शिरुरमध्ये पत्रकाराला गलिच्छ भाषेत शिविगाळ करून बातमीचा व्हिडिओ हटविण्याचा प्रयत्न; अँड.विकास कुटे यांच्यावर गुन्हा दाखल

शिरूर (अरुणकुमार मोटे): लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या जाणाऱ्या पत्रकारितेवर दबाव टाकून डिजिटल पुरावे हटविण्यास भाग पाडण्याचा गंभीर प्रकार शिरूर तालुक्यात उघडकीस आला आहे. सार्वजनिक हिताच्या विषयांवर वृत्तांकन करणाऱ्या पत्रकाराला धमक्या देत सोशल मीडियावरील व्हिडीओ आणि बातम्या हटविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी रांजणगाव गणपती येथील अँड.विकास कुटे यांच्याविरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिंदोडी (ता. […]

अधिक वाचा..

नियमांना हरताळ? दावडी निमगावात कंपनीचे काळे प्लास्टिक जाळल्याचा गंभीर प्रकार

नागरिकांच्या आरोग्यासह पर्यावरणाला धोका दावडी निमगाव (अक्षय टेमगिरे): खेड तालुक्यातील दावडी निमगाव हद्दीतील लोणकरवाडी परिसरात एका इसमाने कंपनीमधील काळ्या प्लास्टिकचा साठा उघड्यावर जाळल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून पर्यावरणालाही मोठ्या प्रमाणात हानी पोहोचल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित इसमाने कंपनीतील वापरात असलेले काळे प्लास्टिक […]

अधिक वाचा..

टाकळी हाजी येथे डाळिंब चोरीचा प्रयत्न फसला; दुचाकीसह तीन चोरटे रंगेहाथ जेरबंद

शिरूर (सुनिल जिते): टाकळी हाजी (ता. शिरूर) येथील सोदकवस्ती परिसरातील डाळिंबाच्या बागेत चोरीच्या उद्देशाने घुसलेल्या तीन चोरट्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. शिरूर पोलिसांनी तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करून त्यांच्याकडील दुचाकी व चोरीसाठी आणलेली गोणपाटे जप्त केली आहेत. याप्रकरणी शेतकरी रोहीदास पोपट हिल्लाळ (वय ४१, रा. सोदकवस्ती, टाकळी हाजी, ता. शिरूर) यांनी शिरूर पोलीस ठाण्यात […]

अधिक वाचा..

राज्यमाता गोमाता संवाद यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद; नागरिकांनी सहभागी व्हावे; प्रतीक बनकर

शिरूर (अरुणकुमार मोटे): पशुसंवर्धन विभाग आणि महाराष्ट्र गोसेवा आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘राज्यमाता गोमाता संवाद यात्रा’ या राज्यव्यापी उपक्रमाला सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांच्या मार्गदर्शनाखाली ही यात्रा राबविण्यात येत असून, गोसंवर्धन आणि गोसेवेबाबत जनजागृती करणे हे तिचे प्रमुख उद्दिष्ट आहे. पुणे जिल्हा समन्वयक प्रतीक बनकर […]

अधिक वाचा..

पुण्यातील विषारी दारु मृत्यू प्रकरणाचे धागेदोरे शिरुरपर्यंत…?

शिरुर (तेजस फडके) पुण्यातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवड परिसरात विषारी दारुमुळे झालेल्या मृत्यूंच्या घटनांनंतर आता या संपुर्ण प्रकरणाचे धागेदोरे शिरुर तालुक्यातील टाकळी हाजी पोलीस चौकी हद्दीपर्यंत पोहोचण्याची शक्यता व्यक्त होत आहे. स्थानिक ग्रामस्थांनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे पोलिस यंत्रणेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. काही दिवसांपुर्वी टाकळी हाजी परिसरात ग्रामस्थांनी संशयास्पद दारुची वाहतुक करणारी एक गाडी पकडली होती. […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात महावितरणचा बेजबाबदारपणा; आठ दिवस होऊनही जळालेले रोहित्र मिळेना

शिंदोडी (तेजस फडके) एकीकडे कडक उन्हामुळे शेतकरी हैराण झालेले असताना दुसरीकडे महावितरणच्या भोंगळ, बेजबाबदार आणि निष्क्रिय कारभारामुळे शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शेतकरी अक्षरशः उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. शिंदोडी येथील फडके मळा परिसरात शनिवार (दि. 23 मे) रोजी वादळी वाऱ्यामुळे विजेचे खांब आणि रोहित्र कोसळून नैसर्गिक आपत्तीमुळे भुईसपाट झाले. मात्र तब्बल आठ दिवस उलटूनही वीजपुरवठा सुरळीत […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात HDFC बँकेत बनावट सोन्याचा लाखोंचा गोल्ड लोन घोटाळा; बारा जणांविरोधात गुन्हा दाखल

रांजणगाव गणपती (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील रांजणगाव गणपती येथील HDFC बँकेत बनावट सोने गहाण ठेवुन तब्बल 17 लाख 76 हजार 700 रुपयांचे गोल्ड लोन उचलत बँकेची आर्थिक फसवणुक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात तब्बल 12 जणांविरोधात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला असुन यातील दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्याचा बुलंद आवाज ; www.shirurtaluka.com ची यशस्वी १५ वर्षे…

शिरुर (प्रतिनिधी) शिरुर तालुक्याच्या पत्रकारितेच्या आणि डिजिटल माध्यमांच्या इतिहासात अभिमानाचा क्षण म्हणजे www.shirurtaluka.com या वेबसाईटचे १५ व्या वर्षात पदार्पण. माहिती, बातम्या आणि लोकहिताच्या प्रश्नांना वाचा फोडणारे हे व्यासपीठ गेली पंधरा वर्षे सातत्याने जनतेच्या सेवेत कार्यरत आहे. २६ मे २०११ रोजी महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते मुंबई येथील विधानभवनात या वेबसाईटचे प्रकाशन […]

अधिक वाचा..

पुणे ग्रामीण ATS ची धडक कारवाई; ‘पुष्पा’ स्टाईल चंदन तस्करीचे पुणे कनेक्शन उघड, २८ लाख रुपयांचा चंदनसाठा जप्त

शिरुर (तेजस फडके) पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) पुरंदर तालुक्यात मोठी कारवाई करत तब्बल २८ लाख रुपयांचा चंदनसाठा जप्त केला आहे. मांडकी (ता. पुरंदर) येथील पाटील वस्ती परिसरात शेतात लपवून ठेवलेले ५६० किलो वजनाचे चंदनाचे ओंडके पोलिसांनी हस्तगत केले असून, या कारवाईमुळे पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या चंदन तस्करीच्या रॅकेटची पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली […]

अधिक वाचा..

शिरूर पोलिसांचा मानवतेचा चेहरा! शेतकरी महिलेसाठी नाथा जगताप ठरले ‘देवदूत’

शिरूर (अक्षय टेमगिरे): आधीच कांद्याला कवडीमोल दर मिळत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले असताना, एका शेतकरी महिलेसाठी शिरूर पोलिसांनी देवदूताची भूमिका बजावत मानवतेचे दर्शन घडवले आहे. दुपारच्या चार वाजण्याच्या सुमारास कांदा विक्रीचे पैसे हरवल्यानंतर हवालदिल झालेल्या महिलेला अवघ्या दीड ते दोन तासांत तिची रोख रक्कम आणि महत्त्वाची कागदपत्रे असलेली पर्स परत मिळवून देण्यात शिरूर पोलीस स्टेशनचे […]

अधिक वाचा..