मोदींनी सोनम वांगचुकांची भेट का घेतली नाही?; राम मंदिर चोरीवर भाजप-आरएसएसवर सपकाळांचा हल्लाबोल

मुंबई: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केंद्र सरकार, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार टीका केली. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य करत, “राहुल गांधी यांनी वांगचुकांची भेट का घेतली नाही, यापेक्षा नरेंद्र मोदींनी अद्याप त्यांची भेट का घेतली नाही?” असा सवाल उपस्थित केला. सपकाळ म्हणाले […]

अधिक वाचा..

मोदींकडून बारामतीच्या नव्या रेल्वे स्थानकाचे लोकार्पण; पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाला मिळाली नवी गती

बारामती : अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत देशातील ७५ आणि महाराष्ट्रातील बारामती व नांदुरा या दोन पुनर्विकसित रेल्वे स्थानकांचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे शुक्रवारी करण्यात आले. बारामती रेल्वे स्थानकावर आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी उपस्थित राहून पुनर्विकसित स्थानकाच्या कोनशिलेचे अनावरण केले. यावेळी बोलताना सुनेत्रा पवार म्हणाल्या की, बारामती रेल्वे स्थानकाचा […]

अधिक वाचा..

NEET 2026 मध्ये बारामतीची श्रावणी देशात अव्वल; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा व्हिडिओ कॉलवरून गौरव

मुंबई: नीट (NEET) २०२६ परीक्षेत बारामतीच्या कुमारी श्रावणी कृष्णकांत कुदळे हिने ७२० पैकी ७१० गुण मिळवत महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावला आहे. याशिवाय संपूर्ण देशातील मुलींमध्ये प्रथम क्रमांक मिळवत तिने बारामतीसह महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल केले आहे. श्रावणीच्या या ऐतिहासिक यशाबद्दल महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांनी व्हिडिओ कॉलद्वारे तिच्याशी संवाद साधून मनःपूर्वक अभिनंदन केले. पुढील शैक्षणिक […]

अधिक वाचा..

मतांसाठी ‘लाडकी बहीण’, सत्तेनंतर ‘अपात्र’; सरकारने महिलांचा विश्वासघात केल्याचा काँग्रेसचा आरोप

‘लाडकी बहीण’ योजनेत लाखो महिलांना अपात्र ठरवणे, ई-केवायसीमुळे लाभ रोखणे आणि ₹२,१०० चे आश्वासन पूर्ण न करणे यावर काँग्रेसचे टीकास्त्र  मुंबई: ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेवरून महाराष्ट्रातील राजकारण पुन्हा तापले असून, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माध्यम समन्वयक ॲड. श्रीनिवास बिक्कड यांनी महायुती सरकारवर महिलांचा विश्वासघात केल्याचा आरोप केला आहे. ‘मतांसाठी महिलांना “लाडकी बहीण” म्हणून संबोधले, […]

अधिक वाचा..

जनतेच्या विश्वासाचा बुलंद कौल; विकासाच्या राजकारणावर एकनाथ शिंदेंची मजबूत छाप

मुंबई: लोकशाहीमध्ये कोणत्याही नेत्याची खरी ओळख सत्ता किंवा पदावरून नव्हे, तर जनतेच्या विश्वासावरून ठरते. हा विश्वास केवळ आश्वासनांनी मिळत नाही; तो सातत्यपूर्ण काम, लोकहिताची भूमिका आणि विकासाभिमुख निर्णयांमधून निर्माण होतो. अनेक समर्थकांच्या मते, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाला मिळणारा वाढता जनाधार हा त्यांच्या कार्यशैलीवरील आणि विकासाभिमुख दृष्टिकोनावरील जनविश्वासाचीच पावती आहे. महाराष्ट्र हा परिवर्तन, […]

अधिक वाचा..

शालार्थ घोटाळ्यात मोठे रॅकेट उघड; शिक्षकांकडून 20 लाख, पगारातील अर्धी रक्कमही वसूल

बोगस विद्यार्थी, बनावट शिक्षक मंजुरी, कोरे धनादेश आणि स्टॅम्प पेपर जप्त; मालेगाव-पुण्यापर्यंत तपासाचे धागेदोरे परभणी: राज्यभर खळबळ उडवून देणाऱ्या बहुचर्चित शालार्थ आयडी घोटाळ्यात अटक करण्यात आलेल्या संशयित प्रशांत वाडिले याच्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर येत आहे. शासनाच्या तिजोरीला तब्बल 160 कोटी रुपयांचा फटका बसविणाऱ्या या घोटाळ्याची मोडस ऑपरेंडी आर्थिक गुन्हे शाखेने उघडकीस आणली असून, बनावट […]

अधिक वाचा..

दुधातील भेसळ कशी ओळखाल? तुकाराम मुंढेंचा नागरिकांना महत्त्वाचा सल्ला

मुंबई: राज्यात दुधातील भेसळीच्या वाढत्या प्रकारांमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ग्राहकांनी दूध खरेदी करताना अधिक सतर्क राहावे, असे आवाहन केले आहे. भेसळयुक्त दूध तयार करण्यासाठी पाम ऑईल, स्किम मिल्क पावडर, विविध रसायने, साबण, शॅम्पू आणि डिटर्जंटचा वापर होत असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. कृत्रिम गायीचे […]

अधिक वाचा..

भारत-यूके मुक्त व्यापार करारामुळे महाराष्ट्रासाठी जागतिक बाजारपेठेची दारे खुली; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: भारत आणि युनायटेड किंगडम (यूके) यांच्यातील व्यापक आर्थिक व व्यापार करार (FTA) अंमलात आल्याने महाराष्ट्राच्या उद्योग, कृषी आणि निर्यात क्षेत्रासाठी जागतिक बाजारपेठेची नवी दारे खुली झाली आहेत. या करारामुळे राज्यात गुंतवणूक, रोजगार आणि निर्यातीला मोठी चालना मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मुंबईत आयोजित भारत-यूके व्यापक आर्थिक व व्यापार करार अंमलबजावणी […]

अधिक वाचा..

₹2.93 कोटींच्या संशयित खाद्यतेलावर FDA चा छापा; छ. संभाजीनगरातील 2 कंपन्यांचे परवाने निलंबित

छत्रपती संभाजीनगर : ‘सेफ फूड – सेफ महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासन (FDA) ने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मोठी कारवाई करत तब्बल ₹2.93 कोटी किमतीचा संशयित खाद्यतेलाचा साठा जप्त केला आहे. अत्यंत अस्वच्छ वातावरणात खाद्यतेलाचे रिपॅकिंग केल्याचे आढळून आल्यानंतर बागारिया ॲग्रो प्रॉडक्ट्स (पैठण) आणि बागारिया व्हेजिटेबल प्रॉडक्ट्स प्रा. लि. (छत्रपती संभाजीनगर) या दोन कंपन्यांचे परवाने […]

अधिक वाचा..

ओपन विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा! फीमध्ये 50% ते 100% सवलत; जाणून घ्या पात्रता, अटी आणि अर्ज प्रक्रिया

मुंबई: उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वाची फी सवलत योजना उपलब्ध करून दिली आहे. या योजनेअंतर्गत खुल्या (Open) तसेच एसईबीसी (SEBC) प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांना उत्पन्न आणि अभ्यासक्रमानुसार 50 ते 100 टक्क्यांपर्यंत फी सवलतीचा लाभ मिळू शकतो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक असून पालकांचे वार्षिक उत्पन्न 8 […]

अधिक वाचा..