एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा पुनर्जन्म

२०१९ नंतरच्या राजकीय घडामोडींवर समर्थकांच्या दृष्टिकोनातून सविस्तर मतप्रदर्शन मुंबई: राष्ट्रीय सह समन्वयक व प्रसार माध्यम समन्वयक (शिवसेना) दिनेश शिंदे यांनी “ना. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेला शिवसेनेचा पुनर्जन्म” या शीर्षकाचा सविस्तर मतलेख प्रसिद्ध केला आहे. या लेखात त्यांनी २०१९ नंतर महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, शिवसेनेतील फूट आणि त्यानंतर झालेल्या पक्षाच्या पुनर्बांधणीबाबत आपली भूमिका मांडली आहे. मतलेखात […]

अधिक वाचा..

जगाचे नेतृत्व बदलले, पण भारताचे परराष्ट्र धोरण जुन्याच चौकटीत; प्रविण साहनींची मोदी सरकारवर टीका

अमेरिका–इराण युद्धानंतर जागतिक समीकरणे बदलल्याचा दावा; महाराष्ट्र काँग्रेसच्या चर्चासत्रात परराष्ट्र धोरणावर सखोल चर्चा मुंबई: अमेरिका–इराण युद्धानंतर जगातील शक्ती-संतुलनात मोठा बदल झाला असून जग आता द्विध्रुवीय नसून बहुध्रुवीय बनले आहे. मात्र, भारताने बदलती जागतिक समीकरणे ओळखण्यात अपयश आल्याने देशाच्या परराष्ट्र धोरणासमोर गंभीर आव्हाने निर्माण झाली आहेत, असा दावा संरक्षण व युद्धनीती विषयाचे आंतरराष्ट्रीय भाष्यकार प्रविण साहनी […]

अधिक वाचा..

शिस्तीतून विश्वासाचा प्रवास, वक्तशीरपणातून एसटीच्या नव्या युगाची सुरुवात

मुंबई: “रस्ते गावांना जोडतात; पण एसटी माणसांना जोडते.” ही भावना महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकाच्या मनात घर करून आहे. लालपरी म्हणून ओळखली जाणारी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (एसटी) सेवा ही केवळ प्रवासाचे साधन नसून राज्याच्या सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य भाग आहे. शेतकरी, विद्यार्थी, कामगार, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामीण भागातील लाखो नागरिकांसाठी एसटी आजही […]

अधिक वाचा..

मुख्यमंत्र्यांच्या ऊर्जा विभागावर RTI टाळाटाळीचा आरोप; माहिती लपवण्यामागे नेमके कोण?

सौर कृषी पंप योजनेतील माहिती मागवूनही उत्तर न मिळाल्याचा पत्रकार विवेक भावसार यांचा दावा; प्रशासनाच्या पारदर्शकतेवर उपस्थित केले गंभीर प्रश्न. मुंबई : राज्य सरकार ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे स्वप्न पाहत असताना प्रशासनातील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे गंभीर आरोप समोर आले आहेत. TheNews21 आणि राजकारण (The Rajkaran) या डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक-संपादक विवेक भावसार यांनी लिहिलेल्या संपादकीयातून […]

अधिक वाचा..

विश्वासाशिवाय कॉरिडॉर नाही; विकासासोबत वारकऱ्यांची सेवा आणि शेतकऱ्यांचा सन्मान; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पंढरपूर: आषाढी एकादशीच्या पावन सोहळ्यानिमित्त पंढरपुरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूर कॉरिडॉर, शक्तिपीठ महामार्ग, वारकरी सुविधा आणि विविध राजकीय मुद्द्यांवर राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली. विकास प्रकल्प राबविताना कोणावरही अन्याय होणार नाही आणि संबंधितांना विश्वासात घेतल्याशिवाय कोणतेही काम केले जाणार नाही, अशी ठाम ग्वाही त्यांनी दिली. पंढरपूर कॉरिडॉरबाबत बोलताना शिंदे म्हणाले की, वाढत्या वारकरी संख्येमुळे […]

अधिक वाचा..

