नशीब बलवत्तर म्हणून स्वतःच्या जीवावरच संकट दुचाकीवर बेतल…

क्राईम
नवी दिल्ली: नोकरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी उशीर झालाय आणि तुम्ही जर वेळेत पोहोचण्यासाठी रेल्वे रुळ ओलांडण्याचा शॉर्टकट घेत असाल तर थांबा. काळ कोणाला सांगून येत नसतो. तो कधीही आपल्या वाटेत येऊन आपला जीव घेऊ शकतो आणि आपल्यावर हे सुंदर जीवन जगण्याचा आनंद गमवावा लागू शकतो.

अनेक ठिकाणी आपल्या सुरक्षेसाठी विविध फलक लिहिले असतात. पण दिवसभराच्या घाईत कुणाला ते फलक वाचण्याची वेळ नसतो. नेमकी हीच चूक आपल्याला मृत्यूच्या जबड्यात कशी लोटू शकते, याची प्रचिती सोशल मीडियात व्हायरल झालेल्या एका फोटो मधून आली आहे.

एक नव्हे, दोन नव्हे, तर 10 ते 12 जणांचा ग्रुप रेल्वे रुळावर फाटक ओलांडण्यासाठी चालत चालला होता. 1 ट्रेन रुळावर निघून चाललेय आणि हा ग्रुप दुसऱ्या रुळावरुन त्या रेल्वेकडे पाहत रुळ ओलांडण्याचा प्रयत्न करतोय. तितक्यातच विरुद्ध दिशेने भरधाव एक्स्प्रेस येते आणि पुढे जो प्रकार घडला, तो पाहून सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला. यावेळी एका व्यक्तीच्या जिवावरचे संकट त्याच्या ‘बाईक’वर बेतले.
अनेकांना कामावर पोहोचण्याची इतकी घाई असते की, ते स्वतःचा जीव धोक्यात घालतात. अशाच घाईमुळे घडणाऱ्या कार, ट्रेन आणि बस अपघाताचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असाच एक नवीन फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
घटना CCTV त कैद
हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. ही घटना CCTV फुटेजमध्ये कैद झाली आहे. त्याच्यासोबत काही दुचाकीस्वार आणि प्रवासी रुळ ओलांडण्याचा प्रयत्न करत असल्याचेही दिसत आहे.
प्रत्येकाला 2 ते 3 रेल्वे रुळ ओलांडायचे असतात. तेव्हा सर्वांनाच घाई असते. अशा प्रयत्ना दरम्यानच वाऱ्याच्या वेगाने एक हायस्पीड ट्रेन सर्वांसमोर येते आणि पुढे जे घडते, ते सर्वांनाच परमेश्वर आठवायला लावणारे होते.
व्यक्तीची बाईक ट्रॅकवर अडकली आणि…
रेल्वेच्या वेगाचा अंदाज कोणी लावू शकत नाही, पण दुरुन रेल्वेचा हॉर्न ऐकून लोक मागे हटू लागतात. यादरम्यान दुचाकीस्वार आपली दुचाकी मागे घेण्याच्या प्रयत्नात रुळावर अडकतो. सर्वजण मागे सरकतात, पण दुचाकीस्वार दुचाकीवरुन उतरतो आणि दुचाकी मागे घेण्याचा प्रयत्न करु लागतो. त्याला क्षणार्धात समजले की दुचाकी तिथेच सोडणे शहाणपणाचे आहे. पुढे काही सेकंदांनंतर रेल्वेने वाऱ्याच्या वेगाने दुचाकी उडवली आणि रेल्वेची धडक बसण्यापासून तो व्यक्ती बचावला.