेतल्यापासून पक्ष […]

अधिक वाचा..

निवडणुकीच बिगुल वाजल! महाराष्ट्रात OBC आरक्षणासह निवडणुका होणार

मुंबई: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका नवीन प्रभाग रचनेनुसार आणि ओबीसी आरक्षणासह होणार आहेत. प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका न्यायालयाने फेटाळल्या आहेत. प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या आहेत. लातूर जिल्ह्यातील औसा नगरपालिकेची निवडणूक ही 11 मार्च 2022 च्या पूर्वीच्या वॉर्ड […]

अधिक वाचा..

आई-वडिलांनी मोबाईल घेण्यास नकार दिल्याने 16 वर्षीय मुलाने संपवले जीवन

संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर मधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. आईने मोबाईल दिला नाही या कारणावरून १६ वर्षाच्या मुलाने आत्महत्या केली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, अशाप्रकारच्या वाढत्या घटनांमुळे पालकांसमोर एक मोठे आव्हान बनत चालले आहे. नेमक प्रकरण काय मूळचा बुलढाणा जिल्ह्यातील असलेला हा मुलगा आपल्या आई-वडिलांसोबत संभाजीनगरच्या वाळूज परिसरात राहत होता. हा […]

अधिक वाचा..

पुण्यात पोलिसांची दलित मुलींवर खोलीत घुसून मारहाण

पुणे: हा संतापाचा उद्रेक झालाय पुण्याच्या पोलीस आयुक्त कार्यालयात आणि त्याला कारण ठरलंय तीन दलित मुलींच्या रुमवर जाऊन पोलिसांनी केलेली मारहाण. पोलीसांनी थेट मुलींच्या रुमवर जात जातीवाचक शिवीगाळ केल्याचा गंभीर आरोप पीडितांनी केलाय. मात्र हे प्रकरण नेमकं काय आहे. नेमकं प्रकरण काय पोलिसांच्या मारहाणीनंतर सामाजिक संघटनांनी मारहाण करणाऱ्या पोलिसांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.. […]

अधिक वाचा..

शिवसेनेचा बाप मीच! भाजपच्या नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य, शिंदे गट आक्रमक

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे. भाजप नेते परिणय फुके यांनी ‘शिवसेनेचा बाप मीच आहे, अस वक्तव्य करत राजकीय वातावरण तापवलं आहे. भंडाऱ्यातील भाजप कार्यकर्ता मेळाव्यात त्यांनी हे वक्तव्य केल्यानंतर शिंदे गटाने तातडीने आक्रमक भूमिका घेतली असून, माफीची मागणी केली आहे. फुके म्हणाले, शिवसेनेचा बाप मीच आहे, कारण सगळं खापर माझ्यावर फोडलं […]

अधिक वाचा..

ज्यांनी कावड यात्रेकडे पाठ फिरवली त्यांचे सगळेच पालथे झाले…

हिंदु धर्माचा अपमान करणाऱ्यांना तमाम हिंदू त्यांची जागा दाखवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही हिंगोली: कावड यात्रा ही फक्त हिंदू धर्माची परंपरा नाही, तर ती आपल्या सनातनी हिंदू धर्माचे प्रतीक आहे. म्हणून तर दरवर्षी शिवभक्त हजारो किलोमीटर चालून पवित्र गंगाजल आणून शिवशंकरावर अर्पण करतात. यात त्याग, समर्पण आणि एकजुटीची भावना आहे. भगवान शंकर हे छत्रपती शिवाजी महाराजांचे […]

अधिक वाचा..

खळबळजनक घटना! ‘मंचरमध्ये युवकाची निर्घृण हत्या’:एका तासात तिघांना अटक 

मंचर: मंचर शहरात शनिवारी (दि. २) रोजी रात्री 10 च्या सुमारास भरचौकात घडलेल्या एका खळबळजनक घटनेत प्रशांत रवींद्र गांजाळे (वय ४५), रा. एस कॉर्नर, मंचर या युवकाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. घटनेनंतर अवघ्या एक तासात पोलिसांनी खुनातील तिघा आरोपींना अटक करून मोठी कामगिरी केली आहे. सदर घटना नंदिनी बिअर बारसमोर घडली. शहाजी वामन इंदोरे, […]

अधिक वाचा..

प्रेमविवाह केल्याच्या रागातून भरचौकात जावयाला बेदम मारहाण, लेकीचं अपहरण

खेड: पुण्यातील खेडमध्ये ‘सैराट’ चित्रपटासारखी धक्कादायक घटना समोर आली आहे. आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रागातून तरुणीच्या आई आणि भावाने तिच्या नवऱ्याला भरचौकात बेदम मारहाण केली. त्यानंतर त्यांनी तरुणीला मारहाण करत तिचे अपहरण केले. या प्रकरणी खेड पोलिस ठाण्यात तरुणीचे अपरहण करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातल्या खेडमध्ये […]

अधिक वाचा..

उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपकडून आता ‘या’ नावाची जोरदार चर्चा; संघाचाही दबाव

नवी दिल्ली: जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपतिपदाचा राजीनामा दिल्यानंतर देशातील राजकारणात विविध घडामोडींना वेग आला आहे. उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी अधिसूचनाही जारी करण्यात आली आहे. त्यानंतर आता भाजपकडून अनेक इच्छुकांची नावे समोर येत आहेत. अशातच भाजपला या पदासाठी विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना उमेदवारी द्यायची आहे. त्यांची भाजप पार्श्वभूमी आहे. शिवाय, ते संघाच्याही जवळचे मानले जातात. […]

अधिक वाचा..