१४ वर्षांनंतर माजी खासदार आनंद परांजपे यांचा शिवसेनेत स्वगृही प्रवेश

महाराष्ट्र

मुंबई: शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत माजी खासदार Anand Paranjpe यांनी तब्बल १४ वर्षांनंतर शिवसेनेत स्वगृही पुनरागमन केले. बाळासाहेब भवन येथे आयोजित कार्यक्रमात शिवसेना संसदीय गटनेते खासदार Shrikant Shinde, उद्योगमंत्री Uday Samant आणि शिक्षणमंत्री Dadaji Bhuse यांच्या हस्ते परांजपे यांचा पक्षप्रवेश जाहीर करण्यात आला.

यावेळी माजी खासदार Rahul Shewale, शिवसेना सचिव सिद्धेश कदम, रविंद्र फाटक तसेच इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले की, आनंद परांजपे आणि शिंदे कुटुंबीयांचे जुने जिव्हाळ्याचे संबंध आहेत. शिवसेनेत काम करत असताना परांजपे यांनी पक्ष संघटनेत महत्त्वाची भूमिका बजावली होती. नंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. त्यांच्या संघटन कौशल्याचा शिवसेनेला निश्चितच फायदा होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राज्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून विविध पक्षांतील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे सांगत, राज्यभर एसआयआरचे काम सुरू असून शिवसेनेने एक लाखांहून अधिक बीएलओ नियुक्त केल्याची माहितीही खासदार डॉ. शिंदे यांनी दिली.

यावेळी आनंद परांजपे म्हणाले की, त्यांना घरातूनच शिवसेनेचा वारसा मिळाला असून शिवसेनेकडून दोन वेळा खासदार होण्याची संधी मिळाली. त्यामध्ये एकनाथ शिंदे यांचे मोठे योगदान असल्याचे त्यांनी नमूद केले. “मी दुसऱ्या पक्षात असलो तरी माझ्यात शिवसेनेचाच डीएनए आहे,” असे ते म्हणाले.

मुख्यमंत्री म्हणून काम करताना Eknath Shinde यांनी सामान्य माणसासाठी अनेक निर्णय घेतले. त्यांच्या कार्यपद्धतीमुळे प्रभावित होऊन पुन्हा स्वगृही परतण्याचा निर्णय घेतल्याचे परांजपे यांनी सांगितले. कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता एकनाथ शिंदे आणि डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटनेसाठी झोकून देऊन काम करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत