संभाजीनगर मधील कोणते रस्ते होणार रुंद, तुमचं घर/दुकान अतिक्रमणात येतंय का

महाराष्ट्र

संभाजीनगर: छ. संभाजीनगर महानगरपालिकेने शहरात मुख्य रस्त्यांचे रुंदीकरण करण्याचे निश्चित केले आहेत. या रस्त्यांच्या कडेला असणाऱ्या अनधिकृत अतिक्रमणांवर कारवाई निश्चित आहे!

तुम्ही सुद्धा जाणून घेऊ शकता की

शहरात कोणते रस्ते किती रुंद होणार आहेत

कोणत्या मालमत्ता अतिक्रमणात येणार आहेत

त्यासाठी सर्वप्रथम ही लिंक उघडा

https://drive.google.com/drive/folders/1KN8OJQ1HGUm9JVFNxyvrsY2Fm6x50PJT

या लिंकमध्ये काय आहे

शहराचे 8 वेगवेगळे सेक्टरवाइज नकाशे

प्रत्येक सेक्टरमधील रस्त्यांचा विस्तार कसा होणार याची माहिती

अतिक्रमण आलेल्या भागांवर लाल रेषांनी केलेले स्पष्ट चिन्हांकन

कोणती दुकाने, घरं, बांधकाम या योजनेत येते त्याची स्पष्ट माहिती

कसे ओळखाल तुमचे घर/दुकान यामध्ये आहे का

तुमचा सेक्टर निवडा

नकाशावर तुमचे लोकेशन शोधा

तुमची मालमत्ता रस्त्याच्याकडेला दर्शविलेल्या लाल रेषेत आल्यास तुमचे बांधकाम अतिक्रमणात आहे

नागरिकांसाठी सूचना

वेळेत नकाशे पाहा

स्वतःची कायदेशीर कागदपत्रे तयार ठेवा

अतिक्रमण असल्यास त्वरित उपाययोजना करा

महत्वाचे:

नकाशा उघडताना थोडा वेळ लागू शकतो संयम ठेवा

तुमचं घर सुरक्षित आहे की धोक्यात

आजच लिंक उघडा आणि माहिती घ्या उपाययोजना करा.