आषाढी वारीसाठी सरकार सज्ज! पंढरपूर विकासासाठी ६७१ कोटी; एअर ॲम्बुलन्स, NDRF, CCTVसह चोख नियोजन

पंढरपूर: आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर लाखो वारकऱ्यांच्या सुरक्षित, आरोग्यदायी आणि सुरळीत दर्शनासाठी राज्य सरकारने सर्व यंत्रणा सज्ज केल्या असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. पंढरपूरमध्ये विविध विभागांच्या तयारीचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शिंदे म्हणाले की, आषाढी वारी ही केवळ धार्मिक परंपरा नसून वारकऱ्यांच्या श्रद्धेचा महोत्सव आहे. त्यामुळे नगरपरिषद, जिल्हा प्रशासन, पोलीस, आरोग्य, अग्निशमन, […]

अधिक वाचा..

घरातून रुसून निघालेल्या अल्पवयीन मुलाचा दौंड रेल्वे स्थानकावर सुखरूप शोध; समन्वयातून मोठी दुर्घटना टळली

दौंड: घरातून रुसून आंध्र प्रदेशातील रेणुगुंठा रेल्वे स्थानकावरून मदुराई–मुंबई एक्स्प्रेसमध्ये बसून निघालेल्या पवन भाटी या अल्पवयीन मुलाचा दौंड रेल्वे स्थानकावर सुखरूप शोध घेण्यात यश आले. व्यापारी सूरज वांगडे, पुणे जिल्हा माहिती सेवा समितीचे अध्यक्ष लक्ष्मण गव्हाणे तसेच दौंड रेल्वे पोलीस व स्थानिक पोलीस यांच्या तत्पर समन्वयामुळे ही मोठी दुर्घटना टळली. मिळालेल्या माहितीनुसार, पवन भाटी हा […]

अधिक वाचा..

दिवंगत अजितदादा पवारांना अभिवादन; विधानमंडळाची स्मृतीपत्रे सुनेत्रा अजित पवार यांच्या स्वाधीन.

बारामती: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सार्वजनिक आणि राजकीय कार्याचा गौरव करत महाराष्ट्र विधानपरिषद व विधानसभा यांनी तयार केलेली स्मृतीपत्रे, तसेच तामिळनाडू विधानसभेने मंजूर केलेल्या शोकप्रस्तावाची प्रत गुरुवारी बारामती येथे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडे प्रशासनाच्या वतीने सुपूर्द करण्यात आली. या प्रसंगी उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे आणि अपर पोलीस अधीक्षक […]

अधिक वाचा..

२०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे लक्ष्य; ‘देवगिरी ते देवराई’ अभियानाचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबई: राज्य शासनाने २०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित केले असून, यंदाच्या पहिल्या टप्प्यात १८ कोटी वृक्ष लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे. या अभियानात शाळा, महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था, औद्योगिक कंपन्या आणि नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी केले. बारामती तालुक्यातील कन्हेरी येथे ‘स्वर्गीय मा. अजितदादा पवार […]

अधिक वाचा..

‘ईशान सेतू’ने महाराष्ट्र-ईशान्य भारत जोडला; मणिपूरमध्ये सिद्धिविनायकाची प्रतिकृती उभारणार; एकनाथ शिंदे

ईशान्य भारतातील भाषांमध्ये रामायण, गीता, हनुमान चालीसाचे प्रकाशन; पवित्र ग्रंथांच्या मोफत वितरणाचा खर्च उचलण्याची शिंदेंची घोषणा मुंबई: महाराष्ट्र सदनात आयोजित ‘ईशान सेतू – सांस्कृतिक एकात्मता व राष्ट्रनिर्माण’ सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ईशान्य भारताशी सांस्कृतिक आणि भावनिक नाते अधिक दृढ करण्याचा निर्धार व्यक्त केला. या वेळी त्यांनी मणिपूरमध्ये मुंबईच्या श्री सिद्धिविनायक मंदिराची भव्य प्रतिकृती उभारण्याची […]

अधिक वाचा..