walse-patil-ranjangaon

Live Video: दिलीप वळसे पाटील यांच्या प्रचारार्थ रांजणगावमध्ये महिला निर्धार मेळावा; पाहा कोण काय म्हणाले…

रांजणगाव गणपती (तेजस फडके): आंबेगाव-शिरूर मतदार संघातील राष्ट्रवादीचे उमेदवार दिलीप वळसे पाटील यांच्या प्रचारार्थ महिला निर्धार मेळावा रांजणगाव गणपती येथे शुक्रवारी (ता. १५) पार पडला. यावेळी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. यावेळी दिलीप वळसे पाटील, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, पुर्वा वळसे पाटील, जयश्री पलांडे, सयाजी शिंदे यांच्यासह मान्यवरांनी भाषणे […]

अधिक वाचा..

गुजरातच्या भूमीपुत्रांसाठी लढणाऱ्या मनसेला धडा शिकवा

मुंबई: महाराष्ट्रातील भूमीपुत्रांचा रोजगार गुजरातला पळविणाऱ्या व शिवसेना पक्ष फोडण्याचे पाप करणाऱ्या भाजपला बिनशर्त पाठींबा देणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला या विधानसभा निवडणुकीत धडा शिकवा, अशा शब्दांत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर जोरदार हल्ला चढविला.शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माहिम विधानसभेचे उमेदवार महेश सावंत यांच्या प्रचारार्थ दादरच्या खांडके बिल्डिंग […]

अधिक वाचा..

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या छत्रपती शिवाजी पार्कवरील सभेस अल्प प्रतिसाद

मुंबई: विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला असून प्रत्येक पक्षाच्या स्टार कॅम्पेनर्सच्या सभांचा धडका सुरू आहे. मात्र अशातच काल छत्रपती शिवाजी पार्क येथे झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेला अल्प प्रतिसाद मिळाला आहे. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महायुती सरकारला टोला लगावला आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या […]

अधिक वाचा..

ज्वलंत प्रश्नांपासून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी भाजपाचे कटेंगे बटेंगें

मुंबई: भारतीय जनता पक्षाच्या सरकारमुळे महागाईचा आगडोंब उसळला असून खाद्यतेलासह, किराणा मालाचे भाव प्रचंड वाढले आहेत. लसून ५०० रुपये किलो तर कांदा १०० रुपया किलो झाला आहे. जिवनावश्यक वस्तुंच्या वाढत्या किंमतीमुळे सर्वसामान्य तसेच मध्यमवर्गीय कुटुंबाचे किचनचे बजेट कोलमडले आहे. या महागाईतून मोदी सरकार प्रत्येक मराठी कुटुंबाच्या खिशातून वर्षाला ९० हजार रुपये लुटत आहे आणि जनतेच्या […]

अधिक वाचा..

संविधानविरोधी शक्तींचा पराभव करून महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करु

नंदूरबार: संविधानाने सर्वांना सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला आहे पण पंतप्रधान नरेंद्र मोदी संविधाना रिकामे पुस्तक म्हणतात. संविधान रिकामे पुस्तक नाही तर त्यात बिरसा मुंडा, भगवान बुद्ध, महात्मा गांधी, महात्मा फुले, डॉ. आंबेडकर यांची विचारसरणी आहे. संविधानात भारताचे ज्ञान, देशाचा आत्मा आहे. नरेंद्र मोदींनी संविधानाला रिकामे पुस्तक म्हणून बिरसा मुंडा, भगवान बुद्ध, गांधीजी, महात्मा फुले, डॉ. […]

अधिक वाचा..
sharad-pawar-wadgaon-rasai

Live Video: शरद पवार यांनी वडगाव रासाई येथे अजित पवार यांची केली नक्क्ल…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार, आमदार अशोक पवार यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांची वडगाव रासाई येथे आज (गुरुवार) जाहीर सभा झाली. शरद पवार यांचे जोरदार भाषण झाले. यावेळी त्यांनी अजितदादांची मिमिक्री केली, याला नागरिकांनी टाळ्या व शिट्या वाजवून जोरदार प्रतिसाद दिला. Live Video : आघाडी सरकार आल्यास कारखाना सुरू करणार […]

अधिक वाचा..
sharad-pawar-ashok-pawar

Live Video : आघाडी सरकार आल्यास कारखाना सुरू करणार : शरद पवार

वडगाव रासाई (तेजस फडके) : शिरूर तालुका एके काळी दुष्काळी तालुका होता. पण, राज्यात आज ८५ टक्के बागायती असलेला हा पहिला तालुका ठरला आहे. शिरूर तालुक्याचा चेहरा-मोहरा बदलला आहे. अशोक पवार यांनी विकासकामांच्या माध्यमातून शिरूर हवेलीचा मोठा विकास केला आहे.  आघाडी सरकार आल्यास कारखाना सुरू करणार, असे आश्वासन शरद पवार यांनी दिले आहे. शिरूर- हवेली […]

अधिक वाचा..
dilip-walse-patil

शरद पवार यांच्या टीकेनंतर दिलीप वळसे पाटील यांचा मोठा निर्णय…

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आंबेगावमध्ये बुधवारी (ता. १३) सभा घेतली होती. या सभेत शरद पवार यांनी दिलीप वळसे पाटील यांनी गद्दारी केली, गद्दारांना सुट्टी द्यायची नसते, असे म्हणत त्यांचा पराभव 100 टक्के करा, असे म्हटले आहे. शरद पवार यांच्या सभेनंतर आयोजित करण्यात आलेली पत्रकार परिषद दिलीप वळसे […]

अधिक वाचा..

लोकशाही व संविधान मान्य नसणाऱ्या भाजपाकडून व्होट जिहादचा नारा देऊन मतदारांचा अपमान

मुंबई: भाजपाचे नेते बटेंगे तो कटेंगे, एक हैं तो सेफ है, व्होट जिहाद यासारख्या घोषणा देऊन छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात धर्माच्या आधारावर फूट पाडत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करत आहेत आणि याच महायुतीच्या उमेदवारांमध्ये नवाब मलिकही उमेदवार आहेत, ज्यांच्यावर भाजपाने दाऊदशी संबंध असल्याचे आरोप करुन जेलमध्ये टाकले […]

अधिक वाचा..

महाराष्ट्र द्रोही, गद्दार महायुतीला सत्तेतून बाहेर करा…

आरमोरी: महाराष्ट्राला थोर संतांचा वीरांचा वारसा लाभला आहे. देशाच्या इतिहासात पहिल्यांदा दोन पक्ष फोडून सरकार बनवण्यात आले. नुकताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुलाखतीत सांगितले की सरकार पाडण्याच्या बैठकीत अदानी उपस्थित होते. महाराष्ट्राचे शक्तीकेंद्र गुजरातच्या व्यापाराच्या हातात गेले. महाराष्ट्रातील प्रकल्प, जमिनी गुजरातच्या व्यापाऱ्याच्या घशात घालण्यात आले. महाराष्ट्राच्या आत्मसन्मानाला धक्का लागला आहे. महाराष्ट्राची ही निवडणूक तो स्वाभिमान […]

अधिक वाचा..