आगामी निवडणुकांमध्ये जनता दल पुरेशा जागांसाठी आग्रही; नाथा शेवाळे 

शिरुर (तेजस फडके): जनता दल सेक्युलरचे प्रदेशाध्यक्ष नाथा शेवाळे यांनी पक्षाच्या शिष्टमंडळासह भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा मंत्री रवींद्र चव्हाण यांची भेट घेत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जनता दलाला पुरेशा जागा द्याव्यात अशी आग्रही मागणी केली आहे. या भेटीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपुर्वी होणाऱ्या महामंडळावरच्या नियुक्त्यांमध्येही जनता दलाच्या प्रतिनिधींना संधी द्यावी, या मागणीचा ठराव […]

अधिक वाचा..

संस्था नियुक्त गटसचिवांचे जिल्हा सेवा संवर्गात होणार समायोजन, गटसचिवांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा

पाबळ (सुनिल जिते): राज्यातील ग्रामीण भागातील प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्था तथा विविध कार्यकारी सहकारी संस्थामध्ये गटसचिवांची नियुक्ती करण्यासाठी राज्य शासनाच्या सहकार व पणन तथा वस्त्रोद्योग विभागातर्फे नव्याने काही मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. यामुळे फेब्रुवारी २०२४ पासून थांबलेल्या गटसचिवांच्या भरतीचा आणि नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ मध्ये सुधारणा करण्यासाठी […]

अधिक वाचा..

शिरुर; रेस्टॉरंटमध्ये घरफोडी करणारी टोळी जेरबंद; इनोव्हा गाडीसह दोन आरोपी अटकेत

शिरुर (तेजस फडके) शिरुर ते न्हावरे रोडवरील ‘न्यू सागर रेस्टॉरंट अ‍ॅण्ड बार’मध्ये झालेल्या घरफोडी प्रकरणातील गुन्हा स्थानिक गुन्हे शाखा, पुणे (ग्रामीण) यांनी उघडकीस आणत सराईत चोरट्यांच्या टोळीतील तीन सदस्यांपैकी दोन जणांना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरण्यात आलेली पांढऱ्या रंगाची इनोव्हा कार एम एच ४३ एल १६०० जप्त करण्यात आली आहे. शिरुर पोलीस स्टेशन […]

अधिक वाचा..

DYSP ऑफिस जवळच हाकेच्या अंतरावर चाललाय वेश्या व्यवसाय ; प्रशासनाचे दुर्लक्ष…?

कारेगाव (तेजस फडके) आशिया खंडातील पंचतारांकित औद्योगिक वसाहत असलेली शिरुर तालुक्यातील रांजणगाव MIDC म्हणजे अवैध धंद्याचा अड्डा झाला असुन रांजणगाव येथील उपविभागीय कार्यालयाच्या (DYSP Office) जवळच अगदी हाकेच्या अंतरावर खुलेआम देहविक्री करणाऱ्या महिला उभ्या राहत असल्याने कामगार महिलांची कुचंबना होत आहे. शिरुर तालुक्यातील शिरुर, रांजणगाव MIDC तसेच शिक्रापुर पोलिस स्टेशन हद्दीत अवैध धंद्याचा सुळसुळाट झाला […]

अधिक वाचा..

शिरूरचे पोलिस निरिक्षक कायदा पायदळी तुडवत व्हिआयपी लोकांची करतात पाठराखण, त्या खासदाराचा फोन आला अन्…

शिरूर अरुणकुमार मोटे): सध्या शिरूर तालुक्यात आमदार, खासदार यांच्या बगलबच्यांनी व्हीआयपी थाट दाखवत त्याच्या गाडीला आमदार, खासदार यांचे विनापरवाना स्टीकर गाडिला लावून रुबाब दाखवत आहे. यापूर्वी अशा गाड्यावर धडक कारवाई करून गुन्हे दाखल केलेले आहेत. याबाबत सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळुंज यांनी आवाज उठवून विनापरवाना स्टिकर लावणाऱ्या गाड्यांचे फोटो काढून कठोर कारवाई करण्यास सांगितले होते परंतु […]

अधिक वाचा..

शिरूरमध्ये विदयुत करंट लागून महिलेचा दुर्दैवी मृत्यू

शिरूर, दि. ६ (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील कामाठीपुरा परिसरात एका महिलेला घरगुती काम करताना विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. याप्रकरणी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मयत महिलेचे नाव मीना चंद्रशेखर गुप्ता (वय ४०, रा. कामाठीपुरा, शिरूर) असे आहे. पोलिसांकडून […]

अधिक वाचा..

शिरूर पोलीस स्टेशनच्या वतीने ‘एक पाऊल पुढे’ अभियानांतर्गत वृक्षारोपण

हरित महाराष्ट्रासाठी ७० झाडांचे दत्तक रोपण शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर पोलीस स्टेशन पुणे (ग्रामीण) यांच्या वतीने “हरित महाराष्ट्र” संकल्पनेला चालना देण्यासाठी ‘एक पाऊल पुढे’ या विशेष मोहिमेअंतर्गत आज शिरूर बसस्थानकजवळील नवीन पोलीस स्टेशनच्या आवारात भव्य वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सदर उपक्रमासाठी ‘श्रीविश्वक फाउंडेशन’ यांच्यातर्फे एकूण ७० झाडे उपलब्ध करून देण्यात आली. या कार्यक्रमाचे उद्घाटन […]

अधिक वाचा..

शिरूर नगरपरिषदेत सातत्याने गैरहजर राहणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

भूमिपुत्र प्रतिष्ठानचा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन इशारा शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर नगरपरिषदेच्या कार्यालयीन वेळेत सातत्याने गैरहजर राहणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात भूमिपुत्र प्रतिष्ठानतर्फे तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली असून, अशा अधिकाऱ्यांची हजेरी व हालचाल रजिस्टरची तपासणी करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुशांत कुटे यांनी केली आहे. याबाबतचे सविस्तर निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयातील सहआयुक्त यांना सादर करण्यात आले आहे. […]

अधिक वाचा..

करडे येथे अष्टविनायक महामार्गावर अपघातात तरुणाचा मृत्यू

शिंदोडी (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील मांडवगण फराटा येथील सुरज लक्ष्मण तोरणे (वय २२) या युवकाचा करडे गावाजवळील अष्टविनायक महामार्गावर झालेल्या अपघातात मृत्यू झाला. तो आयएफबी (IFB) कंपनीत रात्रपाळी करून घरी परतत असताना हा दुर्दैवी अपघात घडला. हा अपघात कंपनीपासून काही अंतरावर घडल्याची माहिती असून, नेमका अपघात कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेमुळे […]

अधिक वाचा..

महसूल सप्ताह अंतर्गत रांजणगाव गणपती येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर उत्साहात संपन्न

शिरूर (अरुणकुमार मोटे): महाराष्ट्र शासनाच्या १५० दिवस कृती आराखड्यानुसार व महसूल विभागाच्या आदेशानुसार “महसूल सप्ताह २०२५” अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन मंडल रांजणगाव गणपती, ता. शिरूर, येथे तहसिलदार बाळासाहेब म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आले. या शिबिरात “जिवंत सातबारा” मोहिमेंतर्गत खातेदारांच्या वारस नोंदी करून दुरुस्ती सातबारा व फेरफार तयार करण्यात आले. तसेच विविध […]

अधिक वाचा..