भंडारा: भंडाऱ्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. प्रेमाच्या जाळ्यात ओढून एका तरूणाने अल्पवयीन मुलीला फसवलं.
तसेच शारीरिक संबंध ठेवलं. इतकंच नाही तर, लॉजवर नेत बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणानंतर पीडितेनं पोलीस ठाण्यात धाव घेतली. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
प्रकाश सुखदेवे (वय ३३) असे आरोपीचे नाव आहे. आरोपी आणि पीडित महिला दोघेही मोहाडी तालुक्यातील रहिवासी आहेत. तर, पीडिता १४ वर्षिय मुलगी असल्याची माहिती आहे. आरोपीनं आधी पीडित मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. नंतर विविध ठिकाणी नेत तिच्यावर शारीरिक संबंध ठेवला.
नंतर आरोपीनं मुलीला भंडारा शहराजवळील जमनी दाभा येथील साई लॉजवर नेलं. तिकडे आरोपीनं पीडितेच्या मनाविरूद्ध शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. या गोष्टीला अल्पवयीन मुलीनं विरोध केला. तरीही त्याने बळजबरी करून शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यानंतर तरूणीनं पळ काढण्याचा प्रयत्न केला.
१४ वर्षीय मुलीनं थेट पोलीस ठाणे गाठले. तसेच पोलिसांना आपबिती सांगितली. या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून आंधळगाव पोलिसांनी आरोपी विरुद्ध कलम 65 (1), 137 (2) पोक्सो अंतर्गत गुन्हा दखल करीत अटक केली. दरम्यान, लॉज मालकावर देखील सवाल उपस्थितीत करण्यात येत आहे. लॉज मालकानं परवानगी दिलीच कशी? असा सवाल आता संतप्त नागरिक उपस्थित करीत आहेत. लॉज मालकावरही कारवाई करण्याची मागणी होत आहे.