शिरुर; पारोडीत वीज पडून दुमजली बंगल्याचे नुकसान घरातील सर्व विद्युत उपकरणे जळून खाक

न्हावरे (अक्षय टेमगिरे) शिरुर तालुक्यातील पारोडी गावात मंगळवार (दि १२) जुन रोजी रात्री ८:४५ च्या दरम्यान किरण टेमगिरे यांच्या दुमजली बंगल्यावर वीज कोसळून घराचे मोठे नुकसान झाले आहे. विजेचा जोरदार धक्का बसल्याने बंगल्यावरील टोपीचा काही भाग जमिनीत कोसळला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र सुमारे २ लाख ५० हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले […]

अधिक वाचा..

आमदार माऊली कटके यांच्या दुर्लक्षाने आंदोलनकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी…?

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर तहसील कार्यालयाच्या आवारात आमदाबाद-मलठण या खराब रस्त्याच्या कामाबाबत आणि कोंढण ओढयाच्या पुलाच्या चुकीच्या कामाविषयी सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळुंज यांचे सत्याग्रह आणि उपोषण आंदोलन सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या या शांततापूर्ण आंदोलनाला विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळत आहे. मात्र या आंदोलनाकडे शासकीय यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे संतापाची […]

अधिक वाचा..

निमोणेकरांनी जपली माणुसकी अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या थोरात यांच्या कुटुंबियांना लाखोंची आर्थिक मदत

शिंदोडी (तेजस फडके) निमोणे (ता. शिरुर) येथील हॉटेल व्यावसायिक बाळासाहेब रंगनाथ थोरात यांचा करडे (ता. शिरुर) येथे (दि ८) जुन रोजी अपघाती मृत्यू झाला होता. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. या दुःखाच्या प्रसंगी निमोणे ग्रामस्थांसह अनेक नातेवाईकांनी थोरात कुटुंबीयांना धीर दिला. तसेच निमोणे गावातील काही सोशल मिडिया ग्रुपच्या माध्यमातुन ग्रामस्थांनी या कुटुंबाला आर्थिक […]

अधिक वाचा..

मळगंगा कुंड मृत्यू प्रकरण; पोलिसांच्या दुर्लक्षामुळे नातेवाईकांची परवड, संतप्त नागरिकांची पोलिस प्रशासनावर टिका

शिरूर (अरुणकुमार मोटे): मळगंगा कुंडात पडून २८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची गंभीर घटना समोर आली असतानाही, पोलिस प्रशासनाच्या उदासीनतेमुळे मृतदेह तब्बल अनेक तास कुंडातच पडून राहिलाआहे. नगर-पुणे जिल्ह्याच्या सीमेच्या वादात पारनेर पोलिस व शिरूर पोलिसांनी जबाबदारी झटकत कारवाईस टाळाटाळ केल्याने नातेवाईकांसह ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव शिवा दाराभाऊ ठाकरे (वय २८ वर्षे) […]

अधिक वाचा..

माजी विद्यार्थ्यांनी ४० वर्षांनी पुन्हा भरवली शाळा; १९८६च्या आठवणींना दिला हृदयस्पर्शी उजाळा

शिरूर (अरुणकुमार मोटे): “शाळा म्हणजे केवळ शिक्षणाचे ठिकाण नाही, तर ती आठवणींची ठेव असते” हे विधान खरं ठरवत १९८६ साली दहावीमध्ये शिकलेल्या विद्यार्थ्यांनी तब्बल ४० वर्षांनंतर पुन्हा शाळेत हजेरी लावली. मलठण येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल मलठण मध्ये ६० माजी विद्यार्थी एकत्र जमून आपल्या बालपणाच्या आणि शालेय जीवनाच्या आठवणींना नव्याने उजाळा दिला. पन्नाशीत […]

अधिक वाचा..

वाघाळे गावात बिबट्याचे दर्शन; ग्रामस्थांमध्ये घबराहट, पिंजरा लावण्याची मागणी

रांजणगाव गणपती (किरण शेलार-पिंगळे) शिरुर तालुक्यातील वाघाळे गावात माजी सरपंच पप्पु भोसले यांच्या घराजवळ काल (दि ११) रोजी बिबटया दिसल्याने नागरीक भयभीत झाले आहेत. या बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने तातडीने पिंजरा लावला अशी मागणीही ग्रामस्थांनी केली आहे. चासकमानच्या पाण्यामुळे वाघाळे गावातील अनेक एकर जमीन ओलिताखाली आली असुन गावात ऊस पिकाचे उत्पादन घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. […]

अधिक वाचा..

उरळगाव येथे ऊस पिक परिसंवादाचे कृषी विभाग व ग्रामपंचायतच्या संयुक्त विद्यमाने आयोजन

न्हावरे (तेजस फडके) महाराष्ट्र शासन कृषी विभाग आणि ग्रामपंचायत कार्यालय उरळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ऊस पिक परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या परिसंवादात प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. संदीप घोले, राजेश थोरात आणि योगेश गाडे उपस्थित होते. डॉ. घोले यांनी ऊस लागवडीत वापरल्या जाणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती दिली. त्यांनी तण नियंत्रण, […]

अधिक वाचा..

न्हावरा फाटा व सतरा कमान चौक येथे सौर ऊर्जेवर चालणारे सिग्नल बसवले

अपघात रोखण्यासाठी शिरूर पोलिसांची अभिनव पुढाकार शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून जाणारा पुणे–आहिल्यानगर राष्ट्रीय महामार्ग हा अत्यंत वर्दळीचा आणि वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा मार्ग आहे. या महामार्गावर मौजे न्हावरा फाटा आणि सतरा कमान चौक हे अपघातप्रवण ठिकाणे असून, याठिकाणी वारंवार अपघात होत असल्याची नोंद आहे. न्हावरा फाटा परिसरातून आहिल्यानगरकडून येणारी अवजड वाहतूक ही उतार […]

अधिक वाचा..

Video; शेतात जायला रस्ताच नसल्याने पाच एकर द्राक्षबाग तोडण्याचा शेतकऱ्याचा टोकाचा निर्णय

शिरुर (तेजस फडके) निजाम आणि इंग्रज काळापासुन अस्तित्वात असलेला ३३ फूट रुंदीचा दोन गावांना जोडणारा सार्वजनिक शिवरस्ता आज अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला असुन त्याचा फटका थेट शेतकऱ्यांच्या उपजीविकेला बसू लागला आहे. या रस्त्यावर अतिक्रमण झाल्याने शेतीच्या मालकी हक्काचा पुरेपूर उपयोग न करता आल्याने एका शेतकऱ्याने अखेर वैतागून आपली पाच एकर द्राक्ष बागा तोडून टाकण्याचा टोकाचा निर्णय […]

अधिक वाचा..

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्यांनी खुर्ची सोडून जनतेसमोर याव

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालु्क्यातील मलठण -आमदाबाद रस्ता व कोंढण ओढा पुलाच्या नित्कृष्ठ कामामुळे सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळुंज यांचा बेमुदत उपोषणचा आज “३रा,दिवस” व “सत्याग्रहाचा आज “१०वा. दिवस” असून दिवसरात्र हे सामाजिक आंदोलन सुरूच आहे. पुणे मुख्य अभियंत्यांनी खुर्ची सोडून जनतेसमोर यावं, पुरावे पहावेत, मागण्या ऐकाव्यात.न्याय देता येत नसेल तर खुर्ची खाली करावी अशी मागणी […]

अधिक वाचा..