अंमली पदार्थ विक्रीविरोधात रक्षक प्रतिष्ठान आक्रमक; पोलीस अधीक्षकांना निवेदन, आंदोलनाचा इशारा

सातारा: ऐतिहासिक शाहूनगरीसह संपूर्ण सातारा जिल्ह्यात गांजा, बंटा, एमडी गोळ्या तसेच इतर अंमली पदार्थ आणि गुटखा विक्री राजरोसपणे सुरू असल्याचा आरोप करत संबंधितांवर तात्काळ कठोर कारवाई करावी, अशी मागणी रक्षक प्रतिष्ठानने केली आहे. यासंदर्भात संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना निवेदन सादर केले. मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास जिल्हाभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात […]

अधिक वाचा..

भाजपामुळे शिंदे गटाला मोठा फटका? पराभवानंतर ठाकरेंच्या शिलेदाराचा तडकाफडकी राजीनामा

पुणे: राज्यातील राजकारणात सध्या मोठ्या उलथापालथी पाहायला मिळत आहेत. पुणे जिल्ह्यातील निवडणुकीतील निकाल, रत्नागिरीतील ठाकरे गटाचा पराभव, रोहित पवारांचा खळबळजनक दावा, चंद्रपूर महापालिकेतील सत्तानाट्य आणि मुंबई महापालिकेतील महापौर निवड या सर्व घटनांमुळे राजकीय वातावरण तापले आहे. पुण्यात शिंदे गटाला अपेक्षाभंग; भाजपामुळे फटका? पुणे जिल्ह्यात एक खासदार आणि एका अपक्षासह दोन आमदार अशी ताकद असतानाही जिल्हा […]

अधिक वाचा..

अल्पवयीन विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार; तिघे ताब्यात, शहरात संतापाची लाट

नागपूर : शहरातील नंदनवन पोलिस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत तिघा आरोपींना ताब्यात घेतले असून त्यामध्ये दोन अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे. घटनेमुळे शहरात संतापाची लाट उसळली असून महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडिता अकरावीमध्ये शिक्षण घेणारी विद्यार्थिनी […]

अधिक वाचा..

चंद्रपूर महापालिका युतीवरून काँग्रेस-ठाकरे सेनेत तणाव; सपकाळांचा थेट आरोप

चंद्रपूर : चंद्रपूर महापालिकेतील महापौरपदाच्या निवडीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेने भाजपला पाठिंबा दिल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महाविकास आघाडीत तणाव निर्माण झाला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ठाकरे सेनेवर थेट टीका करत, “भाजपला पाठिंबा देऊन ठाकरे सेनेने राज्यात सर्वात मोठी चूक केली,” असे स्पष्ट वक्तव्य केले. सपकाळ म्हणाले, “खरंतर ठाकरे सेना आणि आम्ही मिळून भाजपला […]

अधिक वाचा..

राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीचा मुहूर्त ठरला; सुनेत्रा पवार यांच्या नावाला पुण्यातून एकमताने पाठिंबा

पुणे: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीची प्रक्रिया अखेर सुरू होणार आहे. फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अध्यक्ष निवडीचा औपचारिक कार्यक्रम हाती घेतला जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या घटनेनुसार, राष्ट्रीय अध्यक्षपद रिक्त झाल्यास पक्षाच्या अधिकृत यंत्रणेला ठरावाद्वारे नव्या अध्यक्षाची निवड करण्याचा अधिकार आहे. त्यानुसार सुनेत्रा पवार यांच्या […]

अधिक वाचा..

‘ओ रोमियो’ची OTT रिलीज कधी? शाहिद कपूर-तृप्ती डिमरीचा बहुचर्चित क्राइम-थ्रिलर कुठे पाहता येणार?

मुंबई: बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आणि तृप्ती डिमरी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘ओ रोमियो’ या बहुप्रतीक्षित क्राइम-थ्रिलर चित्रपटाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. दिग्दर्शक विशाल भारद्वाज आणि शाहिद कपूर यांची ही चौथी एकत्रित फिल्म असल्याने चाहत्यांमध्ये विशेष उत्सुकता आहे. यापूर्वी या जोडीने ‘कमीने’, ‘हैदर’ आणि ‘रंगून’ सारखे गाजलेले चित्रपट दिले आहेत. हा चित्रपट १३ […]

अधिक वाचा..

ब्रह्मी गावात महिलांचा एकमुखी कौल; दारूविक्री परवाना रद्द करण्याची ठाम मागणी

वाशिम: वाशिम जिल्ह्यातील ब्रह्मी (ता. वाशिम) येथे देशी व विदेशी दारूविक्रीच्या मंजूर अनुज्ञप्ती रद्द करण्यासाठी सोमवारी (दि. ९) केवळ महिलांसाठी विशेष मतदान घेण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ही प्रक्रिया पार पडली. या मतदानात गावातील तरुणी, विवाहित तसेच ज्येष्ठ महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला आणि दारूविक्री बंद करण्याच्या बाजूने ठाम कौल दिला. निकाल जाहीर […]

अधिक वाचा..

जावयाच्या मदतीने आईनेच दिली पोटच्या मुलाची सुपारी; डीएनए चाचणीत उघडकीस आला धक्कादायक खून प्रकरण

संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील लासूर स्टेशन परिसरात रक्ताच्या नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आईनेच आपल्या जावयाच्या मदतीने पोटच्या मुलाची सुपारी देऊन हत्या केल्याचे तपासात समोर आले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. शहानवाजपूर शिवारातील एका विहिरीत २६ जानेवारी रोजी अंदाजे ३५ ते ४० वयोगटातील पुरुषाचा बेवारस मृतदेह आढळून आला होता. काही […]

अधिक वाचा..

दिल्लीतील अर्थसंकल्पीय अधिवेशनात पश्चिम बंगालवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप; निर्मला सीतारमण यांची टीका

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून, आज लोकसभेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर दिले. यावेळी त्यांनी पश्चिम बंगालमधील कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून राज्य सरकारवर टीका करत सभागृहात राजकीय वातावरण तापवले. बजेटमध्ये पश्चिम बंगालचा उल्लेख नसल्याचा टीएमसी खासदार सौगत राय यांनी केलेला आरोप फेटाळून लावताना सीतारमण म्हणाल्या, “पश्चिम बंगालमध्ये कायदा-सुव्यवस्थेचे राज्य […]

अधिक वाचा..

भरदिवसा बिबट्याचा हल्ला; तरुण शेतकरी गंभीर जखमी, परिसरात दहशत

ओतूर: जुन्नर तालुक्यात नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांदरम्यान प्रचाराच्या गाड्यांचा गोंगाट आणि हालचालींमुळे बिबटे लोकवस्तीपासून दूर राहत असल्याचे चित्र होते. त्यामुळे बिबट्यांच्या हल्ल्याच्या घटना काही काळ आढळून येत नव्हत्या. मात्र निवडणुका संपताच दैनंदिन जीवन पूर्ववत झाले असून ओतूर (ता. जुन्नर) परिसरात बिबट्याची दहशत पुन्हा वाढू लागली आहे. ओतूर गावच्या हद्दीतील आवळी […]

अधिक वाचा..