supriya-sule-live

Video: सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी पक्ष फोडणाऱ्यांना चांगलच सुनावलंय…

मुख्य बातम्या राजकीय शिरूर तालुका

पाबळ (तेजस फडके) : माझ्या 80 वर्षाच्या योध्याला तुम्ही नोटीस पाठवलं, पक्षातून काढून टाकले, सातबाऱ्यावरून वडिलांचे नाव काढाल का तुम्ही कधी? पक्षाचा सातबारा कुणाच्या नावावर आहे, शरद पवारांच्या नावावर आहे. 80 वर्षाच्या बापाला तुम्ही घराच्या बाहेर काढलं, या शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी पक्ष फोडणाऱ्या अजित पवार व त्यांचा सहकाऱ्यांना चांगलच सुनावलं आहे.

आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदार संघातील शरद पवार गटाचे उमेदवार देवदत्त निकम यांच्या प्रचारासाठी सुप्रिया सुळे यांची पाबळ (ता. शिरूर) येथे सभा झाली. यावेळी त्यांनी अजित पवार, दिलीप वळसे पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांना सुनावले आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या, राष्ट्रवादी काँगेस पक्षाच्या सातबारावर तुमचं नाव आहे. त्यांचं नाही म्हणून ही तुमची लेक लढतीये. सत्य परेशान हो सकता है पराजीत नही, पाठवा पवार साहेबांना नोटीस त्यांची लेक आहे. आज माझ्या वडिलांना पक्षातून काढून टाकलं, जो पक्ष माझ्या वडिलांनी काढला, जो पक्ष तुमच्यामुळे मोठा झाला. मंत्री पदाला हे पुढे आणि कष्ट करायला माझा बाप पुढे. कितीवेळा राज्यात दौरे तुम्ही केले सांगा. जो चोरी केलेला माल आहे तो सोडा, तेवढी दानत दाखवा.’

कोणावरही टीका करा पण माझ्या आई वडिलांवर टीका सहन करणार नाही. माझ्यावर टीका करा, रोहितवर, जयंतरावांवर टीका करा, आमच्या सगळ्यांवर टीका करा आम्हाला प्रॉब्लेम नाही. पण आई- वडिलांवर टीका सहन करणार नाही. आमचे वडील काही तुमच्यासारखे मंत्री पदासाठी लाईनीत उभे नव्हते, त्यांनी जे पण केलं ते स्वतःच्या ताकदीवर केले, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

आंबेगाव, शिरूर मध्ये गेल्या पाच वर्षाचे जिव्हाळ्याचे ऋणानुबंध आहेत. वळसे पाटील कुटुंब व आमचे चांगले संबंध आहेत. नाती जपायला ताकद लागते, तोडायला ताकद लागत नाही. आंबेगावात आमची प्रेमाची नाती आहेत. वळसे कुटुंबाचं नाते माझ्या वडिलांशी नाही, माझ्या आजीशी आहे. माझ्या वडिलांची ताकद मी आणि माझी आई नाही तर ही जनता आहे. आंबेगाव व शिरूरचे आमच्या आयुष्यात खूप मोठं योगदान आहे, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Live Video: दिलीप वळसे पाटलांनी गद्दारी केली, गद्दारांना सुट्टी नाही, त्यांना पराभूत करा: शरद पवार

Live Video: शरद पवार यांनी वडगाव रासाई येथे अजित पवार यांची केली नक्क्ल…

…तर मी उमेदवारी मागे घेईनः दिलीप वळसे पाटील

शिरूर! देवदत्त निकम यांच्यासाठी काही गावात फुलांच्या पायघड्या आणि ज्येष्ठांकडून लोकवर्गणी…

पवार साहेबांनी आमदार तसेच मंत्रीपद देऊनही संघर्षाच्या काळात त्यांनी साहेबांना सोडल; देवदत्त निकम

पवार साहेबांनी आमदार तसेच मंत्रीपद देऊनही संघर्षाच्या काळात त्यांनी साहेबांना सोडल; देवदत्त निकम

शिरुर-आंबेगावच्या ‘वाल्या’चा वाल्मिकी जयंतीच्या दिवशीच देवदत्त निकम यांनी घेतला खरपूस समाचार

शिरुर-आंबेगाव मतदार संघातील बारा गावच्या पाणीप्रश्नामुळे वळसे पाटलांवर शेतकरी नाराज…?

आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदार संघासाठी आपली पसंती कोणाला?

View Results

Loading ... Loading ...

शिरूर-हवेली मतदार संघामधून आमदार म्हणून तुमची पसंती कोणाला असेल?

View Results

Loading ... Loading ...