Beaten

शिरूर तालुक्यात बिर्याणीच्या वादातून एकाला कोयत्याने मारहाण तर दुसऱ्याला…

कोरेगाव भीमा: कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे गाझी बिर्याणी दुकानातून पार्सल नेण्यासाठी आलेल्या दोन मित्रांना बिर्याणी संपली असल्याचे सांगणाऱ्या दुकानदाराला थोडी तरी बिर्याणी द्या अशी मागणी करत असताना झालेल्या वादातून शेजारी बसलेल्या एकाने वाद घातला. मित्राला घेऊन येत कोयत्याने व लोखंडी रॉडने मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे अतुल संजय मते […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

शिरूर तालुक्यात एका मित्राचा विहिरीत बुडून तर दुसऱ्याने घेतला गळफास…

शिरूर (तेजस फडके) : धुलिवंदनाचा सण साजरा केल्यानंतर विहिरीवर पोहायला गेलेल्या एका युवकाचा कठड्यावरून तोल जाऊन विहिरीत पडल्याने बुडून मृत्यू झाला; तर या घटनेचा धसका घेऊन त्याच्या एका घाबरलेल्या मित्राने घरी जाऊन गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली आहे. या दोन्ही घटनांबाबत शिरूर पोलिसांनी स्वतंत्रपणे अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. […]

अधिक वाचा..
RANJANGAON

शिरूरमधील संस्था अध्यक्षासह पाच जण गुन्हा दाखल होताच फरार; पोलिसांच्या कारवाईकडे लक्ष…

दबंग उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या कामगिरीकडे तालुक्याचे लक्ष.. शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील एका नामांकित शिक्षण संस्थेतील संस्था अध्यक्षासह अन्य पाच जणांवर अँट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल झाल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. कर्मचाऱ्याने सेवा जेष्ठतेनुसार मुख्याध्यापक पद मिळवण्यासाठी संस्थेविरोधात याचिका दाखल केल्याने त्याचा वारंवार मानसिक छळ, आर्थिक लाभापासून वंचित ठेवून, दबाव दमदाटी करून […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात सशस्त्र दरोडा! दरोडेखोरांच्या हल्ल्यात महिला ठार, तर…

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील अरणगाव येथील ठोंबरेवस्तीत काही दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकत वृद्ध दाम्पत्याला मारहाण करून सोन्याचांदीचे दागिने आणि रोख रक्कल लुटली. दरोडेखोरांच्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या वृद्ध महिलेचा मृत्यू झाला असून, वृद्ध व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. फुलाबाई आनंदा ठोंबरे (वय ६५, ठोंबरेवस्ती, शिरूर) असे दरोडे खोरांच्या हल्ल्यात […]

अधिक वाचा..
crime

शिरूर तालुक्यात मारहाण करून गाडीची काच फोडून लाखो रुपये लंपास…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर-निमोणे रस्त्यावरील चव्हाणवाडी हद्दीत ओंकार सचिन गवळी (वय २०, रा. पाचर्णेमळा शिरूर) याची रविवारी (ता. १०) रात्री ८.४५च्या सुमारास अज्ञातने कार अडवून रॉडने गाडीची काच फोडून मारहाण केली. गाडीच्या डीकीतील तब्बल १,७२,००० रुपये लंपास केले आहे. शिरूर पोलिस पुढील तपास करत आहेत. रविवारी रात्री ०८.४५ वा. च्या सुमारास चव्हाणवाडी (ता. शिरूर) गावच्या […]

अधिक वाचा..
crime

अहमदनगर हादरले! ऊसतोड मजुराने मुकादमावर झाडल्या गोळ्या…

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड पोलिस स्टेशनला दीड वर्षांपुर्वी गुन्हा दाखल केल्याच्या कारणावरून पाटोदा येथे मुकादमावर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात मुकादमाच्या पायाला गोळी लागून ते जखमी झाले आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत. मुकादमावर गोळीबार करणारे दोन आरोपी फरार असून त्यांच्यावर जामखेड पोलीस स्टेशनला जीवे मारण्याचा प्रयत्न व आर्म ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला […]

अधिक वाचा..
shirur-tehsildar

शिरूर तालुक्यात चोरटयांचा हौदोस; प्रशासनाची बैठक…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील शिरूर, शिक्रापूर, रांजणगाव पोलिस स्टेशन हद्दीत चोरटयांनी जवळपास दोनशेच्या वर विद्युत रोहीत्र चोरुन नेले असून महावितरणचे मोठे आर्थिक नुकसान केले आहे. विद्युत रोहीत्र चोरीला गेल्यावर जास्त विदयुत रोहीत्र चोरीला गेल्याने नवीन विद्युत रोहित्र देताना महावितरण कडून महीनोमहीने वेळ लागत आहे. शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारी महागड्या केबल वारंवार चोरीला जात असून या […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

शिरूर तालुक्यात जबरदस्तीने करायला लावली वेठबिगारी; महिलेने केला गुन्हा दाखल…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यात जबरदस्तीने वेठबिगारी करावयास लावल्याने शिरूर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. एका ऊस ठेकेदाराने काही कामगार तीन महिन्याच्या कामासाठी ऊस तोडण्यासाठी चांडोह (ता. शिरूर) येथे आणले आहे. तीन महीने उलटल्यानंतरही कामगारांची ऊस तोडायची इच्छा नव्हती. त्यांच्या इच्छेविरुद्ध त्यांची मानसिक तयारी नसताना जबरदस्तीने काम करायला […]

अधिक वाचा..
Shirur Robbery

शिरूर तालुक्यात लघूशंकेसाठी घराबाहेर पडणे पडले महागात…

शिरूर (अरूणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील सविंदणे पाठोपाठ न्हावरा येथे एका दाम्पत्याला तीन अनोळखी चोरट्यांनी गंभीर मारहाण करत महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मणीमंगळसुत्र व रोख रक्कम असा एकुण १ लाख ६५ रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. लिलाबाई परशुराम नागवडे (वय 50, रा नागवडे वस्ती, न्हावरे, ता शिरूर) यांनी अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल आहे. याबाबत सविस्तर हकिकत अशी […]

अधिक वाचा..
shirur-police-station

सोशल मीडियावर तलवार दाखवली; शिरूर पोलिसांची धडक कारवाई…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरामध्ये तलवार दाखवून दहशत निर्माण करणाऱ्यांवर शिरूर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. याबाबतचा पुढील तपास शिरूर पोलिस करत आहेत. शिरूर परिसरात १) अनिकन अनिल पवार (रा. लाटेआळी, शिरूर), २) सुमित विजय जाधव (रा. लाटेआळी, शिरूर), ३) अजहर जमीन खान (रा. भाजीबाजार, शिरूर) हे सोशल मीडियावर तलवारीसह फोटो दाखवून तसेच स्वत जवळ […]

अधिक वाचा..