मुख्यमंत्र्यांच्या ‘या’ चार लाडक्या योजनांना ब्रेक, दोन शासन निर्णय रद्द

केंद्र सरकारकडून घेतले १.३६ लाख कोटींचे कर्ज सोलापूर: विधानसभा निवडणुकीपूर्वी सुरू केलेल्या दहा योजनांमुळे राज्य सरकारला यंदा केंद्र सरकारकडून १.३६ लाख कोटींचे कर्ज घ्यावे लागले आहे. या पार्श्वभूमीवर आता दहापैकी मुख्यमंत्री तीर्थदर्शन, मुख्यमंत्री वयोश्री योजना, एक रुपयात पिकविमा आणि मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, या चार योजनांना ब्रेक लावला आहे. याशिवाय २०२५-२६ वर्षातील मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण […]

अधिक वाचा..

मानवी तस्करीविरोधातील लढ्यासाठी समाजाची एकजूट ही काळाची गरज; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

राज्य महिला आयोगामार्फत संवेदनशीलता ते संकल्प;  शोषणाविरोधात लढा कृतीशाळेचे आयोजन मुंबई: “मानवी तस्करीविरोधातील लढ्यासाठी समाजातील सर्व घटकांनी कृतीशील सहभाग घ्यावा, ही केवळ भावना नाही तर काळाची गरज आहे,” असे प्रतिपादन विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले. महिलांच्या सुरक्षिततेसाठी राज्य शासन सातत्याने प्रयत्नशील असून, मानवी तस्करीसारख्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी स्थानिक यंत्रणा, पोलीस, स्वयंसेवी संस्था […]

अधिक वाचा..

मानवी सेवा हीच ईश्वर सेवा मानून जीवनस्पर्श केंद्रात सेवाभावाने  उपचार करावेत

जीवनस्पर्श संयुक्त वैद्यकीय उपचारपद्धती केंद्राचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते उद्घाटन मुंबई:  मानवी सेवा हीच ईश्वर सेवा मानून अत्याधुनिक तंत्रज्ञान व तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून मानवी कर्तव्य समजून सेवाभावाने या केंद्रात उपचार करावेत.  समाजातील गरजू व आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या रुग्णांना वैद्यकीय मदत कशी देता येईल, याबाबत संवेदनशील दृष्टिकोन ठेवावा असे मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले. गिरगाव परिसरातील […]

अधिक वाचा..

महादेव मुंडेंना मारुन गळ्याजवळचा मांसाचा तुकडा काढला अन्..

मुंबई: महादेव मुंडे यांचा खून 12 गुंठे जमिनीसाठी झाला. ती जमीन वाल्मिक कराड यांच्या मुलाला घ्यायची होती. जमिनीचा वाद वाढत गेला, पुढे या प्रकरणातूनच त्यांचा खून करण्यात आल्याची माहिती सतीश फड आणि ज्ञानेश्वरी मुंडे यांनी रोहित पवार यांना दिली. वाल्मिक कराडची दोन मुलं आणि गोट्या गित्ते यांनी महादेव मुंडेंना निर्घृणपणे मारले. महादेव मुंडे यांच्या गळ्याजवळचा […]

अधिक वाचा..

मध्यरात्री जिवंत माणसाच्या दारात नैवेद्य ठेवायचा अन् राम नाम सत्य है म्हणायचा हा काय प्रकार…

बीड: संतोष देशमुख खून प्रकरणातला क्रमांक एकचा आरोपी वाल्मिक कराडचा पंटर गोट्या गित्तेचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. शिवसेनेचे बीड जिल्हाप्रमुख स्वप्निल गलधर यांनी हा व्हिडीओ शेअर करत गोट्या गित्तेचा क्रूरपणा जनतेसमोर आणला आहे. गोट्या गितेची एखाद्याला मारण्याची स्टाईल जरा निराळीच होती. ज्याला संपवायचा आहे त्याच्या दारात मध्यरात्री नैवेद्य ठेवायचा, त्यानंतर तिथेच राम नाम सत्य […]

अधिक वाचा..

राज्यातील पाच लाख विस्थापित सिंधी परिवारांना मालमत्तापत्र मिळणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई: राज्यात ठाणे आणि उल्हासनगर वगळता इतर 35 शहरांमध्ये सुमारे पाच लाख विस्थापित सिंधी परिवार राहतात. या परिवारांना मालमत्तापत्र देण्यात येणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. राज्यातील प्रत्येक शेतरस्त्याचे वाद मिटवून येत्या पाच वर्षात प्रत्येक शेताला 12 फुटांचा रस्ता उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. येत्या 1 […]

अधिक वाचा..

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाजवळील रहिवाशांचे तातडीने स्थलांतर करा; अजित पवार

मुंबई: पुण्यातील महात्मा फुले वाडा व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाच्या जतन व विस्तारीकरणाची कामे सुरु करण्यासाठी स्मारकाच्या सभोवतालचे रहिवाशाना हलविणे आवश्यक आहे. जे रहिवाशी पर्यायी जागेवर जाण्यास तयार आहेत, त्यांचे  स्थलांतर करण्याची कार्यवाही तातडीने सुरु करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले. मंत्रालयात झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी […]

अधिक वाचा..

प्रताप सरनाईक यांच्या कणखर भूमिकेमुळे एसटी महामंडळाचे १२ कोटी रुपये वाचणार

मुंबई: परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दाखवलेला व्यवसायिक दृष्टिकोन आणि योग्य वेळी घेतलेल्या कणखर भूमिकेमुळे एसटी महामंडळाची दरवर्षी तब्बल १२ कोटी रुपयांची बचत होणार आहे. येत्या १ ऑगस्ट पासून इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियम या कंपन्यांनी एसटी महामंडळाला पुरवण्यात येणाऱ्या डिझेल इंधनावरील देण्यात येणाऱ्या सवलत दरात (Discount rate) प्रति लिटर ३० […]

अधिक वाचा..

कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही, इंदिराजी गांधी व बाळासाहेब ठाकरेंवर कारवाई मग मोदींवर कारवाई का नाही

पंतप्रधान मोदींवर आचारसंहिता भंग प्रकरणी कारवाई करण्यास निवडणूक आयोगाकडून टाळाटाळ, हाय कोर्टात दाद मागणार: पृथ्वीराज चव्हाण मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२० साली आदर्श आचार संहितेचे उल्लंघन केले पण त्याविरोधात केलेल्या तक्रारीवर कारवाई करण्यास राज्य निवडणूक आयोगाने टाळाटाळ केली आहे. आचारसंहितेचा भंग केल्याचे आयोगाने मान्य करत केवळ रेल्वे प्रशासनाला समज दिली पण मोदींवर कारवाई केलेली […]

अधिक वाचा..

डॉ.बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजनेच्या अटीत शिथिलता; अजित पवार

‘मॅनहोलकडून मशिनहोलकडे’ योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजनेंतर्गत सफाई कामगारांना सेवानिवृत्तीनंतर किंवा सेवेत असताना मृत्यूनंतर त्यांच्या पात्र वारसास मोफत मालकी तत्वावर सदनिका प्रदान केल्या जातात. सध्या २५ वर्षे किंवा त्याहून अधिक कालावधी सेवा केलेल्या सफाई कामगारांना सदनिका दिल्या जातात. सेवा कालावधीची ही अट २५ वर्षांवरून २० वर्षे करण्याचा प्रस्ताव नगरविकास […]

अधिक वाचा..